सध्याच्या काळात विज्ञान इतकं पुढे गेले आहे की, अशक्य गोष्टी ही शक्य होऊ लागल्या आहेत. असे अनेक चमत्कारीक शोध आपल्याला ऐकायला किंवा वाचायला मिळतात. ते पाहून हे कसे शक्य आहे असा सगळ्यांनाच प्रश्न पडतो मात्र वैज्ञानिक त्यावर खुलासा करुन सर्वांना अचंबत करतात. असाच एक नवा प्रयोग नुकताच करण्यात आला तो पाहून सर्वांच्याच तोंडचे पाणी पळाले आहे.
जिया आणि जहाद या केरळमधील एका ट्रान्सजेंडर जोडप्याने सोशल मीडियावर आपल्या गर्भधारणेची घोषणा करुन सर्वांनाच चकित केले. या जोडप्याने आपल्या इन्स्टा पोस्टवर काही फोटोही शेअर केले आहेत. विशेष म्हणजे कोझिकोड मेडिकल कॉलेजच्या डॉक्टरांच्या टीमने सांगितले की, या जोडप्याला लिंग बदलाची प्रक्रिया सुरू असताना गर्भधारणेसाठी कोणत्याही शारीरिक आव्हानाचा सामना करावा लागला नाही.
जिया आणि जहाद हे दोघे गेल्या ३ वर्षांपासून एकत्र राहत आहेत. जिया पुरुष म्हणून जन्माला आली आणि स्त्री बनली. जहाद स्त्री म्हणून जन्माला आला आणि पुरुष बनला. भविष्यात त्यांच्या होणाऱ्या बाळाला दूधाची समस्या जाणवू नये यासाठी त्यांनी बाळाला दूध बँकेतून आईचे दूध पाजायचे असे ठरवले आहे.
भारतात मुलाला जन्म देणारा जहाद हा पहिला ट्रान्समॅन असेल, असा दावा आता केला जात आहे. हिंदुस्तान टाईम्सने दिलेल्या माहितीनुसार, शस्त्रक्रियेदरम्यान जहादचे स्तन काढण्यात आले होते. मात्र तिचे गर्भाशय आणि इतर काही अवयव काढले गेले नाहीत. त्याचमुळे आता तिला गर्भधारणा झाली आहे.
जियाने आपल्या इन्स्टाग्राम पोस्टमध्ये लिहिले की, ‘मी जन्माने किंवा माझ्या शरीराने स्त्री नव्हते. पण माझ्या आत एक स्त्री होती. मलाही मूल व्हावे आणि ते मला ‘आई’ म्हणावे, असे माझे स्वप्न होते.
मिळालेल्या माहितीनुसार या जोडप्याने सुरुवातीला मुल दत्तक घ्यायचे असे ठरवले होते. त्यासाठी त्यांनी पूर्ण चौकशीही केली होती.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !