“पुणे तिथे काय उणे” अशी एक म्हण आपण सगळे जण जाणतात आणि या पुणे शहरामध्ये अशा काही जगावेगळ्या घटना घडत असतात त्यामुळे पुणे शहर अनेकदा चर्चेमध्ये येत असते. बहुतेक वेळा म्हणून सर्वांच्या मुखी पुणे शहराचे नाव येत असते त्याचबरोबरीने पुणे वाहतूक पोलिसांच्या अनेक बातम्या सध्या समाज माध्यमांवर व्हायरल होत आहे त्यांनी केलेल्या वेगवेगळ्या चांगल्या कामगिरीबद्दल अनेकदा पुणे वाहतूक पोलीस प्रकाशझोतामध्ये सुद्धा येत असतात परंतु कधीकधी चुकीच्या गोष्टी मुळे सुद्धा पुणे वाहतूक पोलीस हे चर्चेचे विषय सुद्धा बनलेले आहे.
यावेळीसुद्धा पुणे वाहतूक पोलीस अशाच एका चर्चेचा विषय बनले आहेत परंतु या वेळी घटना मात्र वेगळी आहे. या घटनेवर अनेक नागरिकांनी रोष, तीव्र संताप सुद्धा व्यक्त केलेला आहे. नागरिकांनी या घटनेला पुणे वाहतूक पोलिसांचा बेजबाबदारपणाचा “कळस” असे म्हंटले आहे. या घटनेवर वेगवेगळ्या स्तरावरून पुणे वाहतूक पोलिसांवर टीका करण्यात येत आहे, परंतु नेमके प्रकरण काय आहे ? हे आज आपण या आपल्या लेखांमधून जाणून घेणार आहोत.
ही घटना सध्याच्या काही दिवसांमध्ये पुणे येथील नाना पेठ या भागांमध्ये घडली. पुणे वाहतूक पोलीस यांच्या कर्मचाऱ्यांनी या भागांमध्ये नो पार्किंग अंतर्गत मध्ये ज्या काही गाड्या पार्क केलेल्या होत्या त्या उचलत असताना अशी एक नेमकी घटना घडली की या घटनेमुळे पोलीस वाहतूक एक आणि टोईंग कर्मचारी यांच्यावर नामुष्की ओढवली गेली. पोलिसांनी नो पार्किंग मध्ये लावलेली बाईक वर कारवाई करत असताना बाईकवर बसलेल्या व्यक्तीला बाईक सह उचलले. म्हणूनच एक व्यक्ती बाईक वर बसलेली असताना बाईक टोईंग( क्रेन) ने उचलण्याची धक्कादायक घटना घडल्याचा एक व्हिडिओ सर्वांसमोर आलेला आहे आणि हा व्हिडिओ सोशल मीडियावर धुमाकूळ घालत आहे.
ही कारवाई घडत असताना बाईकवर बाईक चालक बसलेला असताना पोलिसांनी ही कारवाई केली परंतु ही कारवाई करत असताना बाईक चालकला पोलिसांना विनंती सुद्धा केली होती परंतु पोलिसांनी त्यांचे काहीही न ऐकता आपली कारवाई पुढे केली यावर पोलीस विभागातील सुद्धा वाहतूक कारवाई बाबत नियम पाळले न गेल्याची हळहळ व्यक्त करण्यात आलेली आहे आणि म्हणूनच यावर पुणे वाहतूक पोलिसांनी त्वरित चौकशी करण्याचे आदेश सुद्धा दिलेले आहेत.
पुणे वाहतूक विभागाचे उपायुक्त श्री राहुल शिंदे यांनी या प्रकरणाबद्दल स्पष्टीकरण देताना सांगितले की, हा जो काही प्रकार घडलेला आहे तो काही ठरवून घडवलेला नाही, अचानकपणे घडलेला आहे. बाईक चालक यांनी आपली बाईक नो पार्किंगमध्ये पार्क केली होती आणि तो व्यक्ती एका कामानिमित्त समोरच्या बिल्डिंगमध्ये गेला होता. खाली आल्यावर आपली बाईक टोईंग कर्मचारी उचलत असतानाचे त्याने पाहिले, अश्या वेळी त्याने टेम्पोवर चढून आपल्या बाईकवर बसला.
बाईक स्वारला खाली उतरण्याची विनंती केली असता तो काही खाली उतरत नव्हता त्यानंतर सरकारी कामांमध्ये अडथळा निर्माण केल्याबद्दल त्याच्यावर कारवाई होऊ शकते. याचा अंदाज दिल्यावर त्या बाईकवाल्याला आपली चूक कळाली व तो त्या बाईक वरून खाली उतरला. या व्यक्तीने एकंदरीत चार्ज म्हणजेच कायदेशीर दंड भरलेला आहे. नो पार्किंग आणि एकंदर चारशे साठ रुपये असा दंड भरलेला आहे. या प्रकरणासंबंधी जे काही पोलीस अधिकारी व कर्मचारी दोषी असतील त्यांच्यावर योग्य ती चौकशी करून कारवाई सुद्धा केली जाईल असे पुणे वाहतूक पोलीस उपायुक्तांनी सांगितले.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !