आयुष्यातल्या वेगवेगळ्या टप्प्यांवर योग्य कृती कोणती याचा निर्णय घेण्यासाठी प्रखर बुद्धीची गरज असते. आयुष्यात आपल्याला अनेकदा वेगवेगळ्या समस्यांना ताणतणावांना तोंड द्यावे लागते.अशा आव्हानांना सामोरे जाऊन त्याच्यातून यशस्वीरीत्या बाहेर पडण्यासाठी लागणारी बुद्धी हे केवळ मनुष्यप्राण्याला आहे.
बाकी सर्व जीवचर बुद्धीच्या अभावी परिस्थितीचे शिकार होत असतात. माणसाकडे असलेली प्रखर बुद्धिमत्ता ही बाह्य प्रतिकुलते चा सामना करु शकते व तसेच त्यातून मार्ग सुद्धा काढू शकते. आयुष्यातील अडचणी पार करून जगण्याचा आनंद मिळतो तो इतर कशातच मिळत नाही. आणि या अडचणीतून बाहेर पडण्यासाठी माणूस जेव्हा कष्ट करून स्वतःची बुद्धी वापरतो त्या वेळी त्याला स्वतः मध्ये असलेल्या बुद्धीचा परिचय होतो.
लहानपणी आपल्याला अनेकदा एक अस्वल आणि दोन मित्रांची गोष्ट ऐकायला मिळाली असेल ज्यात समोर संकट आल्यावर एक मित्र भराभर झाडावर चढतो आणि दुसऱ्याला चढता येत नाही त्यावेळी तो मेल्याचे नाटक करून तेथेच पडून राहतो त्यामुळे अस्वल अमृता शरीर आहे असे समजून खात नाही व पुढे निघून जातो. या गोष्टीतून आपल्याला त्या मुलाने लढवलेल्या युक्तीची कल्पना येते.
असेच काहीसे पुढील चित्रात घडलेले दिसते. खाली लिहिलेला फोटो नीट झूम करून पहा त्यात तुम्हाला एक माणूस, सिंह, साप आणि मगर दिसेल. फोटोत दिसणाऱ्या या चौघांना एकत्र पाहून तुम्ही येथे काय घडले असेल याची कल्पना करू शकता. जर तुम्हाला अजूनही ही गोष्ट समजली नसेल तर आम्ही तुम्हाला सांगतो.
येथे जंगलात एक शिकारी शिकार करण्यासाठी नदीकाठी येतो त्यावेळी अचानक तेथे सिंह येतो. सिंहाला घाबरुन तो शिकारी नदीत उडी मारणार तितक्यात त्याला जाणवते नदीमध्ये मगर सुद्धा बाहेर आलेली आहे. इकडे आड तिकडे विहीर अशी परिस्थिती निर्माण झाल्यामुळे तो शिकारी मगर व सिंहापासून वाचण्यासाठी मागे असलेल्या झाडावर चढून लपून बसण्याचा निर्णय घेतो. झाडावर चढताना त्याच्याकडे असलेली बंदूक खाली पडते आणि झाडावर चढल्यावर त्याच्या लक्षात येते की तेथे एक विषारी साप सुद्धा आहे.
नदीमध्ये मगर,जमिनीवर सिंह आणि झाडावर विषारी साप अशा तिहेरी संकटामध्ये तो अडकलेला असतो. अशातच अजून एक संकट म्हणजे संकटापासून वाचण्यासाठी ची बंदूक त्याने घेतलेली असते तीसुद्धा खाली पडलेली असते. आता तुम्हाला हा प्रश्न पडला असेल की तो शिकारी येथून सुखरूप बाहेर कसा पडेल. अनेकांना डोकं चालवून सुद्धा याचे उत्तर मिळालेले नाही पण काळजी नसावी. आम्ही तुम्हाला याचे उत्तर देतो.
यातून बाहेर पडण्यासाठी तो शिकारी पुढील दोन मार्गाने बाहेर पडू शकेल –
१) – त्या शिकाऱ्याने सापाला पकडून एका झटक्यात सिंहाच्या अंगावर फेकावे, अचानक झालेल्या हमल्या मुळे त्या सिंहाचे लक्ष विचलित होईल आणि या गोष्टीचा फायदा घेऊन त्याने पटकन खाली उतरून बंदूक उचलावी.
२)- त्या शिकाऱ्याला जर साप पकडण्याची भीती वाटत असेल तर त्याने झाडावरील एका काठीने सापाला मारावे आणि मग सिंहाच्या अंगावर फेकावे किंवा साप असलेली फांदी हलवून त्याला पाण्यात पाडावे जेणे करून मगर शांत होईल आणि सिंह झोपण्याची किंवा तेथून जाण्याची वाट पहावी, कारण सिंह हा एकमेव प्राणी आहे जो जास्त वेळ एका जागी उभा राहू शकत नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका.