Headlines

वडील शिपाई पण गरिबीवर मात करत मुलगा झाला आयपीएस, वाचा कशी होती त्यांची कहाणी !

आयएएस आणि आयपीएस बनणे हे प्रत्येक यूपीएससी परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांचे स्वप्न असते. हे स्वप्न पूर्ण करण्यासाठी अनेक विद्यार्थी जिवाचे रान देखील करतात परंतु प्रत्येकाचे स्वप्न पूर्ण होते असे नाही. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी मोठ्या प्रमाणावर अभ्यास करावा लागतो. वाचन, मनन, चिंतन करावे लागते. जास्तीत जास्त वेळ अभ्यासाकरिता द्यावा लागतो परंतु जर तुमची परिस्थिती खराब असेल,आर्थिक टंचाई असेल, गरिबी असेल तर अशावेळी देखील या समस्या पार करताना अनेक अडचणी निर्माण होतात परंतु तुमच्यामध्ये जर जिद्द असेल तर तुम्ही या सगळ्या गोष्टींवर सहजरीत्या मात करू शकता.

संघर्षाच्या आणि आत्मविश्वासाच्या जोरावर तुम्ही तुमचे यश नक्कीच गाठू शकता. आज आम्ही तुम्हाला अशाच एका हरहुन्नरी व्यक्ति बद्दल सांगणार आहोत, ज्या व्यक्तीने गरिबीवर मात करत आयपीएस पद प्राप्त केलेले आहे आणि आपली यशोगाथा सुवर्ण अक्षराने लिहिलेली आहे. या आयपीएस अधिकाऱ्याचे नाव आहे नूरुल हसन. यांनी प्रचंड मेहनतीच्या जोरावर आणि संघर्षाच्या आधारावर हे पद प्राप्त केलेले आहे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी जीवाचे रान देखील केले आहे.

नूरुल हसन यांची कथा आजच्या तरुण वर्गासाठी प्रेरणादायी ठरणारी आहे. कोणत्याही प्रकारचे सुख सुविधा उपलब्ध नसताना देखील रडत न बसता त्यांनी संघर्षावर मात केले आणि आपल्या हवे असलेले पद प्राप्त केले. नुरुल हसन यांच्या बद्दल बोलायचं झाल्यास उत्तर प्रदेशातील पिलिभात जिल्ह्यामध्ये राहणारे नुरूल यांचे वडील बरेली मध्ये चतुर्थ श्रेणी कर्मचारी होते.

नुरुल यांचे वडील मलिन बस्ती येथे त्यांनी एक छोटासा रूम देखील भाड्याने घेतला होता, येथेच अकरावीपर्यंत आपल्या मुलाचे शिक्षण देखील पूर्ण करवले. अकरावी बारावीचे शिक्षण पूर्ण केल्यानंतर जेव्हा बी टेक करायचे ठरवले तेव्हा त्यांच्याकडे पैसे अजिबात नव्हते, अशावेळी वडिलांनी शिक्षणासाठी गावची जमीन देखील विकली आणि फी भरली.

यानंतर काही दिवसांनी त्यांनी स्वतःच्या हक्काचे एक घर विकत घेतले. बी टेक केल्यानंतर काही काळ नोकरी केली. या नोकरी मधून मिळालेले पैसे पुढील शिक्षणासाठी वापरले. शिक्षणासाठी आवश्यक असणारे सर्व पुस्तके या सर्वांचा खर्च या पगारातून झाला नोकरी केल्यानंतर त्यांनी एक परीक्षा पास केली आणि वन क्लास ऑफिसर बनले.

इतके सारे करून देखील त्यांच्या डोक्यामध्ये आयएएस व आयपीएस अधिकारी बनण्याचे स्वप्न चालूच होते. हे स्वप्न त्यांनी काही मागे सोडले नाही. सातत्याने यूपीएससी परीक्षा ची तयारी करत राहिले. जास्त असल्याने सर्व तयारी त्यांनी स्वतःहूनच केली आणि शेवटी इंटरव्यू व्यवस्थित रित्या देऊन आयपीएस अधिकारी देखील बनले.

आज नुरुल हसन एक प्रामाणिक इमानदार आयपीएस अधिकारी म्हणून ओळखले जातात. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी नुरुल यांचे भर सभेमध्ये कौतुक केले होते म्हणूनच किती ही आयुष्यामध्ये संकटे आले तरी आपण संघर्षाच्या व मेहनतीच्या जोरावर त्यांच्यावर मात करू शकतो व आपल्याला हवे असलेले ध्येय प्राप्त करू शकतो. फक्त आपल्याला आपल्या स्वप्नांचा पाठलाग करणे गरजेचे आहे. या जोरावरच तुम्ही तुमचे स्वप्न सहज पूर्ण करू शकता.