पोस्टाची ही योजना कमी जोखमीसोबत जास्त फायदा देते. पोस्टातील एमआईएस म्हणजेच मंथली इंन्कम स्किम ही एक सेव्हींग स्किम आहे. त्यात पैसे लावुन दर महिन्याला इंटरेस्टच्या रुपात फायदा मिळु शकतो. ही एक सरकारी स्मॉल सेव्हींग स्किम आहे. जी गुंतवणुकदारांना दर महिन्याला एक ठराविक रक्कम कमवण्याची संधी देते. या योजनेत १० वर्षांपेक्षा अधिक वय असलेल्या मुलांचे खाते सुद्धा उघडले जाऊ शकते.
पोस्टाचे हे खाते तुम्ही कोणत्याही डाकघरात जाऊन उघडु शकतात. त्यात तुम्ही १००० रुपयांपासुन ते जास्तीत जास्त ४.५ लाख रुपये जमा केले जाऊ शकतात. सध्या या योजनेत इंटरेस्ट रेट ६.६ टक्के आहे. या योजनेची मॅच्योरीटी ५ वर्षांची असते. त्यानंतर त्याला बंद केले जाऊ शकते.
समजा तुमचे मुल १० वर्षांचे आहे त्याच्या नावावर तुम्ही २ लाख रुपये जमा करता. तर दरमहा ६.६ टक्के इंटरेस्ट या दराने तुम्हाला ११०० रुपये मिळतील. पाच वर्षात तुम्हाला हा एकुण इंटरेस्ट ६६ हजार रुपये मिळेल. तसेच शेवटी तुम्हाला तुमचे २ लाख रुपये सुद्धा परत मिळतील.
यात तुम्ही सिंगल किंवा ३ ए’ड’ल्ट मिळुन जॉइंट अकाउंट उघडु शकता. जर तुम्ही ३.५० लाख रुपये जमा करता तर तुम्हाला वर्तमानाच्या दराने दर महिन्य़ाला १९२५ रुपये मिळतील. या योजनेची अधिकतर लिमिट ४.५ लाख रुपये आहे ते जमा केल्यास तुम्हाला दर महिना २४७५ रुपये फायदा मिळु शकतो.
या पोस्टाच्या योजनेअंतर्गत सिंगल अंकाउंट होल्डरला ४.५ लाख रुपयांची गुंतवणुक करता येऊ शकते. तर जॉइंट अकाउंट असलेले ९ लाख रुपयांची गुंतवणुक करता येते. मॅच्युरिटीनंतर जॉइंट अकाउंट धारकांना समान पैसे वाटप केले जातात.
या स्किम खाते उघडल्यावर १ महिन्यानंतर लगेच व्याज मिळण्य़ास सुरुवात होते हे व्याज खात्याची मॅच्युरिटी पुर्ण होई पर्यंत सुरु असते. दर महिन्याला मिळणाऱ्या व्याजाच्या रक्कमेला तुम्ही क्लेम केले नाही तर तुम्हाला त्या व्याजावर अधिकतर व्याज मिळाणार नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !