आज आम्ही तुम्हाला बॉलीवूड फिल्म इंडस्ट्रीच्या दोन मोठ्या सुपरस्टार्स अजय देवगन आणि सैफ अली खानबद्दल सांगणार आहोत. नुकत्याच प्रदर्शित झालेल्या तान्हाजी चित्रपटामुळे हे दोघे आजकाल बरेच चर्चेत आहेत. या कलाकारांनी बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीला करमणुकीचे अनेक चांगले चित्रपट दिले आहेत आणि बरीच कमाईही केली आहे. तर आज आम्ही तुम्हाला अजय देवगन आणि सैफ अली खान यांच्या संपत्तीबद्दल सांगणार आहोत.
१. अजय देवगण – अजय देवगणने अभिनेता म्हणून आपल्या करिअरची सुरुवात १९९१ मध्ये प्रदर्शित झालेला फूल और काटे या चित्रपटाने केली होती. या चित्रपटात प्रेक्षकांनी त्याचा अभिनय आणि व्यक्तिरेख याचे भरभरून कौतुक केले होते. या कारणामुळेच या चित्रपटाच्या उत्तम यशानंतर त्याने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत, जसे की दिलजले, दिलवाले, सिंघम रिटर्न्स, टोटल धमाल आणि गोलमाल अगेन ज्यांना पण प्रेक्षकांनी खूप पसंती दिली आहे. जर आपण अजय देवगणच्या संपत्तीबद्दल बोललो तर त्याच्याकडे मालमत्ता 35 दशलक्ष डॉलर म्हणजेच (२४९कोटी) आहे. त्याच्या संपत्तीत जास्त वाटा हा चित्रपट आणि जाहिरातींचा आहे.
२.सैफ अली खान – सैफ अली खान बॉलीवूडमधील सर्वात प्रतिभावान कलाकारांपैकी एक आहे. होय, कारण ते सर्व प्रकारच्या ऍक्शन, विनोदी आणि रोमँटिक भूमिका अगदी सहजपणे हाताळत असतो आणि प्रेक्षकांनाही या व्यक्तिरेखा खूप आवडतात. यामुळेच सैफ अली खानच्या चित्रपटांची प्रेक्षक आतुरतेने वाट पाहत असतात. सैफ अली खानने आतापर्यंत आपल्या कारकीर्दीत लव्ह आज कल, काल हो ना हो, जी चाहता है, रेस, कॉकटेल आणि कच्चे धागे असे अनेक उत्तम चित्रपट दिले आहेत. जर सैफ अली खानच्या संपत्तीबद्दल चर्चा केली तर त्याच्याकडे १०० दशलक्ष डॉलर्सची म्हणजेच ७११ कोटींची संपत्ती आहे. त्याच्या संपत्तीचा प्रमुख वाटा हा चित्रपट, जाहिराती आणि त्याच्या व्यवसाय याद्वारे येतो.
नुकताच दोघांचा चित्रपट तान्हाजी हा बॉक्स ऑफिस वर धुमाकूळ घालत आहे.दोघांनी केलेला अभिनयामुळे चित्रपटाला चार चांद लागले आहे. चित्रपटातील ऍक्शन तर एकापेक्षा एक सरस आहेत. त्यामुळे येणाऱ्या काळात या दोघांकडून प्रेक्षकांच्या आशा ह्या नक्की वाढतील यात कोणतीही शंका नाही.