सोशल मीडिया हे एक असे माध्यम आहे जिथे एखादी नाविन काही पोस्ट झाले तर ते लगेच व्हायरल होते. मग ते गाणे असो, एखादा चित्रपट किंवा मालिकेतील डायलॉग असो किंवा एखादा फोटो असो. कित्येक वेळेस सोशल मीडियाच्या माध्यमातुन लोकांकडुन ब्रेन गेम खेळवला जातो. लोकांची आयक्यु लेव्हल तापासली जाते. लोक सुद्धा या गोष्टींना चांगला प्रतिसाद देत असतात.
सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. ज्यात एका नदी किनारी काही हत्ती त्यांच्या सोंडेतुन पाणी पित आहेत. हा फोटो आयपीएस अधिकारी सुसांत नंदा यांनी त्यांच्या ट्विटर अकाउंटवरुन शेअर करत या फोटोत किती हत्ती आहेत असा प्रश्न लोकांना विचारला आहे.
How many elephants are in the picture?
Credit:Wildlense Eco foundation pic.twitter.com/viUGya91uX— Susanta Nanda (@susantananda3) January 19, 2022
चारहुन अधिक हत्ती – पहिल्या नजरेत या फोटोत चार हत्ती आहेत असे दिसते. पण जसे दिसते तसे नसंते असेच काहीसे या फोटोच्या बाबतीत आहे. तुम्ही जर नीट लक्ष पुर्वक पाहिलात तर तुम्हाला यात चारहुन अधिक हत्ती असल्याचे दिसेल. पण नक्की किती हत्ती आहेत हे जाणुन घेण्यासाठी तुम्हाला तुमच्या डोक्याला किंचित ताण द्यावा लागेल. त्यासाठी तो फोटो पुन्हा एकदा नीट पहा.
योग्य उत्तर – खरेतर या फोटोमध्ये चार नाही तर ७ हत्ती आहेत. याचे अचुक उत्तर स्वता आईपीएस सुसांत नंदा यांनी दिले. ते म्हणाले कि हा फोटो काढण्यासाठी फोटोग्राफरस् च्या टीमला खुप कष्ट करावे लागले आहेत. हत्ती नदी किनारी जेव्हा पाणी पिण्यासाठी आलेले तेव्हा ते तिथे २० मिनिटे होते. त्यावेळी ते त्यांच्या सोंडेने पाणी शोषुन स्वताची तहान भागवत होते. या २० मिनिटांत फोटोग्राफर्सनी त्यांचे तब्बल १४०० फोटो काढले. तेव्हा कुठेतरी एका ओळीत या ७ हत्तींचा पाणी पितानाचा फोटो आला.
How many elephants are in the picture?
Credit:Wildlense Eco foundation pic.twitter.com/viUGya91uX— Susanta Nanda (@susantananda3) January 19, 2022
या कोड्याचे उत्तर आतापर्यंत फारच कमी लोकांना देता आले आहे. तुम्हाला सुद्धा या फोटोतील हत्ती शोधण्यास किती वेळ लागला हे सांगायला कमेंट करायला विसरु नका.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !