हिंदी चित्रपटसृष्टीतील यशस्वी कारकीर्द गाजवलेली एक अभिनेत्री म्हणजे रवीना टंडन. रवीना टंडनचा पहिला चित्रपट “पत्थर के फूल” हा इतका हिट ठरला की त्या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्कार मिळाला. त्यानंतरचे “मोहरा”, “दिलवाले”, “लाडला” हे चित्रपट देखील बॉक्स ऑफिसवर हिट ठरले.
त्याचबरोबर अक्षय कुमार सोबत देखील रवीना टंडनने अनेक चित्रपट केले. त्यांची जोडी बॉक्स ऑफिस वर हिट ठरत होती. चित्रपटातचं नाही तर प्रत्यक्ष आयुष्यात देखील ते प्रेमी युगल होतं. रवीना अगदी अक्षय कुमारच्या प्रेमात रंगून गेली होती. पण त्यांच्या नशिबात एकत्र येणं नव्हतं.
अक्षय आणि रवीना एकमेकांपासून दूर गेल्यानंतर रवीना फार खचली होती. ती परिस्थिती एखाद्या मोठ्या संकटापेक्षा कमी नव्हती. हल्लीच झालेल्या एका मुलाखतीमध्ये याबद्दल तिने भाष्य केले. अक्षय कुमारपासून वेगळं झाल्यावर खूप दुःख तिला झेलावे लागले. अक्षयपासून लांब होण्याचा तिला इतका त्रास होतं असे की ती घरात न राहता रात्र रात्रभर रस्त्यावर फिरत असे.
ती मुलाखतीदरम्यान म्हणाली, “त्या दिवसांमध्ये माझं घरी बिलकुल मन लागत नसे, त्यामुळे घराच्या बाहेर राहणं मी पसंत करत असे. त्या दिवसांमध्ये माझं फार मानसिक खच्चीकरण झालं होतं.” आणि या सर्व गोष्टींचा परिणाम तिच्या अभिनय क्षेत्रावर झाला.
मुलाखतीदरम्यान तिने त्या दिवसांतील एक घटना सांगितली, त्या दिवसांमध्ये जेव्हा एका रात्री खूप चिंतेत होती आणि मला अगदी एकटं पडल्यासारखं वाटतं होतं. म्हणून मी मुंबईच्या रस्त्यांवर रात्री 3 वाजता एकटीच फिरत होती. तेव्हा एका झोपडपट्टीमध्ये राहणाऱ्या महिलेचा पती तिच्याशी भांडत होता, तिला मारत होता.
ती रडत होती, कण्हत होती; पण तितक्यात तिचं लहान बाळ तिच्याकडे येतं आणि थोड्याच वेळानंतर ती महिला आपल्या बाळाशी रस्त्यावर खेळू लागली. त्या बाळाबरोबर खेळताना बिलकुल जाणवतं नव्हतं की ती महिला थोड्या वेळापूर्वी दुःखी होती.
या घटनेमुळे रवीना टंडनला हिम्मत मिळाली आणि रवीना म्हणाली त्या महिलेला बघून मी स्वतःलाच म्हटलं, एक व्यक्ती आपल्या आयुष्यातून निघून गेल्याने आपण इतके दुःखी का होतं आहोत, त्या बाळाबरोबर खेळणाऱ्या त्या महिलेकडे तर ना घर आहे, ना गाडी, ना कोणत्याही सोयी-सुविधा आहेत, तरीही किती हिमतीने ती प्रत्येक अडचणीला सामोरी जाते.
याउलट माझ्याकडे तरं सर्वकाही आहे, करोडोंचे घर आहे, महागड्या गाड्या आहेत, नोकर आहेत, ऐषोआराम आहे, तरीही मी दुःखी आहे.” या एका घटनेमुळे रवीनाचे आयुष्य बदलले आणि तिने मनाशी निश्चित केलं की घडून गेलेल्या गोष्टी विसरून जाऊन एक नवी सुरुवात करूया.
तिच्या याच निर्णयामुळे ती आज तिच्या परिवारासमवेत खूप आनंदी आहे. म्हणूनच म्हटलं जातं की कोणाच्या येण्याने आणि निघून जाण्याने आयुष्य थांबत नसतं, फक्त जगण्याची पद्धत बदलून जाते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !