Headlines

या अभिनेत्री लग्न न करता त्यांच्या बॉयफ्रेंड सोबत लिव्ह इन मध्ये राहतात !

लग्न न करता बॉयफ्रेंड सोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहण्यास आपल्या समाजात मान्यता नाही. परंतु सिनेकलाकारांसाठी मात्र ही गोष्ट तितकीशी महत्वाची नाही. बॉलीवूड मध्ये असे अनेक कलाकार आहेत जे लग्न न करता सुद्धा आपल्या प्रेमिकेसोबत किंवा बॉयफ्रेंडसोबत एकत्र राहतात. तर आज आम्ही तुम्हाला अशा काही अभिनेत्री बद्दल सांगणार आहोत ज्या लग्न न करता सुद्धा त्यांच्या बॉयफ्रेंडसोबत राहतात.
एमी जैक्सन – बॉलीवुड अभिनेत्री एमी जैक्सन ही खूप काळापासून जॉर्ज पानायिटू सोबत नात्यात आहे. एमी जैक्सन आणि जॉर्ज पानायिटू हे दोघे खूप काळापासून एकमेकांना डेट करीत आहे. परंतु या दोघांनी अजूनही लग्न केलेले नाही. या दोघांची रोमँटिक केमिस्ट्री बऱ्याचदा सोशल मीडियावर दिसून येते. एमिने २३ सप्टेंबर २०१९ ला एका मुलाला जन्म दिला. त्यांनी या नवीन बाळाचे नाव एंड्रियास ठेवले आहे.

गैब्रिएला – गैब्रिएला ही साउथ आफ्रिकेची एक सुंदर मॉडेल आणि अभिनेत्री आहे. ती सध्या बॉलीवूड अभिनेता अर्जुन रामपाल सोबत नात्यात आहे. हे दोघे खूप काळापासून एकमेकांसोबत रिलेशनशिपमध्ये आहेत. 18 जुलै 2019 ला गैब्रिएलाने एका मुलाला जन्म दिला. अर्जुनला पहिल्या पत्नीपासून दोन मुली आहेत.

माही गिल – एका वेबसाईटने दिलेल्या माहितीनुसार माही गोव्यामध्ये एका बिझनेस मॅन सोबत लिव्ह इन रिलेशनशिपमध्ये राहात आहे. या दोघांना एक मुलगी सुद्धा आहे. माही तिच्या मुलीसोबत मुंबईला राहते व मध्ये मध्ये गोव्याला जात असते. माहीच्या मध्ये एक परिवार बनवण्यासाठी लग्न करणे आवश्यक नाही. तर लग्न न करता सुद्धा छान सुखी परिवार बनवता येतो.

सुष्मिता सेन – बॉलिवूडची सुंदर अभिनेत्री व एकेकाळची मिस युनिव्हर्स असलेली सुष्मिता सेन रोमन शॉल सोबतच्या नात्यामुळे चर्चेत आहे. सुश्मिताने अजून सुद्धा लग्न केले नाही. पण तू असे म्हटले जाते की ती तिच्या बॉयफ्रेंड सोबत म्हणजेच रोमन सोबत बांद्राच्या एका फ्लॅटमध्ये तिच्या दोन दत्तक मुलींसोबत लिव्ह इन रिलेशनशिप मध्ये राहते.

मुग्धा गोडसे – आपल्या फॅशनमुळे नेहमीच चर्चेत असणारी मराठमोळी मुग्धा आता त्याच्या रिलेशनशिपमुळे चर्चेत येऊ लागली आहे. सध्या खूप काळापासून ती बॉलीवूड पासून दूर राहिलेली आहे. परंतू तिच्या वैयक्तिक जीवनामुळे नेहमीच चर्चेत असते. एका वृत्तपत्राने दिलेल्या माहितीनुसार मुग्धा सध्या तिच्याहून १८ वर्षे मोठा असलेला बॉलिवूड अभिनेता राहुल देवला डेट करीत आहे. हे दोघे बऱ्याच काळापासून लिव्ह इन मध्ये राहतात. साधारण चार वर्षापूर्वी मुग्धाने तिच्या आणि राहुलच्या नात्याबद्दल सांगितले होते.

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *