Headlines

गौतमी पाटील हिला 3 गाण्यासाठी काही लाख मोजतात, आणि आम्हाला … इंदुरीकर महाराज असं काय म्हणाले गौतमीबद्दल?

सध्या संपूर्ण महाराष्ट्र गौतमी पाटीलची हवा आहे. वाढदिवस असो किंवा बारसा आपला कार्यक्रम दणक्यात साजरा होण्यासाठी प्रत्येकाला गौतमी पाटील आपल्या कार्यक्रमात हवी असे वाटते. त्यासाठी अनेक जण लाखो रुपये खर्च करतात आणि गौतमी पाटीलला आमंत्रण देतात.

पूर्वी कार्यक्रमांना सेलिब्रिटींना आमंत्रित केले जायचे पण आता त्यांची जागा या गौतमी पाटील ने घेतली आहे. गौतमीची जितकी मागणी आहे तितकीच तिच्यावर टीकाही होत असते. तिच्या डान्सला अश्लील म्हटले जाते. मध्यंतरी या एका टीकांवर गौतमीने जाहीर माफी मागितली होती. आता तिच्यावर सुप्रसिद्ध इंदुरीकर महाराज यांनी टीका केली आहे.

आष्टी तालुक्यातील तवलवाडी येथे इंदुरीकर महाराजांचे कीर्तन झाले त्यावेळी महाराजांनी कोणाचाही नाव न घेता टीका केली. पण त्यांच्या बोलण्याचा रोख हा गौतमी पाटील वर असल्याचा सर्वांच्या लक्षात आले. आम्ही पाच हजार मागितले तर पैशांचा बाजार मांडला असा आरोप होतो.

कीर्तनकारांनी 5 हजार रुपये मागितले तर काय खरं आहे त्यांचं, असं म्हणतात. पण तिकडे तीन लाखाला तीनच गाणी ऐकतात आणि 300 पोरांच्या चडड्या फाटतात. 200 पोरांचे गुडघे फुटतात. मारामाऱ्या झाल्या. शेतकरी तुम्ही बोलयाचे नाही. आम्ही रस्त्यावर कीर्तन करतो. आमचं जीवन वाऱ्यावर. आम्हाला काय संरक्षण आहे? आम्हाला विमा नाही. जे जे लोक खरं काम करतात त्यांचा भोंग्या करायचा. तुम्ही बधिर आहे, म्हणून चाललंय सगळं. मी गेल्यावर कळेल तुम्हाला हा काय बोलत होता, असं इंदुरीकर महाराज म्हणाले.

ते पुढे म्हणाले की, काळ किती वाईट आलाय. लग्नाला जायचं नाही. मौतीला जायचं नाही. कार्याला गेला नाही. आपण एखाद्या दहाव्याला गेलो पण दिसला नाही, असं लोक म्हणतात. तेव्हा दुसरा म्हणतो तो दुसऱ्या पार्टीत आहे. इतका काळ वाईट आला आहे, असं सांगतानाच प्रत्येकाने धर्मनिष्ठ राहा. कुणाच्याही धर्माचा अवमान करू नका.

शिवाजी महाराज, संभाजी महाराज आणि तुकाराम महाराज किंवा आपल्या प्रिय व्यक्तीबद्दल कुणी मोबाईल क्लिप टाकली तर लगेच व्हायरल करू नका. चुकीची असेल तर डिलीट करा. तुकाराम महाराज आपले बाप आहे. शिवाजी महाराज आपले प्राण आहेत. त्यामुळे कुणाच्याही अपप्रचाराला बळी पडू नका.