बॉलीवूड अभिनेत्री बद्दल बोलायचे झाल्यास सर्वसाधारणपणे अभिनेत्री आपल्या शारीरिक सौंदर्यावर अवलंबून असतात तसेच शारीरिक सौंदर्यामुळे अनेकदा त्यांची चर्चा देखील होत असते परंतु आपल्या आजूबाजूला असे अनेक अभिनेत्री असतात, ज्या फक्त अभिनयाच्या जोरावर आपले कर्तुत्व गाजवत असतात. यांचे कर्तुत्व चित्रपटाच्या माध्यमातून आपल्याला पाहायला मिळते, तसेच यांचे काम त्यांचा चाहता वर्ग पाहत असतो.
या कामाचे कौतुक देखील करत असतो. बॉलीवूड असो किंवा साउथ फिल्म इंडस्ट्री असो येथे अनेक अभिनेत्री आपल्याला सौंदर्याच्या जोरावर चाहतांच्या मनामध्ये आपली जागा निर्माण करताना पाहायला मिळतात परंतु काही अभिनेत्री यावर अपवाद ठरतात. आज आम्ही तुम्हाला एका सुपरस्टार अभिनेत्याच्या बायको बद्दल सांगणार आहोत, ही स्वतः एक अभिनेत्री आहे.
साउथ इंडस्ट्रीज मधील सुपरस्टार अभिनेता सूर्या तुम्हा सर्वांना माहिती असेल. अभिनेता सूर्याने आपली एक वेगळी ओळख निर्माण केलेली आहे, तसेच स्टार सूर्याची ओळख इंडियामध्ये नाही तर संपूर्ण जगामध्ये आपल्याला पाहायला मिळते. आतापर्यंत साऊथ चित्रपटांमध्ये सूर्या आपल्याला वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये दिसलेला आहे. एकेकाळी सूर्याची पत्नी अभिनेत्री ज्योतिका ने देखील आपल्या सौंदर्याच्या जोरावर भल्या भल्यांना मागे टाकले होते.
तुम्ही ज्योतिकाचे सौंदर्य पाहाल तर तुम्ही देखील वेडे व्हाल, इतके सौंदर्य तिच्याकडे आहे पण त्याचबरोबर अभिनयाची उत्तम जोड देखील तिला लाभलेली आहे म्हणूनच खऱ्या अर्थाने तिला सौंदर्य लाभले आहे, असे म्हणायला हरकत नाही. “ब्युटी विथ ब्रेन” हे वाक्य ज्योतिकाच्या बाबतीत लागू पडते. ज्योतीकाने वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळ्या प्रकारची भूमिका केली आहे. या भूमिका केल्याने तिचे कौतुक देखील चाहत्या वर्गांकडून केले गेले आहे.
ज्योतीका नेहमी माध्यमांमध्ये चर्चेत चर्चेचा विषय बनलेली असते. अनेकदा ती वेगवेगळ्या कार्यक्रमाला हजेरी देखील लावते तसेच साउथ इंडियन चित्रपटांमध्ये तिने केलेली कामगिरी अतुलनीय आहे. साउथ इंडियन चित्रपटांमध्ये अनेक सामाजिक भूमिका देखील तिने केलेल्या आहेत म्हणूनच एक शिस्तबद्ध पद्धतीचे आयुष्य जगत असणारी ज्योतीका अनेकांना माहिती आहे. ज्योतीकाने बॉलीवूड मध्ये देखील काम केलेले आहे.
अभिनेत्री ज्योतिका ने बॉलीवूड अभिनेता अक्षय खन्ना सोबत चित्रपट “डोली सजा के रखना”यामध्ये प्रमुख भूमिका केली होती, एवढेच नाही तर त्यापेक्षा वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये केली ज्योतीकाने उत्कृष्ट अभिनय दाखविला आहे.
ज्योतिकाच्या चित्रपट करिअर बद्दल बोलायचे झाल्यास ज्योतिका ने आपल्या या करिअरची सुरुवात बॉलीवूड इंडस्ट्री पासून केली होती. या अभिनेत्रीने 1998 मध्ये चित्रपट “डोली सजाके रखना” द्वारे इंडस्ट्रीमध्ये पदार्पण केले होते. या चित्रपटात अक्षय खन्ना ज्योतिकाचा सहकलाकार होता. यानंतर या अभिनेत्रीने कधीच मागे वळून पाहिले नाही. बॉलिवूड, हिंदी चित्रपट, साउथ, कन्नड, तेलगू, मल्याळम यासारख्या अनेक चित्रपटांमध्ये ज्योतीकाने वेगवेगळ्या प्रकारच्या भूमिका केल्या आहेत. अभिनेता सूर्या आणि अभिनेत्री ज्योतिका या दोघांची जोडी चित्रपट सृष्टीमधील एक महत्त्वाची जोडी मानली जाते. या दोघांना नेहमी फॉलो करणारा चाहता वर्ग देखील आहे, जो नेहमी त्यांच्या कामावर प्रेम करतो.