सासू- सून म्हटलं कि त्याच्यात होणारी भांडणं ही जगजाहिर आहेत. याला काही जणी अपवाद असतात पण तरीही. असं म्हणतात कि एका म्यानेत दोन त*ल*वा*री कधीच राहु शकत नाही. सासू सूनेचे नाते सुद्धा असेच असते. सासु आणि सुनेत वयाचे तसेच त्यांच्या घरातल्या पद्धतींचे अंतर असल्यामुळे त्या दोघींमध्ये कोणत्या ना कोणत्या कारणावरुन तक्रारी या असतातच.
या दोघींच्या भांडणात नवरा मधल्या मध्ये अडकुन जातो. कारण त्याला त्याची आई व बायको या दोघींच्या खुशीची काळजी घ्यायची असते. याशिवाय त्या दोघींच्या कलहामुळे घरात सुद्धा अशांती नांदते. या दोघींमधील भांडणे मिटवण्यासाठी आम्ही तुम्हाला काही सोप्पे उपाय सांगणार आहोत.
हे उपाय जर सासू-सूनेने केल्यास त्या त्यांच्यातील दुश्मनी विसरुन एकमेकिंच्या चांगल्या मैत्रिणी बनतील. जर सासू सुन या अॅक्टीव्हिटी करण्यास तयार नसतील तर घरातील इतर सदस्याने त्यांना या अॅक्टीव्हीटी करण्यास भाग पाडावे. त्यामुळेच या दोघींमधील प्रेम वाढुन त्यांच्यात चांगले संबंध निर्माण होतील.
डान्स – तुमच्या घरात सासु सूनेत सतत क*ल*ह असेल तर घरात एक छोटे समारंभ आयोजित करा. त्यानंतर या समारंभात सासू सूनेला एकाच गाण्यावर एकत्र डान्स करणास भाग पाडा. या सर्व गोष्टी व्यवस्थित पुर्व नियोजित करुन ठेवा. डान्स ही एक छान दंगा मस्ती असलेली अॅक्टीव्हीटी आहे. त्यामुळे जर ही अॅक्टीव्हीटी सासूसुनेने एकत्र केली तर दोघींना त्याची मजा घेता येईल. शिवाय त्यानिमित्ताने त्या एकमेकिंच्या आणखी जवळ येतील.
आवडीचा शो किंवा चित्रपट – बाप बेटे जसे एकत्र बसुन क्रिकेट आवडीने बघतात. तशीच सिरीयल किंवा एखादा चित्रपट सासू सूनेला एकत्र पाहायला द्या. या मध्ये एक गोष्ट लक्षात ठेवा कि एखादा सासु-सुनेच्या भांडणाचा कार्यक्रम किंवा चित्रपट लावु नका. शक्यतो एखादा रियालिटी किंवा कॉमेडी शो किंवा चित्रपट पाहण्यास द्या. दोन विरुद्ध व्यक्तींना एकत्र आणण्याचे काम कॉमेडीमुळे होते.
व्हेकेशन ट्रिप – पति, किंवा मित्रमंडळींसोबत तुम्ही अनेकदा फिरायला गेला असाल. मात्र एखादी अशी ट्रिप ऑर्गनाइज करा जी केवळ सासु सुनेची असेल. त्या दोघींना कुठेही जवळच किंवा कुठेही लांब फिरायला पाठवा. दोघींनी एकत्र जर घराबाहेर एकत्र वेळ घालवला तर त्यांना एकमेकांना समजायला वेळ मिळेल तसेच त्या एकमेकिंच्या आणखी जवळ येतील. तसेच बाहेरच्या वेगळ्या वातावरणात त्यांना थोडे बरे वाटेल आणि रोजच्या कांमामधुन सुद्धा थोडा आराम मिळेल.
शॉपिंग – महिलांना शॉपिंग करणे किती आवडते हे वेगळे सांगायची गरज नाही. त्या कधीही शॉपिंगसाठी तयार असतात. अशातच जर तुम्ही सासू-सूनेला एकत्र शॉपिंगला पाठवलात तर त्यांच्यातील प्रेम आणि अण्डरस्टॅंडिंग वाढेल. त्यांना एकमेकिंच्या आवडीनिवडी कळतील. शॉपिंग दरम्यान त्या एकमेकिंना छोटसं गिफ्टसुद्धा देऊ शकतात.
डीनर आणि मजा मस्ती – कधी कधी सासू-सुनेने एकत्र बाहेर जेवायला जायचा प्लॅन बनवावा. जेवायला गेल्ययावर छान गप्पा गोष्टी करत जेवणाचा आस्वाद घ्यावा. घरातला ताण, उरलेली कामे विसरुम एकमेकिंच्या सहवासात जेवण करावे. दरम्यान एकमेकींना जोक्ससुद्धा सांगावे. असे केल्यास सासु सुना दुश्मनी वरुन एकमेकिंच्या चांगल्या मैत्रिणी बनतील. आणि त्यांच्यात भांडणे होणार नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !