Headlines

के जी एफ फेम अभिनेता यशने खरेदी केली नवीन रेंज रोव्हर SUV लक्झरी कार, किंमत ऐकून व्हाल आश्चर्यचकित !

आपल्यापैकी अनेकांनी के एफ जी हा चित्रपट पाहिला असेल. केएफजी या चित्रपटात अभिनेता यशने अत्यंत महत्त्वाची भूमिका केली आहे. या भूमिकेमुळे यशला प्रसिद्धी देखील मिळाली. चाहत्यांनी अक्षरशः अभिनेता यशला डोक्यावर घेतले. नुकतेच काही दिवसापूर्वी अभिनेता यशने एक नवीन गाडी खरेदी केली आहे.

या गाडीचे नाव रेंज रोव्हर एसयूव्ही लक्झरी कार आहे. या गाडीची किंमत करोडो रुपये आहे. सोशल मीडियावर यश चे फोटो व्हायरल होत आहे. या फोटोमध्ये यश त्याच्या कुटुंबीयांसोबत आपल्याला दिसत आहे. या फोटोमध्ये अभिनेता यश पत्नी राधिका पंडित आणि मुले आपल्याला एका कार शोरूम मध्ये उभे असलेले दिसत आहेत आणि पाठीमागे आलिशान कार देखील दिसत आहे.

काळ्या रंगाच्या टी-शर्ट मध्ये अभिनेता यश खूपच हँडसम दिसत आहे तसेच ब्लू रंगाच्या कपड्यांमध्ये यश ची पत्नी राधिका पंडित सुंदर दिसत आहे. सोशल मीडियावर अभिनेता यश चा एक नवीन व्हिडिओ व्हायरल होत आहे. या व्हिडिओमध्ये हा अभिनेता कार ड्राईव्ह करत आहे. यश च्या शेजारी त्याची पत्नी बसलेली आहे. सोशल मीडिया रिपोर्टनुसार या गाडीची किंमत चार कोटी रुपये पेक्षा जास्त आहे.

रेंज रोवर एसयूव्ही या कारच्या किंमत अडीच कोटी पासून सुरू होऊन चार कोटी रुपयांपर्यंत आहे तसेच वेगवेगळे मॉडेल देखील आपल्याला बाजारामध्ये पाहायला मिळतात. अभिनेता यश हा कार लव्हर आहे, त्याने आतापर्यंत वेगवेगळ्या गाड्या चालवलेल्या आहेत. अभिनेता यश आपल्या अभिनय शैलीमुळे प्रसिद्ध तर आहे पण त्याचबरोबर तो कार रायडीग देखील मोठ्या प्रमाणावर करत असतो.
Watch Video here
जेव्हा जेव्हा त्याला वेळ मिळतो तेव्हा आपल्या पत्नीसोबत रायडीग ला जातो. यश चे अनेक फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर पाहायला मिळतात. या व्हिडिओवर त्याचे फॅन्स मोठ्या प्रमाणावर प्रतिसाद देखील करतात. अनेकदा त्याचे व्हिडिओ मोठ्या प्रमाणावर लाईक आणि शेअर केलेले पाहायला मिळतात.

अभिनेता यश कडे कारचे कलेक्शन देखील मोठ्या प्रमाणावर पाहायला मिळतात. यश कडे 78 लाख रुपयाची मर्सिडीज जी एल सी 250 डी आहे. 80 लाख रुपयांची ऑडी क्यू सेवन 70 लाख रुपयांची बी एम डब्ल्यू याशिवाय स्पोर्ट कार पजेरो देखील आहे या सर्वांवरून आपल्याला अभिनेता यश कार लव्हर आहे याची माहिती मिळते.