मुंबईतील रस्त्यांवर, नाक्या नाक्यावर एक कलाकार तुम्हाला रस्त्यावरील कुत्र्यांच्या शोधत दिसू शकतो. जसे १०-१२ कुत्रे एकत्र जमा होतात त्यावेळी हा कलाकार त्यांना खायला बिस्कीट वगैरे देतो. सध्या कोरोना व्हायरस मुळे संपूर्ण जगभरात लॉक डाऊन करण्यात आले आहे. त्यामुळे रस्त्यावरील कुत्र्यांचे तसेच कबुतरांचे खाण्याच्या बाबतीत खूप हाल झाले आहे.
सध्याच्या काळात माणसे ही फक्त खिडक्यांमधून नाहीतर घराच्या बाल्कनीत बसलेली दिसतात. सर्व रस्ते सध्या सूने पडलेले दिसतात. परंतु अशा परिस्थितीत सुद्धा हे लॉक डाऊन गांभीर्याने न घेतलेली माणसे सुद्धा आहेत. जे सर्वत्र संचारबंदी असून देखील बाहेर वाहने घेऊन फिरतात.
परंतु या सर्वात एक कलाकार वेगळा आहे या कलाकाराला बघून रस्त्यावरील कुत्र्यांना खूप आनंद होतो. तो कलाकार म्हणजे मनित जौरा जो सध्या कुंडली भाग्य या मालिकेत ऋषभ हे पात्र साकारत आहे. कोविड-१९ च्या संक्रमणाला रोखण्यासाठी लॉक डाऊन केले गेले याचं काळात मनित जौरा एनीमल्स मॅटर टू मी ( ए एम टी एम) या संघटने द्वारे भटक्या कुत्र्यांना खायला देत आहे.
सरकारने दिलेल्या आदेशाचे पालन करण्यासाठी मनितने कुत्र्यांना खायला घालण्यासाठी फिरावे लागते म्हणून पोलिसांकडून परवानगी सुद्धा घेतली आहे. मनितचे असे म्हणणे आहे की, हे भटके प्राणी सुद्धा समाजाचा तितकाच हिस्सा आहेत जितका आपण. पाळीव प्राणी हे संपूर्ण जीवनभर माणसांसोबत राहतात.
मात्र हे भटके आहेत ते मात्र खाण्या पिण्यासाठी सर्वत्र फिरत असतात. मी एएमटीएमचा खूप आभारी आहे की त्यांनी या परिस्थितीला गांभीर्याने घेतले. आणि या अभियानास परवानगी दिली. मनित ने त्याच्या घरी सुद्धा एका कुत्र्याला पाळले आहे. बॉलिवुड मधील अनेक कलाकार माणसांच्या मदती सोबतच प्राण्यांची सुद्धा मदत करीत आहे.
Bollywood Updates On Just One Click