केजीएफ या कन्नड चित्रपटाचा हिरो यशचा आज ३५ वा वाढदिवस आहे. यश चा जन्म ८ जानेवारी १९८६ ला झाला होता. यशचे खरे नाव कुमार गौडा असे आहे. त्याचे वडिल अरुण कुमार हे कर्नाटक ट्रांसपोर्ट सर्विस मध्ये ड्रायव्हर होते. तर आई पुष्पा या गृहीणी होत्या. यशने त्याच्या फिल्मी करियरची सुरुवात मोगीना मनसु मधुन केली होती. राजाधानी, मिस्टर एंड मिसेज रामाचारी आणि किराटका यांसारख्या चित्रपटांमध्ये देखील यश ने काम केले मात्र त्याला खरी ओळख मिळाली ती केजीएफ चैप्टर 1 मधुन. आज त्याच्या वाढदिवसा निमित्त आम्ही तुम्हाला काही खास गोष्टी सांगणार आहोत.
य़शची खरी सुरुवात झाली ती टेलिव्हिजन सिरियल नंदा गोकुला मधुन. ही मालिका अशोक कश्यप यांनी दिग्दर्शित केली होती. फिल्म इंडस्ट्रिमध्ये त्यांना यश रॉकी नावाने ओळखले जाते. यशचे बालपण मैसुर मध्ये गेले. तेथील महाजन हाई स्कूलमधुन त्यांनी त्यांचे शालेय शिक्षण पुर्ण केले. त्यानंतर त्याने बिनाका नाटक मंडळात प्रवेश केला. २०१३ नंतर यशला यश मिळत गेले.
२०१८ मध्ये प्रदर्शित झालेला केजीफ हा कन्नड सिनेमा सर्वाधिक बजेट असणारा चित्रपट होता. या सिनेमाने वर्ल्ड वाइड 250 करोड़ रुपयांचा गल्ला जमवला होता. या चित्रपटाच्या प्रदर्शनानंतर यश हे नामांकित अभिनेता झाला. आता संपुर्ण देश यशच्या ‘केजीएफ : चैप्टर 2’ ची प्रतिक्षा करत आहे.
सध्या यश ५० करोड रुपयांच्या प्रोपुर्टीचा मालक आहे. बंगळुर येथे त्याचा ४ करोड रुपयांचा बंगला आहे. तर गेल्या वर्षीच त्याने अजुन एक घर खरेदी केले. यश ने एक इंटरव्यूमध्ये सांगितले होते की त्याचे वडिल अजुनही एका वस ड्रायव्हरची नोकरी करतात. यश समाजकार्यासाठी सुद्धा ओळखला जातो. २०१७ ला त्याने यश मार्ग फांउडेशन सुरु केले होते. या फांउडेशन द्वारे ४ करोड रुपयांचे तलाव कोप्पाल जिल्ह्यात बांधण्यात आले त्यामुळे तेथील रहिवाशांना पिण्याचे स्वच्छ पाणी उपलब्ध झाले आहे.
यशने राधिका पंडित सोबत लग्न केले. या दोघांची पहिली ओळख मिस्टर एंड मिसेज रामाचारी च्या सेटवर झाली होती. २०१६ मध्ये गोव्याला दोघांनी साखरपुडा केला. त्यानंतर ९ डिसेंबर २०१६ ला बॅंगलोर येथे खास माणसांमध्ये त्यांनी लग्न उरकुन घेतले. एवढेच नव्हे लग्नाच्या रिसेप्शनला त्यांने संपुर्ण कर्नाटकाला आमंत्रण दिली होते. आता त्यांना दोन मुले आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !