Headlines

या कारणामुळे प्रत्येक नवरा त्याच्या मेव्हणीचे लाड पुरवत असतो, कारण जाणून थक्क व्हाल !

जीजा आणि साली असे ऐकताच अनेकांच्या मनात वाईट विचार येतात. काही लोकांनी या नात्याला बदनाम करुन ठेवले आहे. खरेतर हे नाते खुप चांगले आणि पवित्र आहे. मेहुणी ही एक प्रकारे त्यांच्या भाऊजींची बहिणच असते. मेहुण्या नेहमीच त्यांच्या भाऊजींची त्यांच्या सख्या भावाप्रमाणेच मजामस्ती करतात. तर भाऊजी सुद्धा त्यांच्या मेहुणीचे सर्व नखरे पुरवतात. पण भाऊजी असे का करतात ते तुम्हाला माहित आहे का … चला तर जाणुन घेऊ या नात्याबद्दल सविस्तर माहिती !

1. मेहुणी ही तुमच्या बायकोला लहानपणापासुन ओळखते. त्यामुळे तुम्हाला जर तुमच्या बायकोचे एखादे रहस्य जाणुन घ्यायचे असेल किंवा तिच्या आवडी निवडी जाणुन घ्यायच्या असतील तर या सर्व गोष्टी मेहुणी चांगल्याप्रकारे सांगु शकते. मात्र या सर्व गोष्टी ती तेव्हाच सांगेल जेव्हा तुम्ही तिला चांगली वागणुक द्याल. किंवा तिला एखादी भेटवस्तु द्याल.

2. मेहुण्या अनेकदा तुमच्या चेहऱ्यावर हसु फुलवतात. साधारणपणे एखाद्या नवऱ्याचे आयुष्य हे खुप दगदगीचे असते. नव्या लग्नानंतर त्याच्यावरील जवाबदाऱ्या वाढतात. यावर कामाचे प्रेशर सुद्धा असते. अशावेळी जेव्हा मेहुण्या जेव्हा घरी येतात तेव्हा तो वेळ छान हसत खेळत जातो. त्यामुळे तुमचा मुड फ्रेश होतो. त्यामुळे तुम्हाला तुमच्या घऱी मेहुण्यांना आमंत्रण दिले पाहिजे.

3. जेव्हा तुमची बायको आजारी असेल किंवा मुलांच्या बाबतीत तिला कोणती मदत हवी असेल त्यावेळी तुम्ही हक्काने तुमच्या मेहुणीकडे मदत मागु शकता. तुमची मेहुणी तुमच्या बायकोसोबत खुप वेळ राहुन तिची देखभाल करु शकते. अडचणीच्या वेळी ती कामी येते. त्यामुळे मेहुणीची सुद्धा काळजी घेणे ही तुमची जबाबदारी आहे. यासाठी तुम्ही तिचे नखरे थोड्याफार प्रमाणात नक्कीच झेलु शकता.

4.जर तुमची मुल असतील तर ते त्यांच्या मावशीसोबत म्हणजेच तुमच्या मेहुणीसोबत खुप मजा मस्ती करतात. मुलांसोबत खेळणे किंवा सांभाळणे त्यांना नेहमीच आवडते. त्यामुळे तुम्ही तुमच्या मेहुणीसोबत कोणता ही भे’द’भा’व न करता तिच्यासोबत चांगला व्यवहार करा.

याच काही कारणांमुळे भाऊजी तिच्या मेहुणींचे सर्व काही ऐकतात. तिचे नखरे झेलतात. पण हे पवित्र नाते कधी बदनाम होणार नाही ना याची काळजी घ्या. त्याची मर्यादा ठेवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !