Headlines

मोबाईल फोनला हात न लावता पूर्ण केले IAS अधिकारी बनण्याचे स्वप्न पुर्ण, ध्येयाने झपाटलेल्या व्यक्तीची आगळी वेगळी कहाणी !

आपल्या आजूबाजूला असे अनेक लोक आहेत, जी स्पर्धा परीक्षेची तयारी करत असतात. स्पर्धा परीक्षा उत्तीर्ण होणे काही खायचे काम नाही, त्यासाठी दिवसरात्र मेहनत करावी लागते. अनेक जण आपले आयुष्य देखील या परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी वेचत असतात परंतु तुम्हाला यश यश मिळवायचे असेल तर त्यासाठी प्रामाणिकपणे मेहनत करणे देखील अत्यंत गरजेचे आहे. प्रामाणिक मेहनत आणि चिकाटी यांच्या जोरावर आपण हवे असलेले यश सहजरीत्या संपादित करू शकतो.

यशाच्या आधारावर स्वप्नांना भरारी देऊ शकतो. आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल माहिती सांगणार आहोत, ज्या व्यक्तींनी आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी खूप मेहनत केलेली आहे. त्या व्यक्तीने अनेक आपल्या इच्छा, आवड बाजूला ठेवून स्वप्न पूर्ण केले आहे. शासकीय सेवेच्या परीक्षा यांची तयारी करताना आपल्याला खूप काही गोष्टींची काळजी घ्यावी लागते व त्यासाठी योग्य नियोजन देखील करावे लागते.

यूपीएससी आणि एमपीएससी या स्पर्धा परीक्षा लवकर उत्तीर्ण होणे शक्य असते. देशातील सर्वात कठीण परीक्षा मानल्या जातात. दरवर्षी लाखो विद्यार्थी या परीक्षेची तयारी करत असतात. ही परीक्षा उत्तीर्ण होण्यासाठी अनेक विद्यार्थी खूप मेहनत करत असतात. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की दरवर्षी परीक्षा देणाऱ्यांची विद्यार्थ्यांची संख्या जास्त असतात परंतु काही टक्केवारीतच विद्यार्थी पास होतात.

आज आम्ही तुम्हाला अशा एका मुलीबद्दल सांगणार आहोत, ज्या मुलीने या परीक्षेची तयारी करताना अनेक गोष्टींना तिलांजली दिली आहे आणि या स्पर्धेमध्ये यश प्राप्त केले आहे. या मुलीचे नाव आहे परी बिश्नोई. ही मुलगी राजस्थान मध्ये एका गावी राहते. या मुलीचे वय 24 वर्षे आहे आणि वयाच्या 24 व्या वर्षी 2019 मध्ये यूपीएससी सारख्या परीक्षा देखील तिने पास केलेली आहेत.

राजस्थान मधील बिकानेर येथे राहणारी परी विष्णू यांचा जन्म २६ फेब्रुवारी 1996 ला झाला त्यांचे वडील मनिराम बिश्नोई एक वकील आहेत त्यांची आई अजमेर जिल्ह्यामध्ये जीआरपी ठाणे अधिकारी आहेत तसेच लहानपणापासूनच एकंदरीत शैक्षणिक वातावरण चांगले लाभल्याने परी यांनी अभ्यासामध्ये जास्तीत जास्त लक्ष देण्याचा प्रयत्न केला तसेच परी यांना आयएएस ऑफिसर बनण्यासाठी जास्त प्रमाणात मेहनत देखील करावी लागली नाही.

आय ए एस परी त्यांच्या समाजातील पहिली महिला आयएएस अधिकारी आहे. परी यांनी सुरुवातीचे शिक्षण अजमेर येथील सेंट मेरी कॉन्व्हेंट स्कूल मध्ये पूर्ण केले. बारावीनंतर त्यांनी आयएएस अधिकारी बनण्याचे ठरवले व त्या पद्धतीने अभ्यासाची तयारी देखील केली. बारावीनंतर पुढील शिक्षण घेण्यासाठी परी दिल्ली येथे आल्या आणि त्यानंतर युपीएससीच्या तयारी करू लागल्या.

आय एस अधिकारी परी बिश्नोई यांनी अजमेर येथील एमडीएस यूनिवर्सिटी मधून पॉलीटेक्निक सायन्स मध्ये पोस्ट ग्रॅज्युएशन पूर्ण केले त्यानंतर यूपीएससी परीक्षा तीन वेळा दिली, यादरम्यान नेट जीआर परीक्षा देखील पूर्ण केली.

2019 मध्ये परी यांनी यूपीएससी परीक्षा तिसऱ्या प्रयत्न मध्ये पूर्ण केली, त्यावेळी परीने देशभरामध्ये तीसावा क्रमांक प्राप्त केला होता. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये परीने सांगितले होते की, या परीक्षेची तयारी करत असताना त्यांनी सोशल मीडियापासून स्वतःला लांब ठेवले होते त्याचबरोबर परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी तिने अगदी साध्वीचे जीवन जगण्यास सुरुवात केली होती.

परीक्षेमध्ये यश प्राप्त करण्यासाठी परीने मोबाईल ला देखील हात लावला नव्हता आणि आपल्या अथक मेहनतीच्या जोरावर आणि चिकाटीच्या मदतीवर आयएएस बनण्याचे स्वप्न देखील पूर्ण केले, अशा प्रकारे आपले स्वप्न पूर्ण करण्यासाठी आयएएस अधिकारी परी बिश्नोई यांनी जीवाचे रान करून हवे असलेले स्वप्न आणि पद मिळवले.