गेल्यावर्षी बॉलीवूड अभिनेत्री तनुश्री दत्ता सुप्रसिद्ध अभिनेते नाना पाटेकर यांच्यावर काही आरोप लावले होते त्यामुळे सोशल मीडियावर #Mitoo ही मोहीम मोठ्या प्रमाणावर राबवली गेली होती. आता या गोष्टीला एक वर्षाहून अधिक काळ लोटला आहे. हल्लीच तनुश्री पुन्हा भारतात आली असून तिने पुन्हा नाना पाटेकर वर केस करण्याचे व त्यांना धडा शिकविण्याचा हट्ट धरला आहे. काही दिवसांपूर्वीच एका मुलाखतीदरम्यान तनुश्री ने नाना पाटेकर आणि बॉलिवूडमधील इतर कलाकारांच्या वेगळ्या चेहर्या बद्दल चर्चा केली. या मुलाखतीत तनुश्रीने नाना पाटेकर यांच्या वर आरोप लावले की त्यांनी तिचे करिअर बरबाद केले असून ती आता त्यांना सोडणार नाही.
बॉलिवूड कलाकारांच्या अशा वेगळ्याच रूपा बद्दल बोलताना तनुश्रीने सांगितले की गेल्या वर्षी माझ्या मुद्द्यावर अनेक बॉलिवूड अभिनेत्रींनी मला ट्वीट करून समर्थन दिले. मात्र जेव्हा त्यांच्या चित्रपट दिग्दर्शकांनी मी टू वर आरोप केला तेव्हा त्या त्यांच्या दिग्दर्शकांच्या बाजूने उभ्या राहिल्या. बॉलिवूड अभिनेत्री स्वतःला स्त्रीवादी म्हणतात परंतु हा फक्त तोंडदेखला स्त्रीवाद आहे. त्यांच्या करण्यात व बोलण्यात जमीन अस्मानाचा फरक आहे.
तनुश्री असेही सांगितले की गेल्या वर्षी एका निर्मात्याने तिला चित्रपटासाठी ऑफर दिली होती मात्र तिने ती ऑफर स्वीकारली नाही. आणि याचे कारण हेच होते की त्या निर्मात्याचे नाव मी टू मध्ये आरोपी म्हणून घेतले जात होते. आता मला सांगा जर कोणाला दहा वर्षांनी एवढी चांगली ऑफर मिळत असेल तर ती कोणी नाकारेल का? तरी मि ती नाकारले कारण मी माझ्या तत्त्वांवर व सिद्धांतावर ठाम आहे. मी जे बोलते तेच करते सुद्धा. या मुलाखतीत तनुष्री ने असेही सांगितले की जेव्हा एखादा कलाकार एनजीओ खोलतो तेव्हा तो एक नाटक करत असतो. जेव्हा चित्रपटांमध्ये त्याचे करिअर संपते तेव्हा तो कलाकार त्याच्या खऱ्या आयुष्यात अभिनय करू लागतो.
त्यानंतर नाना पाटेकर यांच्यावर निशाणा साधून तनुश्री बोलले की मी त्यांना सोडणार नाही. नाना यांनी माझ्यासोबत खूप वाईट केले आणि त्यानंतर संपूर्ण इंडस्ट्रीमध्ये असा एक माहोल केले की माझे करियरच संपून गेले. मी माझे करिअर घडवण्यासाठी खूप मेहनत घेतली होती. यासाठी मी कोणाचेच तळवे चाटले नव्हते की कोणाची हूजुरी सुद्धा केली नव्हती आणि कोणासोबत अनैतिक कृत्य सुद्धा केले नव्हते. नानांनी माझे संपूर्णपणे मानसिक खच्चीकरण केले. त्यांच्यामुळेच इंडस्ट्रीत माझ्याबद्दल गैरसमज निर्माण झाला.
दहा वर्षांनी मी या अन्यायाविरुद्ध आवाज उठवला होता. परंतु काही दिवसांनी सोशल मीडियावर अशा बातम्या येत होत्या की या सर्व प्रकरणातून नाना पाटेकर यांना क्लीन चिट मिळाली आहे. ही गोष्ट साफ चुकीची आहे. नाना सारख्या राक्षसांना मी कधीच सोडणार नाही. यासाठी मला थोडा वेळ लागेल परंतु मी न्याय व्यवस्थेची मदत घेईन. तनुश्री असेही सांगितले की नाना पाटेकर शेतकऱ्यांना मदत करण्याचे सोंग करतात. अशा गोष्टी करण त्यांची प्रतिमा समाजात स्वच्छ राहील असे त्यांना वाटते. शेतकऱ्यांना मदतीसाठी लागणाऱा पैसा ते काही त्यांच्या खिशातून देत नाही. त्यांची एक एनजीओ आहे जी लोकांकडून पैसे घेत असते व त्यातील छोटासा हिस्सा शेतकऱ्यांना मदत म्हणून देते आणि उरलेले पैसे स्वतःच्या खिशात घालते.
तनुश्री ने नानांवर आरोप लावला होता की दहा वर्षांपूर्वी हॉर्न ओके प्लीज या चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान नानांनी तिला एक वेगळाच स्पर्श केला होता. यामुळेच सध्या हे सर्व रामायण घडत आहे.
Bollywood Updates On Just One Click