ट्रेन मधुन प्रवास करणे हे नेहमीच आरामदायक आणि स्वस्त असते. ट्रेनमध्ये तुम्ही आरामात झोपुनसुद्धा प्रवास करु शकता. पण काहीवेळेस मात्र ट्रेनमधले सहप्रवासी तुमच्या झोपेत व्यत्यय सुद्धा आणतात. त्यात काही जण मोबाइलवर मोठ्या आवाजात बोलतात तर काही जण रात्री लाइट चालु ठेवतात. तर काहीजण ग्रुप बनवुन रात्रभर गप्पा मारत बसलेला असतात.
तुम्ही जर अशा प्रवाशांमुळे त्रासले असाल तर तुमच्यासाठी एक चांगली बातमी आहे. रेल्वे मंत्रालयाने रात्री ट्रेनमधुन प्रवास करण्यासाठी आणि झोपण्यासाठी काही नवे नियम बनवले आहे. या नियमांमुळे प्रवाशांना नक्कीच फायदा होणार आहे.
झोपे संबधी बनवले नवे नियम – या नियमांनुसार रात्री १० नंतर कोणताही प्रवासी तुमच्या सीट, कंपार्टमेंट किंवा कोच मध्ये मोबाइलवर बोलु शकत नाही. एवढेच नव्हे तर मोठ्या आवाजात गाणे देखील म्हणु शकत नाही. गेले काही दिवस रेल्वेकडे रात्री प्रवासादरम्यान सहप्रवासी झोपेत व्यत्यय आणतात अशा तक्रारी सतत येत होत्या. लोकांच्या तक्रारी लक्षात घेऊन रेल्वेने काही नवे नियम बनवले आहे.
रात्री लाइट सुद्धा बंद करावी लागेल – काही प्रवासी रात्री लाइट चालु ठेवतात अशी तक्रार सुद्धा रेल्वेकडे य़ायची. त्यामुळे नव्या नियमांनुसार रात्री १० नंतर कोचची लाइट रात्री बंद करावी लागेल. तर जे लोक रात्री ग्रुप बनवुन गप्पा मारत असतात त्यांना देखील शांत रहावे लागणार.
नियम तोडल्यास होणार कारवाई – रेल्वे मंत्रालयाने रेल्वेच्या सर्व अधिकाऱ्यांना हा नियम लवकरात लवकर लागु करण्याचा आदेश दिला आहे. जे हबे नियम तोडतील त्यांच्या विरोधात कारवाही करण्यास सांगितले आहे. या नियमांनुसार एखादा प्रवासी जर तक्रार करत असेल तर जिथे उपस्थित असलेल्या स्टाफला त्यांच्या समस्येवर तोडगा काढावा लागेल.
प्रवास होईल आरामदायक – भारतीय रेल्वेचे हे नवे नियम प्रवाशांना देखील खुप आवडत आहे. लवकर होळी येईल. त्यामुळे लोक सु्ट्ट्यांमध्ये पुन्हा रेल्वे प्रवास करतील. त्यावेळी रेल्वेत खुप गर्दी सुद्धा असणार आहे. या नियमांमुळे प्रवास आणखी आरामदायक होणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !