राजस्थानच्या चुरू जिल्ह्यातील राजगड मध्ये २४८ घरांचं एक छोटे गाव आहे जनाऊ खारी. या गावातील एका मुलीने मेहनतीच्या बळावर भरगोस यश संपादन केले. त्यामुळे आता ही मुलगी तरुणाईच्या गळ्यातील ताईत असून प्रत्येकासाठी आयडॉल बनली आहे.
छोट्या जागेत राहून सुद्धा आपण एका उच्च स्तरावर पोहोचू शकतो असा विश्वास तिने तरुणाईला दिला. या मुलीचे नाव आहे प्रिया पूनिया! प्रिया पूनिया ही भारतीय महिला क्रिकेट टीम ची एक खेळाडू आहे. ऑक्टोबर २०१९ मध्ये दक्षिण आफ्रिके विरोधात झालेल्या सामन्यात प्रिया अनेक चौके छ’क्के मारताना दिसली होती.
असा होता प्रियाचा प्रवास – एका वेबसाईट सोबत बोलताना प्रियाचे वडील सुरेंद्र पुनिया यांनी प्रियाला तिच्या प्रवासात कोण कोणत्या अडचणींचा सामना करावा लागला याबाबत सांगितले. प्रियाचे वडील भारतीय सर्वेक्षण विभागात काम करतात. ६ ऑगस्ट १९९६ ला जणाऊ खारी मध्ये प्रिया चा जन्म झाला.
त्यानंतर त्यांच्या सततच्या बदलीमुळे त्यांचे पोस्टींग अजमेर, जयपूर, दिल्ली येथे होत राहिले. प्रियाने तिचे ग्रॅज्युएशन दिल्लीमधून पूर्ण केले. सध्या प्रिया दिल्लीकडून महिला क्रिकेट संघात खेळत आहे. प्रिया बद्दल विशेष सांगायचे झाल्यास गेली दहा वर्षे ती ओपनर बल्लेबाज म्हणून मैदानात उतरत आहे.
गेल्या वर्षी पूर्ण केले दोन शतक – भारतीय महिला क्रिकेट संघातील खेळाडू प्रिया पूनिया ही उत्कृष्ट बॅट्समन आहे. गेल्यावर्षी ऑक्टोबर नोव्हेंबर मध्ये झालेल्या सीनियर वुमन वन-डे चॅम्पियनशिप बेंगलोर मधील आठ सामन्यांमध्ये प्रियाने दोन शतकांची खेळी केली होती. या सामन्यात तिने ४०७ रन्स बनवले.
या सामन्यात प्रियाला बेस्ट 3 प्लेयर मध्ये स्थान मिळाले होते. तिच्या या दमदार खेळीमुळे यावर्षी तिला न्युझीलँड दौऱ्यासाठी भारतीय महिला टीम मध्ये निवडण्यात आले. याव्यतिरिक्त सिनियर नॅशनल महिला t20 चॅम्पियनशिपमध्ये प्रियाने दहा सामन्यात ३८२ रन बनवले.
जयपुर मधील घर विकून खरेदी केली जमीन – प्रियाच्या वडिलांनी सांगितले की त्यांच्या मुलीला वयाच्या सातव्या वर्षापासून खेळा मध्ये भरपूर रस होता. सुरुवातीला त्यांनी दिला लॉन टेनिस आणि बॅडमिंटन शिकवले. मात्र तिला त्यात फारसा नव्हता त्यामुळे तिने क्रिकेट अकॅडमी जॉईन केली. त्यानंतर त्यांची जयपूरला बदली झाली व ते जयपूर मध्ये राहू लागले.
जयपूर ला आल्यावर तिची कॉचींग नीट होत नसल्यामुळे त्यांनी जयपूर मधील त्यांचे २२ लाखांचे घर विकून जयपूरमधील एक शेत जमीन खरेदी केली. तेथे त्यांनी शेती न करता मुलीसाठी क्रिकेटचे मैदान तयार केले. त्यावर ती प्रॅक्टिस करू लागली.
टीम इंडियाची जर्सी घातल्यावर अंगात रोमांच भरून येतो – दक्षिण आफ्रिका दौऱ्यावर जाण्यासाठी भारतीय महिला क्रिकेट संघात प्रिया पूनिया ला जागा मिळाली. याबाबत मीडियाशी बोलताना प्रियाने सांगितले की टीम इंडिया की जर्सी घातल्यावर शरीरात रोमांच भरून येतो. यामुळे चांगला परफॉर्मन्स करण्याची ऊर्जा तिला मिळते.
दक्षिण आफ्रिकेला जाण्यापूर्वी प्रियाने १२ सप्टेंबरला बेंगलोर येथे झालेल्या शिक्षण शिबिरात भाग घेतला होता. प्रियाने मिळवलेल्या या यशामुळे तिच्या गावात तिचे भरपूर कौतुक होत आहे. तिची आई सरोज पुनिया या गृहिणी आहेत व तिचा भाऊ राहुल पूनिया हा देखील क्रिकेटमध्ये करियर बनवत आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !