Headlines

१ जानेवारीला १० करोडपेक्षा अधिक शेतकऱ्यांना मिळणारं नव्या वर्षाची भेटवस्तू, पंतप्रधान मोदी ट्रान्सफर करणार पैसे !

प्रत्येकाला नव्या वर्षाची उत्सुकता लागून राहिली आहे. नव्या वर्षात कोणत्या चांगल्या गोष्टी घडणार, येणारे वर्ष नेमकं काय घेऊन येणार याकडे सर्वांचे लक्ष आहे. याचं काळात आता आपल्या देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी आपल्या देशातील शेतकऱ्यांना १ जानेवारी २०२२ ला नव्या वर्षाची एक भेटवस्तू देणारं आहे. यादिवशी पंतप्रधान मोदीजी किसान सम्मान निधी योजनेचा १० वा हफ्ता शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये जमा करणार आहेत.

१ जानेवारीला दुपारी १२:३० वाजता व्हिडीओ कॉन्फेरेंसिंगद्वारे हा हफ्ता खात्यामध्ये ट्रान्सफर करतील. यादिवशी १० करोडपेक्षा अधिक लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये २०, ००० करोडपेक्षा अधिक रक्कम ट्रान्सफर केली जाईल. या लाभार्थ्यांनी बँक खात्याची ई-केवायसी करून घ्यावी. सरकारकडून या लाभार्थ्यांना मेसेज देखील करण्यात आले आहे, ज्यात सांगितले आहे की १ जानेवारीला त्यांच्या खात्यात पैसे जमा केले जाणारं आहेत. या योजनेच्या लाभार्थ्यांनी लवकरात लवकर बँक खात्याची ई-केवायसी करून घ्यावी, कारण ई-केवायसी न केल्यास आपल्या खात्यात पैसे ट्रान्सफर केले होणार नाहीत.

वर्षभरात २-२ हजाराचे तीन हफ्ते खात्यामध्ये जमा केले जातात. किसान सम्मान निधी योजनेचे आतापर्यंत ९ हफ्ते लाभार्थ्यांच्या खात्यामध्ये जमा करण्यात आले आहेत. वर्षातून तीन हफ्ते सरकारद्वारे खात्यामध्ये पाठवले जातात. म्हणजेच वर्षभरात ६ हजार रुपये या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना मिळतात.

सरकारने १०वा हफ्ता खात्यामध्ये जमा करण्यापूर्वी लाभार्थ्यांची एक नामावली pmkisan.gov.in या पोर्टलवर अपलोड केली आहे. लाभार्थी आपले नावं या नामावलीमध्ये तपासू शकतात. यामध्ये कृषी आणि किसान कल्याण मंत्रालय, पीएम किसान सम्मान निधीच्या अंतर्गत या योजनांचा लाभ घेणाऱ्या लाभार्थ्यांची नावे सामील आहेत. नाव तपासून पाहण्यासाठी पुढील कृती करावी.

१. सुरुवातीला pmkisan.gov.in या पोर्टलवर जावे. २. या वेबसाईटच्या होम पेजवरील ‘फॉर्मर कॉर्नर’ मध्ये जाऊन लाभार्थी सूची / बेनिफिशियरी लिस्ट टॅब वर क्लिक करावे. ३. आपले राज्य, जिल्हा, उप-जिल्हा, ब्लॉक आणि गाव ही माहिती भरावी. ४. या नंतर get report वर क्लिक केल्यावर आपल्याला सर्व माहिती मिळेल. ज्या शेतकऱ्यांना या योजनेचा लाभ सरकारकडून देण्यात येणार आहे त्यांचे नाव/जिल्हा/तहसील/गाव यांच्या आधारे पाहता येते.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !