Headlines

ही आहेत जगातील सर्वात महागडी लग्न, यात आहे एका भारतीयाचा पण समावेश !

लग्न ही एक अशी गोष्ट असते जी तो दिवस कायम लक्षात राहण्यासाठी प्रत्येकजण प्रयत्न करत असतो. त्यासाठी लग्नात लोक डोळे बंद करून पैसे खर्च करतात. फक्त भारतातच नव्हे तर संपूर्ण जगात असे अनेक लोक आहेत जे लग्नावर खूप पैसे उधळतात. आज आम्ही तुम्हाला दुनियेतील सर्वात महागड्या लग्नात बद्दल माहिती देणार आहोत. या लग्न झालेला खर्च एकूण तुम्ही नक्कीच थक्क व्हाल.
१) प्रिन्स चाल आणि लेडी डायना –
ब्रिटनच्या रॉयल फॅमिली चे सदस्य असलेल्या प्रिन्स चार्ल्स आणि लेडी डायना चे लग्न १९८१ मध्ये झाले होते. त्या काळात सुद्धा या जोडप्याने स्वतःच्या लग्नावर खूप पैसा खर्च केला होता. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार या लग्नात एकूण ११० मिलीयन डॉलर म्हणजेच ७९० करोड रुपये खर्च केला गेला होता.
२) वनीषा मित्तल आणि अमित भाटिया –
वनिषा मित्तल ही लंडन येथे राहणाऱे बिझनेस मॅन लक्ष्मीनिवास मित्तल यांची मुलगी आहे. वनीषाने २००४ मध्ये अमित भाटिया सोबत लग्न केले. हे लग्न पॅरिसमध्ये झाले होते. या लग्नात लक्ष्मी मित्तल यांनी छोट्या छोट्या गोष्टींवर देखील भरपूर पैसा खर्च केला होता. या लग्नात अनुमाने ६६ मिलियन डॉलर म्हणजेच ४७४ करोड रुपये खर्च केला होता.
३) प्रिन्स विल्यम आणि केट मिडलटन –
ब्रिटिश रॉयल फॅमिली चे प्रिन्स आणि केट यांचे लग्न मोठे अलिशान पद्धतीने केले होते. या लग्नाची लोक आजही आठवण काढतात. या दोघांचे लग्न २९ एप्रिल २०११ मध्ये झाले होते. जगभरातील मीडियाने या दोघांचे लग्न टीव्हीवर प्रसारित केले होते. हे लग्न करण्यासाठी ३४ मिलियन डॉलर म्हणजेच २४४ करोड रुपये खर्च आला होता.

हे वाचा – कपाळावरील टिकली आणि साडी वाढवते या अभिनेत्रींचं सौंदर्य, बघा कोण आहेत त्या !

हे वाचा – आलिया आणि रणबीरच्या लग्नाबाबत आलियाच्या जवळच्या मैत्रिणीकडून नवीनच खुलासा !

४) वेन रूनी आणि कोलीन –
व्हेन रोहन हा एक फुटबॉलपटू आहे तर कोलीन ही एक टीव्ही सेलिब्रिटी. या दोघांचे लग्न २००८ मध्ये झाले होते. या दोघांनी त्यांच्या लग्नात ८ मिलियन डॉलर म्हणजेच सुमारे ५७ रुपये खर्च केला होता.
५) चेल्सी क्लिंटन आणि मार्क मेजविंस्की –
सेल्सी ही एक अमेरिकन लेखक आहे तर मार्क एक इन्वेस्टर. या दोघांनी त्यांच्या ग्रँड लग्नामध्ये ५ मिलियन डॉलर म्हणजे ३५ करोड रुपये खर्च केले होते.
६) लिजा मिनेली आणि डेव्हिड गेट –
लिजा एक अमेरिकन सिंगर आणि अभिनेत्री आहे तर डेव्हिड हा अमेरिकन टीव्ही शो चा निर्माता आहे. या दोघांनी २००२ मध्ये लग्न केले आणि नंतर २००७ मध्ये त्यांचा घटस्फोट झाला. यांनी त्यांच्या लग्नात एकूण ४.२ मिलियन डॉलर म्हणजेच २९ करोड रुपये खर्च केला होता.

हे वाचा – विक्की कौशलने जेव्हा सलमान खानच्या समोरच कॅटरिनाला घातली लग्नाची मागणी !७) एलिझाबेथ टैलर आणि लहरी फोर्टेसकी –
एलिझाबेथ टैलर ही एक अभिनेत्री होती. तर लैरी हे एक कन्स्ट्रक्शन वर्कर होते. या दोघांनी १९९१ मध्ये लग्न केले आणि पुढील पाच वर्षात म्हणजेच १९९६ मध्ये या दोघांचा घटस्फोट झाला त्यांनी लग्नांमध्ये ४ मिलियन डॉलर म्हणजेच २८ रुपये खर्च केले होते.

८) ईशा अंबानी आणि आनंद पीरामल –
भारताचे सर्वात मोठे श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची लेक ईशा अंबानीचे लग्न आनंद पीरामल यांच्याशी १२ डिसेंबर २०१८ ला झाले. हे लग्न खूप ग्रँड होते या लग्नात बॉलीवूड पासून ते राजकारणातील अनेक मातब्बर व्यक्ती सहभागी होत्या. हे लग्न एका मोठ्या सोहळ्यापेक्षा कमी नव्हते.
मुकेश अंबानी यांनी या लग्नासाठी पाण्यासारखा पैसा खर्च केला होता एका रिपोर्टनुसार मुकेश अंबानींनी त्यांच्या लाडक्या लेकीसाठी या लग्नात १०० मिलियन डॉलर म्हणजेच तब्बल ७१८ करोड रुपये खर्च केला होता.

हे वाचा – पती पत्नीच्या वयात, पती मोठा व पत्नी लहान का असावी, जाणून घ्या कारण !

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !

 

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *