कंपनी हा शब्द म्हटला कि डोळ्यासमोर येते ते शहरातील मोठे कार्यालय, सुटाबुटात वावरणारे कर्मचारी, छोट्या छोट्या केबीन. पण या सर्व गोष्टींची मुळे गावाकडच्या मातीतुन निघतात. हरियाणातील कैथल येथी शेती करणाऱ्या शेतकऱ्यांनी अशीच एक कंपनी तयार केली आहे. या कंपनी मार्फत बटाट्याचे पिक घेऊन ते पेप्सिको, हल्दीराम आणि मकिन सारख्या मोठ्या कंपन्यांना विकले जातात.
सध्या ही कंपनी त्या शेतकऱ्यांची इंटीग्रेटेड पॅक हाऊस झाले आहे. तीन करोड बजेट असलेले एक एकर मधील कोल्ड रुम शेत खराब होऊ देत नाही. सध्या येथील शेतकऱी ७० एकरात बटाट्याचे उत्पन्न घेतात. तीन ते चार महिन्याच्या उत्पन्नातुन ही कंपनी पावणे दोन करोड रुपयांचे टर्न ओव्हर कमावते. पुढील पाच वर्षांत पन्नास करोड टर्न ओव्हर पुढे नेण्याचा त्यांचा संकल्प आहे.
शेतकऱ्यांची कंपनी उभारण्याची संकल्पना कैथल येथील मलिकपुरच्या १२ पास असणाऱ्या गुरुदयाल सिंह शेतकऱ्याची आहे. ते त्यांच्या दोन भावांसह शेती करायचे. २०१० मध्ये त्याच्याकडे ड्रिप सिंचन करणाऱ्या एका प्रायव्हेट कंपनी मधुन लोक गेले होते. त्यांनी या भावंडाना शेतात पाईप लावुन फव्वाऱ्याने सिंचन करण्यासाठी प्रेरित केले. गुरुदयाल सिंह यांनी सांगितले कि ते गहुचे पिक पिकवतात. आम्ही शेतात ड्रिप सिस्टिम लावुन घेऊ, पण तुम्ही आम्हाला दुसऱ्या एखाद्या कंपनीशी गाठ घालुन द्या. आम्हाला आणखी दुसरे सुद्धा पिक घ्यायचे आहे. तेव्हा ड्रिप सिस्टिम वाल्या कंपनीच्या माणसांनी गुरुदयालची पेप्सिको च्या अधिकाऱ्यांशी भेट करुन दिली.
तेव्हापासुन त्यांनी थेट कंपनीला बटाटे विकण्यास सुरुवात केली. कंपनीत कशा प्रकारे बटाट्याचे चिप्स तयार होतात हे पाहिल्यावर आपणच आजुबाजुच्या शेतकऱ्यांना एकत्र करुन एक कंपनी तयार करु असे गुरुदयालच्या मनात आले. त्यानंतर व्हेजिटेबल फार्मर प्रोड्युसर कंपनी तयार झाली. या कंपनीशी आता १०६० शेतकरी संलग्न झाले आहेत. अशा प्रकारे होते बटाट्यांची विक्री गुरुदयाल यांनी सांगितले, २०१६ मध्ये त्यांनी बागवानी विभागाला सोबत फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशन तयार केले. त्यात ४०० शेतकरी सहभागी होते. हळुहळु शेतकऱ्यांची संख्या वाढत गेली.
आता या कंपनीत जिल्ह्यातील अनेक उत्कृष्ट शेतकरी सहभागी आहेत. हे सर्व शेतकऱी दोन प्रकारची शेती करतात. त्यातीस एक म्हणजे सीड प्रोग्राम आणि दुसरे म्हणजे वेअर हाऊस. सीड प्रोग्राम शेतीच्या अंतर्गत तयार होणाऱ्या बटाट्यांचा आकार हा छोटा आणि मध्यम असतो. तर वेअर हाऊस शेतीत तो बटाटा पुर्ण मोठा होई पर्यंत त्याला बाहेर काढले जात नाही. हे बटाटे वेफर्स बनवण्यासाठी वापरतात. पेप्सिको कंपनी १३ रुपये किलो दराने बटाटे खरेदी करते तर मकिन १० रु. किलो. एका एकारात साधारण १०० क्विंटल बटाटे तयार होतात.
२०२२ पर्यंत त्यांचे इंटीग्रेटेड पॅक हाऊस तयार होईल असे गुरुदयाल सिंहने सांगितले. ते एका कोल्ड स्टोअर प्रमाणे असेल. त्यात फळ आणि भाज्या लावल्या जातील. फळांमध्ये कलिंगड, खरबुज आणि पेरुची लागवड केली जाईल. कॅथल मध्ये गुहला आणि सीवन हे सर्वात मोठे भाज्या पिकवणारे क्षेत्र आहे. गुरुदयाल सिंहयांचे पॅक हाऊस सीवन क्षेत्रात आहे. गुरुदयाल सिंह यांनी इतर शेतकऱ्यांना सुद्धा प्रेरित केल्य़ाचे शेतकरी कल्याण विभागाचे उप निर्देशक डॉ. कर्मचंद यांनी सांगितले.
सरकारकडुन मिळते अनुदान – फार्मर प्रोड्युसर ऑर्गनायझेशनमार्फत शेतकरी फळ आणि भाज्या विकु शकतात. त्यांना त्याद्वारे नुकसानेची जोखीम कमी असेल. सरकार अशा प्रोजेक्टला ८० ते ९० टक्के अनुदान मिळते. शेतकरी जर जागरुक असेल तर पिक कुठे विकावे हे त्यांना बरोबर समजते असे पेप्सिको कंपनीच्या एग्रोनामिस्ट सतीश कुमार यांनी सांगितले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !