Headlines

दरमहा फक्त ४२ ते २१० रुपये भरून आजीवन ५,००० रुपयांपर्यंत पेन्शन मिळवा, जाणून घ्या ही भारत सरकारची जबरदस्त योजना !

‘अटल पेन्शन योजना’ ही भारत सरकारची असंघटित क्षेत्रासाठीची एक योजना आहे. या योजनेला भारत सरकारचे पाठबळ देखील म्हटले जाते. या योजनेने २०१०-११ साली सुरू केलेल्या स्वावलंबन योजनेची जागा घेतली आहे. २०१५ च्या आर्थिक अंदाजपत्रकाच्या भाषणादरम्यान, अर्थमंत्री अरुण जेटली यांनी ह्या योजनेचा प्रथमतः उल्लेख केला होता.

नंतर त्याच वर्षी ९ मे रोजी कोलकाता येथे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेचे औपचारिकरीत्या उद्‌घाटन केले. ही योजना १८ ते ४० वयोगटातील व्यक्तींसाठीची योजना आहे. ही एक बिमा आणि पेन्शन क्षेत्रातील सामाजिक सुरक्षा आहे, ज्यातून सरकारद्वारे देशातील नागरिकांना हजार रुपयांपासून ५,००० रुपयांपर्यंत पेन्शन देण्यासाठी सुरू केली होती.
या पेन्शन फंडची देखरेख नियामक आणि विकास प्राधिकरण (PFRDA) यांच्याद्वारे केली जाते. सेवानिवृत्तीनंतर कोणत्याही व्यक्तीला नियमित पेन्शन देण्याची हमी ही योजना देते. १८ ते ४० वर्षे वयोगटातील कोणताही भारतीय नागरिक या योजनेत सहभागी होऊ शकतो.

केंद्र सरकारच्या अटल पेन्शन योजनेचे लवकरच २५ दशलक्षाहूनही अधिक ग्राहक होणार आहेत. या योजनेंतर्गत सरकार असंघटित क्षेत्रातील लोकांसाठी दरमहा पेन्शनची योजना आखते आहे. आपणास आपले भविष्य आर्थिकदृष्ट्या बळकट करायचे असेल तर आपण या योजनेमधून गुंतवणूक करू शकता. सेवानिवृत्तीनंतर केलेली ही बचत आणि गुंतवणूक आपला मोठा आधार होऊ शकते.

ही योजना केवळ गरीब आणि कामगार वर्गासाठी तयार केली गेली आहे. म्हातारपणात आधार म्हणून करोडो लोक या योजनेचा लाभ घेत आहेत. हे वर्ष संपेपर्यंत योजनाधारकांमध्ये ३४.५१ टक्क्यांनी वाढ होणार आहे आणि महत्त्वाची गोष्ट म्हणजे प्रति महिना ४२ रुपये गुंतवून आजीवन या योजनेचा आपण लाभू घेऊ शकता.

मासिक योगदानाची रक्कम – या योजनेत, एखाद्या व्यक्तीने वयाच्या १८ व्या वर्षी सामील झाल्यास त्याला १००० ते ५००० रुपयांच्या दरम्यान निश्चित मासिक पेन्शन मिळविण्यासाठी ४२ ते २१० रुपयांपर्यंत मासिक रक्कम भरावी लागेल.

जर एखादी व्यक्ती वयाच्या ४० व्या वर्षी या योजनेत सामील झाली तर त्याला १००० ते ५००० रुपयांच्या दरम्यान निश्चित मासिक पेन्शन मिळण्यासाठी २९१ रुपयांपासून ते १,४५४ रुपयांपर्यंत मासिक रक्कम भरावी लागेल. ४० वर्ष असलेल्या व्यक्तीला जर या पेन्शनचा लाभ घ्यायचा असेल तर कमीत कमी २० वर्षांपर्यंत प्रीमियम भरावे लागेल.

इनकम टॅक्सपासून सुटका – अटल पेन्शन योजनाधारकांना आयकर कायद्याच्या कलम 80 सीसीडी अंतर्गत करात सूट मिळू शकते. या योजनेअंतर्गत जास्तीत जास्त रक्कम कर उत्पन्नामधून वजा करता येते ती दर वर्षी 2 लाख रुपये आहे. कलम 80 सी आणि कलम 80 सीडी अंतर्गत एकूण कपात २ लाखांपेक्षा जास्त असू शकत नाही.

योजनाधारकांना एसएमएसच्या माध्यमातून येणार योगदानाचा अलर्ट – अटल पेन्शन योजनाधारकांना खात्यातील शिल्लक माहिती वेळोवेळी कळविली जाते. एसएमएस अ‍लर्ट व अकाऊंटच्या फिजिकल स्टेटमेंटद्वारे ही माहिती दिली जाते. ही योजना ग्राहकांना योजनेंतर्गत मासिक, त्रैमासिक आणि सहामाही योगदान देण्यास अनुमती देते. या योजनेचे सर्व योगदान ऑटो डेबिट सुविधेद्वारे ग्राहकांच्या बचत खात्यातून घेतले जाते.

पेन्शन लाभ – लाभार्थ्याला ६० वर्षे वयानंतर आधारित मासिक १००० ते ५००० रु पेन्शन मिळणार आहे. तसेच वारसदाराला १.७ लाख रुपये ते ८.५ लाख रु एकरकमी लाभ मिळणार आहे .

अटल पेन्शन योजना २०२० ची महत्त्वपूर्ण कागदपत्रे – १. अर्जदार भारतीय नागरिक असले पाहिजेत. २. उमेदवाराचे वय 18 ते 40 वर्षे असावे. ३. अर्जदाराचे बँक खाते असणे आवश्यक आहे आणि बँक खाते आधार कार्डशी लिंक केले जावे. ४. अर्जदाराचे आधार कार्ड ५. मोबाइल नंबर ६. ओळखपत्र ७. कायम पत्ता पुरावा ८. पासपोर्ट आकाराचा फोटो

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !