दोन लोक जेव्हा एकमेकांच्या प्रेमात पडतात तेव्हा त्यांचे जग जणू एकमेकांभोवतीचं फिरते. आपल्याला सतत एकमेकांसोबत राहायला आवडतं, वेळ घालवायला आवडतो, दिवसभर एकमेकांशीच बोलत राहावंसं वाटतं. पण जर ते काही कारणास्तव एकमेकांपासून दूर राहिले तर दोघांना ही एकमेकांची आठवण येते.
दोघांच्याही मनात भेटीबद्दल इच्छा जागृत राहतात. पण तुम्हाला माहित आहे का की मुली जेव्हा त्यांच्या बॉयफ्रेंडला मिस करतात तेव्हा काय करतात? खरं तर, जेव्हा मुली प्रेमात पडतात तेव्हा त्यांचा संपूर्ण दिवस त्यांच्या प्रियकराभोवती फिरत असतो जेव्हा आपल्या प्रियकरापासून त्या दूर असतात तेव्हा त्या दिवसभर त्यांच्या प्रियकराची स्वप्ने पाहत असतात.
जोडीदारापासून दूर गेल्यावर मुली त्यांची हेरगिरी करू लागतात. त्या सोशल मीडियावर बॉयफ्रेंडचे प्रोफाईल पाहू लागतात आणि दर तासाला त्यांचे स्टेटस चेक करत असतात. त्याच्या पोस्ट्सपासून कंमेंट्सपर्यंत सगळं वाचत राहतात. याशिवाय तो आता काय करतोय, कोणासोबत आहे, कुठे आहे याबद्दल दर दोन तासांनी फोन करुन बोलत असतात.
जेव्हा मुलींना त्यांच्या बॉयफ्रेंडची आठवण येते तेव्हा त्यांना त्यांच्या जोडीदाराच्या आवडीचे गाणे ऐकायला आवडते, ज्यामुळे त्यांना आनंद होतो. इतकेच नाही तर ती तिच्या जोडीदाराने दिलेले गिफ्टही पुन्हा पुन्हा पाहत असते. जेव्हा एखादी मुलगी रोमँटिक चित्रपट पाहते तेव्हा ती त्या चित्रातील मुलाला पाहून तिच्या प्रियकराचा विचार करू लागते. तिला स्वतःला तिच्या प्रियकराच्या मिठीत असल्याचे वाटू लागते.
शक्य असल्यास, मुली, जेव्हा त्यांना त्यांच्या बॉयफ्रेंडची आठवण येते तेव्हा त्यांच्याशी तासनतास फोनवर बोलतात. असे केल्याने, आपण आपल्या जोडीदारापासून दूर असल्याची भावना त्यांना येत नाही. जोडीदाराला मिस करत असताना मुली तासनतास त्यांचा फोटो बघत राहतात. यामुळे त्यांना जोडीदारापासूनचे अंतर कमी जाणवते.
जोडीदारापासून दूर गेल्यावर मुली रोमँटिक चित्रपट पाहू लागतात. खरंतर, एक रोमँटिक चित्रपट पाहिल्यानंतर, ती स्वतःला तिच्या प्रियकराच्या मिठीत असल्यासारखे भासू लागते.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !