नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशन ने अभिनेत्री तनुश्री दत्ता वर २५ करोड रुपयांची मानहानीची केस नोंदवली आहे. #Metoo या मोहिमेत प्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर अभिनेत्री तनुश्री दत्ता यांनी चुकीच्या पद्धतीने स्पर्श केल्याचा आरोप केला होता. त्यानंतर नाना पाटेकर यांच्या नाम फाउंडेशन ने तनुश्रीदत्ता यांच्यावर २५ करोड रुपयांच्या मानहानीची केस नोंदवली. त्याचबरोबर मुंबई हाय कोर्टाने तनुश्री वर कोणत्याही प्रेस कॉन्फरन्स दरम्यान नामा फाउंडेशन वर कोणत्याही प्रकारचे आरोप करण्यास बंदी घातली आहे.
या सुनावणीदरम्यान तनुश्री कोर्टामध्ये हजर नव्हती. त्यावेळी न्यायमूर्ती एके मेनन यांनी नाम फाउंडेशन या एनजीओला थोडा दिलासा दिला. तनुश्री ने याआधी या एनजीओ वर भ्रष्टाचारा सोबत अजूनही काही आरोप लावले आहेत. रिपोर्टनुसार हायकोर्टात दाखल असलेला याचिके मध्ये नाना पाटेकर आणि मकरंद अनासपुरे यांनी २०१५ मध्ये नाम फाउंडेशन नावाची एनजीओ सुरू केली.
या एनजीओ द्वारे कोरड्या आणि दुष्काळग्रस्त प्रदेशातील शेतकऱ्यांना योग्य ती दिशा दाखवून त्यांना मदत केली जाते. परंतु तनुश्री दत्ता ने जानेवारी २०२० मध्ये एका प्रेस कॉन्फरन्स दरम्यान या एनजीओ वर आरोप लावले ज्यामुळे त्यांच्या प्रतिष्ठेला धक्का पोहोचला.
तनुश्री दत्ता च्या म्हणण्यानुसार दहा वर्षांनी मी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. परंतु काही दिवसांनी सोशल मीडियावर अशा बातम्या येत होत्या की या सर्व प्रकरणातून नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाली आहे. ही गोष्ट साफ चुकीची आहे. नाना सारख्या राक्षसांना मी कधीच सोडणार नाही. यासाठी मला थोडा वेळ लागेल परंतु मी न्याय व्यवस्थेची मदत घेईन.
तनुश्री असेही सांगितले की नाना पाटेकर शेतकऱ्यांना मदत करण्याचे सोंग करतात. अशा गोष्टी करण त्यांची प्रतिमा समाजात स्वच्छ राहील असे त्यांना वाटते. शेतकऱ्यांना मदतीसाठी लागणाऱा पैसा ते काही त्यांच्या खिशातून देत नाही. त्यांची एक एनजीओ आहे जी लोकांकडून पैसे घेत असते व त्यातील छोटासा हिस्सा शेतकऱ्यांना मदत म्हणून देते. आणि उरलेले पैसे स्वतःच्या खिशात घालते.
तनुश्री ने नानां%LS
Bollywood Updates On Just One Click