बॉलिवूडचा सुपर डांसर प्रभुदेवा ३ एप्रिल रोजी ४७ वर्षांचा झाला.आतापर्यंत डान्सिंग, कोरिओग्राफी, अभिनय आणि दिग्दर्शन या सर्वच क्षेत्रात प्रभूदेवाने स्वतःची अशी वेगळी जागा निर्माण केली आहे. नुकताच प्रदर्शित झालेला स्ट्रीट डान्सर ३ या चित्रपटात प्रभूदेवा दिसला होता. त्याच्या वाढदिवसानिमित्त आम्ही तुम्हाला प्रभुदेवा संबंधित काही खास गोष्टी सांगणार आहोत.
प्रभुदेवा यांना भारताचा मायकल जॅक्सन असे म्हटले जाते. प्रभु देवा डान्स, कोरिओग्राफर आणि दिग्दर्शक तर आहेतच पान शिवाय ते एक अभिनेता म्हणून सुद्धा खूप उत्तम आहेत त्यानी हिंदी चित्रपटांमध्ये स्वतःचा अभिनय दाखवला आहे. आता प्रभुदेवा हे जॅक्सननुमा डान्स साठी प्रसिद्ध असले तरी ते एक क्लासिकल डान्सर आहेत. एका मुलाखतीत प्रभूदेवाने त्यांच्या आयुष्यातील प्रवासाबद्दल सांगितले होते.
या मुलाखतीत प्रभूदेवाने सांगितले होते की मी खरंतर एक क्लासिकल डान्सर आहे. मी भरत नाट्यम शिकलो आहे. पण त्याच वेळी मायकल जॅक्सनचा एक अल्बम थ्रिलर आला होता. जेव्हा मी तो अल्बम बघितला तेव्हा तर मी खूप हैराण झालो होतो की हा माणूस आहे कोण? माझ्यावर मायकल जॅक्सनचा खूप प्रभाव आहे. यानंतर प्रभुदेवा ने सांगितले की मी लहानपणी अभ्यासात तितका चांगला नव्हतो.
माझे वडील फिल्म इंडस्ट्री मध्ये एक कोरियोग्राफर होते. त्यामुळेच मी सुद्धा डान्स करू लागलो आणि कोरीयोग्राफर झालो. माझ्या मनाच्या जवळ नृत्या शिव्या दुसरी अशी कोणतीच गोष्ट नाही. बीबीसी सोबत झालेल्या एका मुलाखतीत एक उत्तम डान्सर बनण्यासाठी काय आवश्यक आहे असा प्रश्न प्रभुदेवा ला विचारला गेला.
त्यावेळी प्रभुदेवां नी सांगितले की उत्तम डान्सर बनण्यासाठी तुमच्यात डान्स बद्दल रुची आणि भरपूर सराव करण्याची जिद्द या दोन गोष्टी महत्वाच्या आहेत. प्रभुदेवा यांनी आतापर्यंत वॉन्टेड, आर राजकुमार, राउडी राठोड यांसारख्या चित्रपटांचे दिग्दर्शन केले आहे. प्रभुदेवा यांच्या मते अभिनय आणि दिग्दर्शनात त्यांना दिग्दर्शन करणे खूप कठीण आहे असे त्यांना वाटते. त्यांचे असे म्हणणे आहे की दिग्दर्शन करताना जिम्मेदारी आणि टेंशन खूप असते.
परंतु तरीही मला या सर्व गोष्टी करून पाहणे मला खूप आवडते. सध्या भारतीय चित्रपसृष्टी खूप बदलत चालली आहे यावर बोलताना प्रभदेवा यांनी सांगितले की मागील काही वर्षांत भारतीय फिल्म इंडस्ट्री मध्ये करण्यात येणाऱ्या नृत्यात खूप बदल झाले आहे. आता कोणताही मुलगा मुलगी सहज डान्स करू शकतात. परंतु आधी असे नव्हते. आता टिव्ही वर इतके डान्स शो, रियालिटी शो येतात जे खूप कमाल असतात. त्यातून खूप काही शिकता येते.
Bollywood Updates On Just One Click