बॉलिवूड अभिनेत्री दिया मिर्झा सध्या तिच्या वैयक्तिक आयुष्यासाठी खूप चर्चेत आहे. दियाने गेल्या वर्षी तिचा पती साहिल संघा सोबत घटस्फोट घेतला. दियाचे साहिल सोबत ५ वर्षापूर्वी विवाह झाला होता. इंडस्ट्रीमध्ये दिया व साहिलला एक हॅपी कपल मानले जायचे. दियाने साहिलसोबत १८ ऑक्टोबर २०१४ मध्ये लग्न केले होते. हे दोघे गेली ११ वर्षे एकमेकांसोबत होते. परंतु अचानक गेल्यावर्षी दोघांनी घटस्फोट झाल्याचे जाहीर केले. त्याच्या वैवाहिक आयुष्यात प्रॉब्लेम असतील अशी कोणाला साधी भणक सुद्धा नव्हती.
दीयाने त्यांच्या घटस्पोटाबद्दल जास्त काही सांगितले नव्हते परंतु हल्लीच झालेल्या एका मुलाखतीमध्ये दियाने सांगितले की माझे काम मला दुःखी राहण्याची परवानगी देत नाही. हे दुःख सोसायची ताकद मला माझ्या आई वडिलां मुळे मिळाली जे ३४ वर्षापूर्वीच विभक्त झाले होते. जर मी वयाच्या ४ थ्या वर्षी हे दुःख पेलू शकत असेन तर आता वयाच्या ३७ व्या वर्षी विभक्तीची दुखः सोसणे ही कोणतीच मोठी गोष्ट नाही. विभक्त होणे ही खूप मोठी गोष्ट असते परंतु वेळ आल्यास तो निर्णय घ्यावा लागतो. आजकाल लोक हा निर्णय घेण्यास कचरतात कारण त्यांना वाटते की ही छोटी गोष्ट आहे आणि काही दिवसातच यावर उपाय निघू शकेल.
दियाने तिच्या व साहीलच्या विभक्तीबद्दल कोणताच पश्र्चाताप होत नसल्याचे सांगितले. तिचे असे म्हणने आहे की तिची याबाबत कोणतीच तक्रार नाही कारण ती वयाच्या १४ वर्षांपासून ध्यान लावते. तिची प्रत्येक सकाळ सुंदर बागेत सुरू होते. तिच्या घरासमोर सुद्धा खूप हिरवळ आहे. तिथे तिला मनःशांती मिळते. बाहेरील दुनियेत मात्र सगळीकडे द्वेष पसरला आहे. ती सोशल मीडिया मधून सुद्धा दिसत असतो.
येत्या दिवसात दिया थप्पड या चित्रपटात दिसेल. याशिवाय दिया सध्या मुघल नावाच्या वेबसीरिजमध्ये सुद्धा काम करत आहे. दिया मिर्झा चित्रपटासोबतच पर्यावरण विषयक विषयांवर आवाज उठवताना दिसते. २०१८ मध्ये आलेल्या संजू या चित्रपटात सुद्धा दिया दिसली होती. या चित्रपटात तिने मान्यता दत्त ची भूमिका साकारली होती. काफिर या वेबसीरिजमुळे सुद्धा ती चर्चेत आहे
Bollywood Updates On Just One Click