काजोल आणि अजय देवगण हे हिंदी चित्रपट सृष्टीतील अविरत टिकलेल्या जोडप्यांपैकी एक जोडपं. हे दोघेही त्यांच्या चित्रपटांमुळे चर्चेत असतात. तरं सोबतच त्यांची मुलगी न्यासा देखील चर्चेत असते. न्यासाचा फॅशन सेन्स चाहत्यांना फार आवडतो. न्यासाचे फोटो आणि व्हिडिओ हे सोशल मीडियावर व्हायरल होतात. हल्लीच काजोलने तिच्या मुलीचे काही फोटो इंस्टाग्रामवर पोस्ट केले आहेत.
या फोटोमध्ये न्यासा पारंपरिक वेषामध्ये दिसत आहे. न्यासा फार कमी वेळेस पारंपरिक पेहराव करणं पसंद करते. तिच्या या फोटोला सर्वांनीच पसंती दर्शवली. न्यासाने त्या फोटोमध्ये सोनेरी रंगाचा लेहेंगा परिधान केला आहे. वेगवेगळ्या पोझमध्ये फोटो काढले आहेत. कानात मोठे कानातले व मोकळे केस असा तिचा पेहराव आहे.
काजोलने पोस्ट केलेल्या फोटोसाठीच्या कॅप्शनमध्ये तिने लिहले आहे, “भीतीच्या या वातावरणामध्ये आपल्याला खुश होण्यासाठी एका गोळीची गरज आहे, माझी मुलगी झाल्याबद्दल तुझे आभार!” काजोलने केलेल्या या पोस्टला सहा लाख लाइक्स मिळाले आहेत. काजोलची बहीण तनिषाने या पोस्ट वर कमेंट करत म्हटले आहे, “माझी राजकन्या”.
बऱ्याच चाहत्यांनी तिच्या फोटोवर कमेंट केल्या आहेत. याआधी अनेकदा न्यासा ही तिने परिधान केलेल्या कपड्यांवरून ट्रोल झाली आहे. हल्लीच काजोलने न्यासाला ट्रोल केल्याबाबतीत भाष्य केले होते.
काजोलने पिंकविलाला दिलेल्या मुलाखतीमध्ये ती म्हणाली, “मला हे फार भयानक वाटतं. आई-वडिलांच्या रूपामध्ये आपण नेहमी आपल्या मुलांचे रक्षण करु पाहत असतो. त्यामुळे जेव्हा तिला ट्रोल केलं जातं तेव्हा ती फार निराश होते. पण देवाच्या कृपेने जेव्हा हे सर्व ट्रोल करणं सुरु होतं तेव्हा न्यासा इथे नव्हती. त्यामुळे तिला बाबतीत जास्त काही माहीत नाही. ती यावेळेस सिंगापूरला होती, पण शेवटी सोशल मीडिया हा सोशल मीडिया आहे आणि ते प्रत्येक ठिकाणी असतं.”
Bollywood Updates On Just One Click