Headlines

रोमी देव यांच्या लुक मध्ये दिसली दीपिका पादुकोण, तिला पाहता क्षणी नजर हरपुन बसला रणवीर सिंह !

बॉलीवूड मधील सध्याचा आघाडीचा अभिनेता रणवीर सिंह चा बहुचर्चित ‘८३’ हा चित्रपट येऊ घातला आहे. या चित्रपटाच्या प्रदर्शनाची सर्वजण आतुरतेने वाट पाहत आहेत. जेव्हापासून चित्रपटाचा पहिला पोस्टर प्रदर्शित करण्यात आला आहे तेव्हापासूनच प्रेक्षकांच्या मनातील या चित्रपटा प्रति उत्सुकता शिगेला पोहोचली आहे. नुकतेच अभिनेत्री दीपिका पादुकोण ने या चित्रपटातील तिचा कपिल देव यांच्या पत्नीचा रोमी देव यांच्या रूपातील पहिला लूक रिलीज केला. तिच्यामते हा चित्रपट त्या महिलांना समर्पित आहे ज्या स्वतःची स्वप्न पूर्ण करण्याच्या आधी त्यांच्या पतींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी मदत करतात.
या पोस्टरमध्ये दीपिका तिच्या खऱ्या आयुष्यातील पतीकडे म्हणजेच रणवीर सिंह कडे बघून स्मितहास्य देताना दिसते. या चित्रपटात रणवीर सिंह कपिलदेव यांची भूमिका साकारत आहे. या पोस्टरमध्ये दीपिकाने काळा रंगाचा टॉप आणि पीच कलर मध्ये बॉटम घातली आहे. त्याचप्रमाणे तिचे केस या मध्ये छोटे दाखवण्यात आले आहे. या पोस्ट मधील तिचा लुक फारच वेगळा आहे.
सोशल मीडियावर हा फोटो पोस्ट केल्यावर दीपिकाने त्याखाली कॅप्शन लिहिले आहे की, भारतीय खेळांच्या इतिहासातील सर्वाधिक महत्त्वाच्या मानल्या जाणाऱ्या क्षणावर हा चित्रपट तयार केला गेला आहे. आणि या चित्रपटाचा एक छोटा का होईना हिस्सा असल्याचा मला खूप अभिमान वाटतो. त्यापुढे तिने असे लिहिले आहे की, आपल्या पतीच्या पेशेवर व वैयक्तिक इच्छांच्या पूर्ततेसाठी एक पत्नी सर्वात मोठी भूमिका निभावत असते. हे मी माझ्या आईच्या बाबतीत खूप जवळून बघितले आहे. आणि ‘८३’ हा चित्रपट त्या महिलांना समर्पित आहे ज्या स्वतःची स्वप्न सोडून आपल्या पतींचे स्वप्न पूर्ण करण्यासाठी झगडत असतात.
कपिल देव यांच्या रूपातील रणवीर सिंह याचा पहिला पोस्टर लोकांना खूपच आवडला होता. या पोस्टरमध्ये रणवीर कपिल देव यांच्या लोकप्रिय नटराज शॉट ह्या पोज मध्ये दिसत आहे. रणवीर सिंह याच्या व्यतिरिक्त या चित्रपटात साकिब सलीम, मोहिंदर अमरनाथ आणि चिराग पटेल, संदीप पाटील यांच्या देखील भूमिका आहेत.
रणवीरच्या ‘८३’ चित्रपटात जिव्हा आणि ताहीर भसिन यांच्याव्यतिरिक्त चिराग पाटील, हार्डी संधू, पंकज त्रिपाठी सुद्धा आहेत. हा चित्रपट १९८३ मध्ये झालेल्या क्रिकेट वर्ल्डकप चा कहानी वर आधारित आहे. हा चित्रपट दीपिका पादुकोण, कबीर खान, विष्णुवर्धन इंदुरी, साजिद नाडियावाला, फँटम फिल्म, रिलायन्स एंटरटेनमेंट आणि ‘८३’ फिल्म लिमिटेड यांनी मिळून दिग्दर्शित केला आहे. हा चित्रपट हिंदी तमिळ आणि तेलुगू भाषेत १० एप्रिल २०२० रोजी प्रदर्शित होईल.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *