चित्रपटामध्ये काम करणारा कलाकारांचे जीवन अगदी आयुष्य सुखाचे असते असे आपल्याला वाटते. परंतु शूटिंगच्या वेळा, शुटींग असणाऱ्या जागेपर्यंतचा प्रवास, त्यासाठीचा मेकअप अशा सर्वच गोष्टी येतात आणि त्यामुळे त्यांच्या खाण्यापिण्याच्या आरामाच्या वेळांमध्ये बदल होतो. योग्य आराम आणि खाणं-पिणं नसेल तर त्याचा आपल्या शरीरावर परिणाम होतो हे तर आपल्याला माहीतचं आहे. आणि या गोष्टी वेळेत न झाल्याने त्यांना शारीरिक आणि मानसिक त्रासाला सामोरे जावे लागते. तर आज आपण असेच काही कलाकार पाहूया जे गंभीर आजारांनी त्रासलेले आहेत.
१. प्रियंका चोपरा – भारतासोबतच विदेशात ही आपल्या अभिनयाचा ठसा उमटवणारी हिंदी चित्रपट सृष्टीतील सुंदर अभिनेत्री म्हणजे प्रियंका चोपडा. तिने हिंदी तसेच हॉलीवूड मधील चित्रपटांमध्ये काम केले आहे. ती नेहमी तिच्या वेगवेगळ्या फॅशनेबल कपड्यांमुळे चर्चा विषय असते. अनेक चित्रपट तिने केले आहेत. नेहमी आपल्याला सुंदर आणि आनंदी दिसणारी ही अभिनेत्री आतून मात्र आजाराने ग्रस्त आहे. प्रियांकाला अस्थमाचा त्रास आहे. ती 5 वर्षाची असल्यापासून तिला हा अस्थमाचा त्रास असल्याचे तिने स्वतः सांगितले आहे. तिला औषधांऐवजी इनहेल्स वापरण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला आहे. क्रिश 4 ह्या आगामी चित्रपटात प्रियांका दिसणार आहे.
२. सोनम कपूर – हिंदी चित्रपटसृष्टीतील फैशनिस्टा अभिनेत्री म्हणजे सोनम कपूर. भाग मिल्खा भाग, रांझना, प्रेम रतन धन पायो, निरजा अशा अनेक हिट ठरलेल्या सिनेमांमध्ये तिने काम केले आहे. निरजा या चित्रपटासाठी तिला राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार देखील मिळाला आहे. सोनम कपूरला डायबिटीज चा त्रास आहे. सोनमने आरोग्याला पोषक अशी जीवनशैली स्वीकारून ती या आजारावर नियंत्रण मिळवू शकली आहे.
३. अमिताभ बच्चन – हिंदी चित्रपट सृष्टीतील बिग बी आणि महानायक अमिताभ बच्चन आपल्याला वर वर अगदी तंदुरुस्त दिसतात. परंतु वयाच्या मानाने आतून त्यांना त्रास होतं असतो. १९७० पासून ते आतापर्यंत ते चित्रपटांमध्ये अभिनय करत आहेत. त्यांनी त्यांच्या आतापर्यंतच्या कारकिर्दीत तब्बल २०० चित्रपट केले आहेत. असे हे बिग बी खूप काळापासून लिव्हर सिरॉसिस नावाच्या आजाराने त्रस्त आहेत. या आजारामुळे अमिताभ यांचे फक्त २५ टक्के यकृत काम करते. लिव्हर सिरॉसिस या आजारामध्ये यकृतामधील पेशी नष्ट होऊ लागतात.
४. सलमान खान – एकावर एक हिट चित्रपट देणारा हिंदी चित्रपट सृष्टीतील अभिनेता म्हणजे सलमान खान. बीवी हो तो ऐसी, हम आपके है कौन, हम साथ साथ है, सुलतान, एक था टायगर आणि टायगर जिंदा है अशा अनेक चित्रपटांमधून मुख्य पात्राच्या भूमिकेमध्ये सलमान खानला काम करताना आपण पहिले आहे. परंतु आपला हा सल्लू भाई ट्राइजेमिनल न्यूरेल्जिया या घटक आजाराचा बळी ठरला आहे. या आजारामध्ये मज्जातंतूला असह्य वेदना होतात. या वेदना चेहऱ्यापासून मेंदूपर्यंत पोहचतात. काही वेळेस थोडासा ही गोंगाट सहन होत नाही, दात घासताना किंवा चेहऱ्यावर मेकअप केल्याने देखील हे दुखणे वाढू शकते. वैद्यकीय विज्ञानामध्ये या आजाराला जगातील सर्वात वेदनादायक आजार असल्याचे सांगितले आहे.