सिनेअभिनेत्री मिनिषा लांबा हिचा १८ जानेवारी रोजी वाढदिवस असतो. बॉलीवूडमध्ये प्रवेश करायच्या आधी मिनिषाला पत्रकार बनायचे होते परंतु मॉडलिंग क्षेत्रात पाऊल ठेवल्यावर तिचे नशिब बदलून गेले. तिच्या महाविद्यालयीन वयापासूनच तिने मॉडलिंग करायला सुरुवात केली होती. मिनिषाने मोठमोठ्या कंपनीच्या जाहिरातींमध्ये काम केले आहे. एका कंपनीच्या जाहिरातीत काम करतेवेळी तिच्यावर निर्माता शुजित सरकार यांची नजर पडली. शुजीत सरकार यांनी मिनिषाला चित्रपटांमध्ये काम करण्याची ऑफर दिली. त्यानंतर २००५ मध्ये मिनिषाने शुजित सरकारच्या ‘यहॉं’ या चित्रपटाद्वारे बॉलिवुडमध्ये पहिले पाऊल टाकले. त्याचबरोबर मनिषा बिग बॉस सीजन ८ चीस्पर्धक देखील होती.
एकेकाळी बॉलिवूडमधील अभिनेते तथा राजकीय नेते असलेले राज बब्बर यांच्या मुलाशी म्हणजेच आर्य बब्बरशी मिनिषा चे अफेअर असल्याचे इंडस्ट्रीमध्ये चर्चा होती. बिग बॉस सीजन ८ मध्ये मिनिषा व आर्य दोघांनीही स्पर्धक म्हणून भाग घेतला होता. त्याच वेळी आर्यने शो मध्ये सांगितले की त्याने मिनिषाला याआधी डेट केले आहे. परंतु बिग बॉस मधून बाहेर पडल्यावर मिनिषाने या सर्व अफवा असल्याचे सांगितले. मिनिषाने सांगितले की तिने कधीच आर्यला डेट केलेले नाही. त्याने शोमध्ये साफ खोटे सांगितले. मिनिषाने असेही सांगितले की, मी आणि आर्यने अनेक चित्रपटांमध्ये एकत्र काम केले आहे. त्यामुळेच आमच्यात चांगले मैत्रीपूर्ण संबंध आहेत. याहून अधिक आमच्या मध्ये काहीच नाही. त्यानंतर सलमान खानच्या सांगण्यामुळे आर्यने लाईव्ह शोमध्ये मिनिषाची सॉरी बोलून माफी मागितली होती.
मिनिषाने २०१५ मध्ये गुपचूप तिच्या बॉयफ्रेंड सोबत म्हणजेच रेयान थामसोबत लग्न करून सर्वांना चकित केले. रियान व मिनिषाने रजिस्टर पद्धतीने लग्न केले. त्यांच्या लग्नात फक्त त्यांच्या जवळचे नातेवाईक आले होते. मिनिषा चे पती रियान नाईट क्लब चे मालक आहेत. त्यानंतर मिनिषा अचानक तिच्या ओठांची व नाकाची सर्जरी झाल्यानंतर चर्चेत आली. ही सर्जरी केल्यामुळे तिच्या लूकमध्ये खूपच बदल झाले. ह्यामुळेच तिला सोशल मीडियावर खूप ट्रोल देखील करण्यात आले होते.
मिनिषाने लग्न करण्याआधी दोन वर्षे रेयानला डेट केले होते. त्यानंतर या दोघांनी लग्नगाठ बांधली. मिनिषाने तिच्या ९ वर्षांच्या करिअरमध्ये १८ चित्रपटांमध्ये काम केले आहे. ज्यात हे बेबी, ये हसीनो, वेल डन अब्बा यांसारखे चित्रपट आहेत. याव्यतिरिक्त मिनिषाने एलजी, सोनी, कॅडबरी यांसारख्या प्रसिद्ध ब्रँडच्या जाहिरातींसाठी काम केले आहे. सर्वात शेवटी मिनिषाला ऑगस्ट २०१८ ते मार्च २०१९ मध्ये कलर्स चैनल वर प्रसारित होणाऱ्या ‘इंटरनेट वाला लव’ या मालिकेमध्ये बघितले गेले होते.
Bollywood Updates On Just One Click