Headlines

सोशल मीडियावर जोरात व्हायरल जुन्या ROYAL ENFIELD BULLET बुलेटच्या बिलाचा फोटो, तिची किंम्मत झालाय चर्चेचा विषय बघा !

आपल्या आपले आईवडील अनेकदा सांगतात की आमच्या वेळी एखादी अमुक गोष्ट एढ्या एवढ्या रुपयांना मिळायची. त्यांच्या त्या किंमती ऐकून आपण अनेकदा त्यांना खोटं ठरवतो पण त्यांचे खरे असते. पूर्वीच्या काळी जागतिकीकरण झाले नव्हते. त्यामुळे फार कमी किंमतीत वस्तू मिळायच्या. पण आता काळ बदलला असून वस्तूंच्या किंमती गगनाला भिडल्या आहेत.

सध्या सोशल मीडियावर असाच एक फोटो व्हायरल होत आहे. हा फोटो सुप्रसिद्ध बाईक कंपनी रॉयल इनफील्डच्या बुलेट 350 सीसी के 1986 या मॉडेलचा आहे. रॉयल इनफील्डचे हे मॉडेल पूर्वीइतकेच आजही लोकप्रिय आहे.

आजच्या काळात 350cc मॉडेलची किंमत 180000 रुपये आहे. पण 37 वर्षांपूर्वी म्हणजेच 1986 मध्ये या बाईकची किंमत ऐकून तुम्ही नक्कीच चकित व्हाल. सध्या सोशल मीडियावर 350cc या बाईकच्या मॉडेलच्या बिलाचा फोटो खूप व्हायरल होत आहे. त्यात असे लिहिले आहे की 1986 मध्ये ही बाईक केवळ 18700 रुपयांना खरेदी केली होती.

व्हायरल फोटोनुसार संदिप ऑटो कंपनीद्वारे या बाईकचे बिल केले गेले आहे. ही कंपनी भारताच्या झारखंड भागात आहे. पूर्वी या गाडीचे नाव रॉयल इन्फिल्ड नसून केवळ इनफील्ड बुलेट होते. मिडियामध्ये प्रसारित झालेल्या बातम्यांनुसार बुलेट लवकरच 650 सीसी इंजिन असलेली गाडी लॉन्च करणार आहे. पण याची अधिकृत घोषणा अद्याप झालेली नाही. सध्या तरी रॉयल इनफील्डकडून 350cc आणि 500 सीसी इंजिन असलेल्या दुचाकी गाड्याच बनवल्या जातात.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !