आपल्या आयुष्यात अनेक गोष्टी घडतात. आयुष्याकडे बघण्याचा प्रत्येकाचा वेगळा दृष्टिकोन असतो. काहीजण आयुष्याकडे सकारात्मक पाहतात तर काहीजण नकारात्मक. एखादी गोष्ट ज्या दृष्टिकोनातून आपण पाहतो त्याप्रमाणे ती गोष्ट आपल्याला भावते. त्यामुळे जर एखादी गोष्ट तुम्ही नकारात्मक दृष्टीने पाहिले तर ती तुम्हाला कधीच आवडणार नाही याउलट जर तीच गोष्ट तुम्ही सकारात्मक दृष्टिकोनातून पाहिली तर ती तुम्हाला लगेच आवडू लागेल.
सकारात्मक व नकारात्मक दृष्टिकोनाप्रमाणेच माणसाची निरीक्षण शक्ती सुद्धा महत्त्वाचे असते. एखाद्या गोष्टीकडे डोळसपणे पाहिले तर त्या गोष्टी तील फरक आपल्याला जाणवतो. या डोळसपणा साठी मनाची एकाग्रता असणे महत्त्वाचे असते. यासाठी मन नेहमी प्रसन्न ठेवावे. मनाची एकाग्रता वाढल्यास निरीक्षण क्षमता वाढून बुद्धिमत्ता वाढण्यास मदत होते. यामुळे आयुष्यात आलेले कठीण प्रसंग तुम्ही सहज रित्या सोडवू शकता.
सध्या सोशल मीडिया चे युग आहे. या सोशल मीडियावर कधी काय व्हायरल होईल हे सांगता येत नाही. सध्या सोशल मीडियावर अनेक चॅलेंजेस एकमेकांना देण्याचा ट्रेंड आहे. एखादा फोटो पाठवून त्यातील फरक शोधणे किंवा त्यात लपलेली एखादी गोष्ट शोधून दाखवणे या सर्व गोष्टी हल्ली विरंगुळा घालवण्याचे साधन बनले आहे. आज आम्ही तुम्हाला असेच एक कोडे देणार आहोत. या कोड्याचे उत्तर तुम्हाला एका मिनिटाच्या आत द्यायचे आहे. या कोड्यात आम्ही तुम्हाला दोन समान दिसणारे फोटो देऊ.हे फोटो जरी समान दिसत असले तरी त्यांच्यामध्ये चार फरक आहेत. हे फरक तुम्ही तुमच्या निरीक्षण शक्तीद्वारे ओळखून आम्हाला कमेंटमध्ये कळवायचे आहे.
सध्या झी मराठीवर गाजत असलेल्या ‘माझी तुझी रेशीमगाठ’ या मालिकेतील एक फोटो येथे देण्यात आला आहे. या फोटोमध्ये परी म्हणजेच मायरा आणि तिच्या आईची भुमिका साकारणाऱ्या प्रार्थना बेहेरे दिसते. सध्या ही ऑनस्क्रिन मायलेकींची जोडी खुप गाजत आहे. छोट्या परीला सगळीकडुन खुप प्रसिद्धी मिळताना दिसतेय.
तुम्हाला इथे एकसारखे दिसणारे दोन फोटो दिले आहेत. हे दोन्ही फोटो एकसारखे दिसत असले तरी त्यात काही बदल आहेत. ते तुम्हाला ओळखुन दाखवयचे आहेत. तुम्ही नीट लक्षपुर्वक पाहिलात तर तुम्हाला त्यातील बदल लक्षात येतील.
तुम्हाला जर बदल दिसले नसतील तर काळजी करु नका आम्ही तुम्हाला यातील बदल शोधण्यास मदत करतो.
1. एका फोटोमध्ये परीच्या केसांवर दोन क्लिप आहेत. तर दुसऱ्या फोटोत एकच क्लिप दिसत आहे.
2. एका फोटोत परीच्या कपाळावर टिकली दिसत आहेत. तर दुसऱ्या फोटोत टिकली लावलेली दिसत नाही.
3. एका फोटोत प्रार्थना बसलेल्या खुर्चीला हात ठेवायचा होल्डर आहे तर दुसऱ्या फोटोत त्या खुर्चीला होल्डर दिसत नाही.
4. एका फोटोत संगणका शेजारी ठेवलेल्या फाईलवर केशरी रंगाची पट्टी दिसते तर दुसऱ्या फोटोत फाईलवरील स्ट्राईप दिसत नाही.
5. एका फोटोत भिंतीच्या पिवळ्या रंगाची पट्टी पूर्ण दिसतेय तर दुसऱ्या फोटोत ती पिवळ्या रंगाची पट्टी कट झालेली दिसतेय.