सुरुवातीच्या काळात लोक काही प्रवास करायचे. त्यानंतर हळूहळू बैलगाडी, घोडागाडी यांसारखी वाहने आली. कालांतराने सायकलीचा शोध लागला. आणि आता आधुनिक काळात लोक प्रवासासाठी अधिक तर मोटर बाईक, कार यांसारख्या वाहनांचा प्रवासासाठी वापर करू लागले. त्यामुळे आधीच्या वापरात येणाऱ्या वाहनांचा कल हळू हळू कमी होत गेला. असे असले तरीही आधीची वाहनेही प्रदूषण मुक्त होती.
सायकली बद्दल बोलायचे झाल्यास सायकल ही आरोग्यासाठी सुद्धा उत्तम आहे. जर तुम्ही दिवसातला काही वेळ सायकल चालवला तर तुम्हाला तासन तास जिममध्ये घाम गाळायची गरज नाही. जसजसे मोटरबाईक आणि कार मध्ये वेगवेगळ्या प्रकारचे टेक्निक वापरले जात आहे त्याचप्रमाणे सायकल मध्ये सुद्धा आता कम्फर्ट आणि फिट राहण्यासाठी वेगवेगळ्या टेक्निकचा वापर केला जात आहे.
अशातच आता हिरो सायकल ने ई-सायकल लॉन्च केली आहे. हिरोच्या ई-सायकलचे नाव लेक्ट्रो एफ६ आय असे आहे. विशेष म्हणजे या सायकलची किंमत ४९००० रुपये आहे. सदरची पूर्ण माहिती तुम्ही https://www.herolectro.com/ या संकेतस्थळावर जाऊन बघू शकता
फक्त पाच हजार रुपयांमध्ये सायकल आणा घरी – तसे बघायला गेल्यास हिरोने लॉन्च केलेल्या या ई-सायकलची किंमत ४९,००० रुपये असले तरीही ही सायकल तुम्ही खूप कमी किमतीत घरी घेऊन येऊ शकता. हो! तुम्हीही सायकल फक्त ५००० रुपयांमध्ये बुक करू शकता. आणि उर्वरित रक्कम तुम्ही नंतर भरू शकता. या ई-सायकल मध्ये एक डिटेचेबल बॅटरी दिली आहे. याद्वारे तुम्ही ६० किलोमीटर पर्यंतचा प्रवास करू शकता. ही बॅटरी पूर्णपणे चार्ज होण्यासाठी ५ ते ६ तास लागतात.
ब्लूटूथ आणि यूएसबी चार्जिंग – या सायकलचे फिचर सुद्धा खूप छान आहेत. या सायकलला कार किंवा मोटर बाईक सारखं चार्जिंग पोर्ट, ब्लूटूथ कनेक्टिव्हिटी, आय स्मार्ट ॲप, आणि फ्रंट एलईडी लाईट यांसारखे फीचर्स दिले आहेत. ही ई-सायकल एक २५० वॉट बी एल डीसी मोटर सोबत येते. यावर ७० किलो वजना पर्यंतची व्यक्ती बसून ५० ते ६० किलोमीटर चालू शकते. एफ६आय पियर इलेक्ट्रिक प्रोपल्शनवर प्रतितास २५ किलोमीटर टॉप स्पीड वर चालते.
ब्रेकिंग सिस्टिम – इलेक्ट्रिक सायकल ला ७- स्पीड सेटअप दिला गेला आहे. ब्रेकिंग साठी रियर आणि फ्रंट असा दोन्हीकडे १६० मिमी डिस्क दिला आहे. या सायकलच्या फ्रंट साईडला ६० मिमीचा टेलिस्कोपिक फोकस दिला आहे. याशिवाय सायकलचे पेंडल केन्डाचे आहेत. ही सायकल एफ६आय हिरो लेक्ट्रो च्या लाईनअप मधील दुसरी महागडी इलेक्ट्रिक सायकल आहे. तर सर्वात महागडी सायकल ही ईएचएक्स २० ही आहे.
या सायकलची किंमत १.३५ लाख रुपये आहे. ही सायकल फुल चार्ज असेल तर ८० किलोमीटर चालते. एफ६आय ही सायकल सोडल्यास इतर सर्व हिरो लेक्ट्रो सायकल या २५ किलोमीटर रेंज पर्यंत चालतात आणि यांची किंमत साधारण २४९९९ रुपये ते ४४९९ रुपयांदरम्यान असते.
हिरोची स्वस्त सायकल – जर तुम्हाला हिरोची स्वस्त आणि सामान्य सायकल खरेदी करायची असेल तर नेक्स्ट २६टी १८ स्पीड स्प्रिंट २६ टी माउंटेन ही सायकल उत्तम आहे. फ्लिपकार्टवर या सायकलची किंमत ७०९६ रुपये आहे. या सायकल चा फ्रेम आणि फोर्क वर २ वर्षांची वॉरंटी, फ्रीव्हील, हँडल, पेडल, हब रियर, हब फ्रंट, बी बी एक्सेल, चेन, चैन व्हील आणि रिम वर एका वर्षाचे वॉरंटी आहे. तसेच टायर आणि ट्यूब साठी ६ महिन्यांची वॉरंटी मिळेल. या सायकलच्या फ्रंट आणि रियर मध्ये वायर ब्रेक आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !