Headlines

सिद्धार्थ आणि कियाराच्या रिसेप्शनमध्ये दिशा पाटणी झाली ऊप्स मोमेन्टची शिकार !

मित्रांनो जसे जसे इंटरनेटचा वापर वाढत आहे तसे तसे तंत्रज्ञान देखील प्रगल्भ होत आहे. हल्ली सोशल मीडिया लहान मुलांपासून ते ज्येष्ठ नागरिक प्रत्येकजण वापरत आहे. सोशल मीडियावर एखादी गोष्ट क्षणामध्ये वायरल होऊन जाते आणि जगाच्या कानाकोपऱ्यामध्ये त्या घटनेबद्दल चर्चा देखील केली जाते. अनेकदा त्यात सेलिब्रिटी म्हटले की चर्चा होतेच.

अनेकदा कळत नकळत अशा काही घटना त्यांच्या आयुष्यामध्ये घडतात ज्यांना माध्यमांमुळे प्रसिद्धी मिळत असते. त्यांचा एखादा फोटो किंवा एखादा व्हिडिओ सोशल मीडियामध्ये सेकंदात वायरल होतो. आजच्या या लेखांमध्ये आम्ही तुम्हाला अशाच एका अभिनेत्रीच्या फोटोशूट बद्दल सांगणार आहोत. या अभिनेत्रीचे फोटो आणि व्हिडिओ सोशल मीडियावर इतके व्हायरल झाले आहे की प्रत्येकाच्या ओठी या अभिनेत्रीची चर्चा रंगली आहे.

आपल्या सर्वांना माहितीच आहे की, बॉलीवूड क्षेत्रामध्ये लूकला आणि फॅशन स्टाईलला खूपच महत्त्व दिले जाते. प्रत्येक अभिनेता आणि अभिनेत्री आपण कसे परफेक्ट दिसू किंवा लोकांच्या नजरेमध्ये कशाप्रकारे आकर्षक दिसू याचा विचार करतात आणि त्या त्या पद्धतीने आपली ड्रेसिंग देखील करत असतात. सेलिब्रिटी हा आपल्या चित्रपटांमुळे ओळखला तर जातो पण त्याचबरोबर ती किंवा तो कशा प्रकारे कपडे परिधान करतो यामुळे देखील या क्षेत्रामध्ये प्रसिद्धी पावत असतो.

प्रत्येक अभिनेत्री किंवा अभिनेता विशिष्ट एक लूक स्वतःसोबत कॅरी करत असतो, ज्यामुळे त्याला विशिष्ट ओळख प्राप्त होत असते. कालांतराने या ड्रेसिंगला लोक पसंती देखील करतात परंतु अनेकदा वेगवेगळ्या प्रकारचे ड्रेसिंग करत असताना कळत नकळतपणे अशा काही घटनांना सामोरे जावे लागते, ज्यामुळे अनेकदा नको ती परिस्थिती ओढवून येते. अशीच परिस्थिती दिशा पाटनी सोबत घडली. आपल्या सर्वांना दिशा माहितीच आहे. तिने आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये काम केलेले आहे. काही दिवसापूर्वीच सिद्धार्थ आणि कियारा अडवाणी यांच्या लग्नाची रिसेप्शन पार्टी झाली. या पार्टीमध्ये दिशाला एका विचित्र घटनेला सामोरे जावे लागले आणि ही घटना सोशल मीडियावर मोठ्या प्रमाणात वायरल होत आहे.

सिद्धार्थ मल्होत्रा आणि कियारा आडवाणी यांच्या वेडिंग रिसेप्शन मध्ये दिशा सिमरी थाई हाई स्लिट गाउन घालून आली होती. या ड्रेसवर दिशाने मोठे मोठे हिल्स देखील घातले होते. या ड्रेस वर दिशा ने केस मोकळे ठेवले होते. या कपड्यांमध्ये ती अजिबात कंफर्टेबल नव्हती, हे तिच्या चालण्यावरून दिसत होते. जेव्हा ती चालत होती तेव्हा तिला एका हाताने ड्रेस सांभाळावा लागत होता. फोटोशूट करते वेळी देखील तिच्या चेहऱ्यावरचे हावभाव अगदी वेगळे होते. तिच्या चेहऱ्यावर लाजल्यावाणीची भावना दिसत होती.

 

View this post on Instagram

 

A post shared by Manav Manglani (@manav.manglani)


दिशा पाटनीची ऐन फोटोशूट करताना उडाली तारांबळ – फोटोग्राफर मानव मंगलानी ने, ‘दिशा पाटनी सिद्धार्थ मल्होत्रा कियारा आडवाणी यांच्या लग्नातील रिसेप्शनचे काही फोटो शेअर केलेले आहेत. हे सारे फोटो इंस्टाग्राम वर मोठ्या प्रमाणावर व्हायरल होत आहे. गेल्या पंधरा तासांमध्ये 47 हजार पेक्षा जास्त लाईक या फोटोवर लोकांनी दिलेले आहेत त्याचबरोबर या व्हिडिओवर 270 पेक्षा जास्त कमेंट्स लोकांनी केले आहेत. दिशा पाटनी आणि तिचा ड्रेस याबद्दलच्या चर्चा सोशल मीडियावर वेग धरत आहेत. अनेकांनी वेगवेगळ्या कमेंट देखील केलेल्या आहेत म्हणूनच ऐन लग्नाच्या रिसेप्शन मध्ये दिशा पाटनीला नको त्या परिस्थितीला सामोरे जावे लागले.

दिशा पाटनीच्या कामाबद्दल बोलायचे झाले तर नुकतेच ती जॉन अब्राहम सोबत चित्रपटांमध्ये दिसली होती. या चित्रपटामध्ये तिने केलेली भूमिका अप्रतिम होती. दिशा लवकरच बॉलीवूडमधील वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये आपल्याला भविष्यात दिसून येणार आहे.