बॉलीवूडमधील आपण वेगवेगळ्या चित्रपटांमध्ये वेगवेगळे नाते अनेकदा पाहत असतो. हे नाते भारतीय संस्कृतीचे प्रतिनिधित्व करत असतात. या नात्यांना एक सन्मानाची गोफ असते. हे नाते आदराचे प्रतीक मानले जाते परंतु प्रत्यक्ष जीवनामध्ये देखील हे नाते प्रभावी करताना आपल्याला बॉलीवूडमधील काही अभिनेत्री दिसत आहे. नुकतेच लग्न झालेली अभिनेत्री कॅटरिना कैफ ही अभिनेता विकी कौशल सोबत आपला संसार आनंदाने करत आहे. त्याचबरोबर ती आपल्या सासरच्या मंडळींसोबत देखील नव्याने नाते निर्माण करण्याचा प्रयत्न करत आहे. या नात्यांना प्रेमाचा आधार देखील देण्याचा प्रयत्न करत आहे.
आपल्या सर्वांना कॅटरिना कैफ माहिती आहे. बॉलीवूड मधील एक लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिने आतापर्यंत आपल्या मेहनतीच्या जोरावर अनेक संघर्ष पार करून आपले वेगळे स्थान निर्माण केले आहे. आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपटातून कॅटरिनाने वेगवेगळे पात्र देखील साकारलेले आहे. एक वेळ होती की जेव्हा कॅटरिना कैफ ला शुद्ध हिंदी देखील बोलता येत नव्हते परंतु मेहनतीच्या जोरावर आणि नवीन काहीतरी शिकण्याच्या ध्येयाने एकापेक्षा एक सुपरहिट चित्रपट बॉलीवूड इंडस्ट्रीला दिले. इतकं सारं करून देखील तिने एका पंजाबी अभिनेता सोबत लग्न केले व त्यानंतर ती हिंदू धर्मातील प्रत्येक विधी रीती आज फॉलो करत आहे.
आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, कॅटरिना कैफ चे विवाह झाल्यानंतर तिने सासरच्या मंडळी सोबत एक चांगले नाते तयार केलेले आहे. तिने सर्वांचे मन देखील जिंकलेले आहे. कॅटरिना कैफ आणि विकी कौशल यांची जोडीला बॉलीवूड ने मोठ्या प्रमाणावर पसंती देखील दिली. अनेकांनी तर फेवरेट कपल म्हणून देखील या जोडीला टायटल दिले. कॅटरिना कैफ ने आपल्या सासरच्या मंडळी सोबत चांगले नातेसंबंध देखील निर्माण केलेले आहे त्याचबरोबर विकी कौशलचा भाऊ याच्यासोबत देखील कॅटरिनाचे चांगले जमते. विकी कौशलचा भाऊ सनी कौशल देखील नेहमी सोशल मीडियावर वहिनीचे म्हणजेच कॅटरिना कैफ चे वेगवेगळे फोटोज शेअर करत असतो.
त्याचबरोबर कॅटरिना कैफ सोबत असलेले आपल्या नात्याबद्दल देखील अनेकदा सांगितलेले आहे. विकी आणि सनी हे दोघे सख्खे भाऊ असले तरी कॅटरिना कैफ सोबतचे नाते मैत्रीचे निर्माण झालेले आहे. माध्यमांना दिलेल्या एका मुलाखतीमध्ये सनीने असे म्हटले की, आम्ही नेहमी अनेकदा एकमेकांसोबत छान गप्पा मारतो. आमच्यामध्ये जरी दिर आणि वहिनीचे नाते असले तरी आम्ही चांगले मित्र देखील आहोत. आम्ही आमच्या कुटुंबीयांसोबत नेहमी एकत्रितरित्या गप्पा मारत असतो. आमच्या बोलण्यामध्ये देखील अनेक कॉमन टॉपिक असतात, ज्यामुळे आमच्या संवाद जास्त प्रभावी ठरतो.
कॅटरिना कैफच्या कामाबद्दल बोलायचं झाल्यास तिने आतापर्यंत वेगवेगळ्या चित्रपट देखील केलेले आहे परंतु सनी कौशल देखील चित्रपट क्षेत्रामध्ये मोठ्या प्रमाणावर सक्रिय आहे.”चोर निकल कर भागा”या चित्रपटांमध्ये सनीने अभिनय केला होता. हा चित्रपट रिलीज झाला होता. या चित्रपटांमध्ये सनी सोबत गौतमी आणि शरद केळकर देखील आपल्याला पाहायला मिळतील.
चित्रपट दिग्दर्शक अजयसिंह यांच्या या चित्रपटाला मोठ्या प्रमाणावर प्रेक्षक पसंती देत आहे. पुढच्या वेळेला आपल्याला सनी कौशल तापसी पन्नू सोबत एका नव्या चित्रपटांमध्ये दिसतील. या चित्रपटाचे नाव आहे “फिर आयी हसीन दिलरुबा” त्याच बरोबर कॅटरिना कैफ बद्दल बोलायचे झाल्यास कॅटरिना आपल्याला सलमान खान सोबत चित्रपट “टायगर थ्री” मध्ये दिसेल त्याचबरोबर फरकटरचा आगामी चित्रपट जिलेजारामध्ये देखील आलिया भट आणि प्रियंका चोपडा यांच्यासोबत कॅटरिना आपल्याला पाहायला मिळेल.