मित्रांनो सोशल मीडिया हे एक प्रभावी माध्यम आहे. या सोशल मीडियावर कोणतीही गोष्ट व्हायरल झाल्यास ती एका सेकंदात जगाच्या कार्याकोपऱ्यात पोहोचून जाते. सोशल मीडिया म्हटले की इंस्टाग्राम, फेसबुक, ट्विटर यासारखे माध्यम यांची चर्चा होतेच. आज आम्ही तुम्हाला अशाच एका सोशल मीडियावर वायरल झालेल्या व्हिडिओ बद्दल सांगणार आहोत आणि या व्हिडिओची चक्क दखल क्रिकेटचा देव समजल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरने घेतलेली आहे.
होय, तुम्हाला विश्वास बसत नसेल परंतु ही गोष्ट अगदी खरं आहे. नुकतेच ट्विटरवर एक व्हिडिओ शेअर झालेला आहे. या व्हिडिओमध्ये एका पंधरा वर्षीय मुलीने असे काही षटकार व चौकार मारलेले आहेत, ते पाहून भलेभले थक्क झालेले आहे. हा व्हिडिओ पाहून सचिन तेंडुलकर देखील आपल्या भावना रोखू शकला नाही. सचिन तेंडुलकरने देखील हा व्हिडिओ शेअर करत या मुलीचे कौतुक केले आहे.
क्रिकेट हा खेळ भारतीयांचा आत्मा आहे. सगळीकडे खेळ हा आवडीने खेळला जातो. असा क्वचित व्यक्ती आपल्याला सापडेल, ज्याला क्रिकेटमध्ये रस नसेल. क्रिकेट हा खेळ मुले – मुली अगदी आवडीने खेळतात. हा खेळ खेळण्यासाठी मुली देखील काही कमी नाहीत. राजस्थान मधील बाडमेर येथे राहणारी मुमल मेहेर हिला सुद्धा क्रिकेट खेळण्याची आवड आहे. मुमल चा व्हिडिओ हल्ली सोशल मीडियावर अगदी धुमाकूळ घालत आहे. तिने मारलेले षटकार आणि चौके अनेकांना थक्क करत आहेत.
Kal hi toh auction hua.. aur aaj match bhi shuru? Kya baat hai. Really enjoyed your batting. 🏏👧🏼#CricketTwitter #WPL @wplt20
(Via Whatsapp) pic.twitter.com/pxWcj1I6t6
— Sachin Tendulkar (@sachin_rt) February 14, 2023
मुमल ही फक्त पंधरा वर्षाची आहे आणि इयत्ता आठवी मध्ये शिकत आहे. मुमल ज्या ठिकाणी राहते, ते राजस्थान मधील एक छोटेसे गाव आहे. या गावांमध्ये फारशा सुविधा उपलब्ध नसल्या तरी गावातील अनेक मुलींसोबत मुमल ही अगदी जिद्दीने क्रिकेट खेळते. तिचा हा आवडता खेळ आहे. अनेक सामने देखील तिने आतापर्यंत खेळलेले आहेत. आपल्या क्रिकेटच्या शैलीमुळे तिने भल्याभल्यांना तोंडात बोटे घालायला लावली आहेत. मुमल आतापर्यंत जिल्हा पातळीवर देखील क्रिकेटचे सामने खेळले आहेत असे तिचा भाऊ रझाकने माध्यमांना सांगितले.
अत्यंत गरिबीची परिस्थिती जगते मुमल – मुमल एका अत्यंत गरिबीमध्ये जगणारी मुलगी आहे. मुंबईचे वडील शेतकरी आहेत. कच्च्या घरामध्ये राहणारी ही मुमल व तिचे वडील शेतकरी असल्याने भविष्यात क्रिकेट खेळासाठी लागणारा खर्च हा त्यांचा ऐपतीच्या पलीकडे आहे. भविष्यात या खेळासाठी लागणाऱ्या सुख सुविधा तिचे वडील पुरवू शकणार नाहीत, म्हणून आपल्या मुलीच्या खेळासाठी प्रोत्साहन मिळावे यासाठी त्यांनी सरकारकडे प्रार्थना देखील केलेली आहे.
मुलीच्या पुढील आयुष्यासाठी म्हणजेच तिला अकॅडमीमध्ये प्रवेश मिळवून देण्यासाठी सरकारकडे विनंती देखील केली आहे. जर तिला योग्य मार्गदर्शन आणि पाठिंबा मिळाला तर भविष्यात मुमल नक्कीच भारत देशाचे नाव उज्वल करेल, असा विश्वास देखील मुमलच्या वडिलांना आहे…
सचिन तेंडुलकरने दिली शाबासकीची थाप – सचिन तेंडुलकर आणि क्रिकेट हे एक समीकरण आहे. क्रिकेट या खेळाचा देव म्हणजेच सचिन तेंडुलकर कडे पाहिले जाते. या क्रिकेटच्या देवाने चक्क या व्हिडिओची दखल घेतली आहे आणि या व्हिडिओवर कमेंट देखील केली आहे. या व्हिडिओमध्ये मारलेले षटकार आणि चौकार बॅटिंगमुळे सचिनने या मुलीचे कौतुक केले आहे, तसेच शाबासकी देखील दिली आहे. वायरल झालेल्या व्हिडिओवर कमेंट करत सचिनने म्हटले आहे की, कालच वुमन्स क्रिकेट टीमचा लिलाव झाला आणि आज मुलींनी प्रॅक्टिस देखील करायला घेतली आहे. ही षटकार चौकार बॅटिंग पाहून खूपच आनंद झाला !