Headlines

अखेर ठरले, सुप्रसिद्ध भजन गायिका जया किशोरी करणार लग्न, पण त्यासाठी ठेवली ही अट !

सुप्रसिद्ध किर्तनकार आणि भजन गायिका यांची प्रसिद्धी केवळ भारतापुरतीच मर्यादित नसून ती परदेशातही पसरली आहे. जया किशोरी यांना सुरुवातीपासूनच आध्यात्माची आवड होती. आज जया किशोरी एक प्रसिद्ध किर्तनकार, भजन गायिका आणि प्रेरक वक्त्या आहेत. त्यांचे खरे नाव जया शर्मा आहे, पण त्या जया किशोरी म्हणून ओळखल्या जातात.

मिळालेल्या माहितीनुसार, जया किशोरी यांनी वयाच्या अवघ्या 9व्या वर्षापासून अध्यात्माला सुरुवात केली होती. जया भागवत गीता, नानीबाई रो मायरो, रामायण इत्यादी कथांचे कार्यक्रम त्या करतात. पण याहीपलिकडे लोकांना त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल देखील जाणून घेण्यात रस आहे.

यामुळे, लोक इंटरनेटवर जया किशोरीच्या लग्नाबद्दल, तिचे लग्न कधी होणार आहे, जया किशोरी विवाहित आहे का इत्यादी गोष्टी शोधत राहतात.

जया किशोरी यांचा जन्म 13 जुलै 1995 रोजी सुजानगढ, चुरू, राजस्थान येथे झाला. जया किशोरीने फार कमी वयात स्वताची वेगळी ओळख निर्माण केली आहे. त्यांचे भजन ऐकण्यासाठी मोठ्या संख्येने लोक जमा होतात. याशिवाय सोशल मीडियावर त्यांचे खूप चाहते आहेत. तसेच त्यांच्या भजन आणि कथांचे यूट्यूब व्हिडिओवर लाखो व्ह्यूज आहेत.त्यांची भगवान विष्णूवर खूप श्रद्धा आहे.

जया किशोरी यांनी वयाच्या 9 व्या वर्षापासून संस्कृतमधील लिंगाष्टकम्, शिव तांडव स्तोम यासारखे कठीण स्रोत गायला सुरुवात केली, म्हणून लोक त्यांना ऋषी-संत ही पदवी देऊ लागले, परंतु जया किशोरी स्वतःला साध्वी मानत नाहीत. त्यांच्या मते त्या एक सामान्य मुलगी आहे आणि जेव्हा वेळ येईल तेव्हा ती लग्न देखील करेल, परंतु भक्तीचा मार्ग कधीही सोडणार नाही.


लग्नाबाबत जया किशोरी यांनी एका मुलाखतीत सांगितले होते की, जर माझे कोलकात्यातल्या मुलाशी लग्न झाले तर बरे होईल. त्यामुळे मी माझ्या घरी येऊ शकेन. सध्या जया किशोरी आणि त्यांचे कुटुंबीय कोलकाता येथे राहतात. यासोबतच जया किशोरी म्हणाल्या की, त्यांनी त्यांच्या लग्नाबात एक अट टाकली त्या म्हणाल्या की माझे लग्न बाहेर कुठेतरी झाले तर, जिथे माझे लग्न होईल, तिथे माझ्या आई-वडिलांनीही माझ्यासोबत शिफ्ट करीन.

मी जिथे लग्न करुन राहिन त्याच्या आसपासच त्यांना घर घेईन. जया किशोरीचे तिच्या पालकांवर खूप प्रेम आहे आणि तिला त्यांच्यापासून वेगळे व्हायचे नाही. ती म्हणते की मी खूप घाबरते कारण एक मुलगी असल्याने मला लग्नानंतर एक दिवस घर सोडून दुसरीकडे जावे लागेल. यासोबत तिने सांगितले की, ती तिच्या आई-वडिलांशिवाय तिच्या आयुष्याची कल्पनाही करू शकत नाही, त्यामुळे तिला नेहमी तिच्या कुटुंबासोबत राहायचे आहे

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !