Headlines

हे आहेत भारतातील सर्वात श्रीमंत १० लोक, संपत्ती पाहून तुम्हीही हैराण व्हाल !

आपल्या कर्तृत्त्वाच्या जोरावर श्रीमंत व्यक्ती म्हणून प्रसिद्धी मिळवण्यात भारतातील उद्योगपती देखील पिछाडीवर नाहीत. जगभरातील अनेक श्रीमंत व्यक्तींच्या यादीत या भारतीयांची नावे घेतली जातात. तर अशाच पहिल्या १० श्रीमंत भारतीयांच्या संपत्तीबद्दल आज आपण जाणून घेणार आहोत; चला तर बघूया कोण आहेत सर्वाधिक श्रीमंत भारतीय….

१. मुकेश अंबानी – भारतातील प्रथम क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणून मुकेश अंबानी यांना ओळखलं जातं. रिलायन्स ग्रुपचे ते सर्वेसर्वा आहेत. रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेड मुख्यतः रिफायनिंग, पेट्रोकेमिकल्स आणि तेल व वायू क्षेत्रातील व्यवहार करते. रिलायन्स रीटेल लिमिटेड, भारतातील सर्वात मोठी किरकोळ विक्रेता आहे. रिटेल मार्केट्स आणि दूरसंचार सारख्या उत्पादने आणि सेवा पुरवण्यासाठी व्यवसायांनी बऱ्याच वर्षांपासून विस्तार केला आहे. भारतीय उद्योगपती, अध्यक्ष, व्यवस्थापकीय संचालक आणि रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडचे सर्वात मोठे भागधारक म्हणून त्यांची ओळख आहे. त्यांच्या संपत्तीचा एकूण आकडा तब्बल ८३ बिलियन डॉलर्स इतका आहे. फोर्ब्सच्या जगातील सर्वात शक्तिशाली लोकांच्या यादीत ते एकमात्र भारतीय उद्योजक आहेत.

२. गौतम अदानी – भारतातील दुसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणजे गौतम अदानी. गौतम अदानी हे एक भारतीय उद्योगपती असून ते अदानी ग्रुपचे अध्यक्ष आहेत. अदानी समूहाचा जागतिक दर्जाचा एकात्मिक पायाभूत सुविधा हाताळण्याचा व्यवसाय आहे ज्यामध्ये कोळसा व्यापार, कोळसा खाण, तेल आणि वायू शोध, बंदरे, मल्टी-मोडल लॉजिस्टिक्स, वीज निर्मिती आणि प्रसारण आणि वायू वितरण यांचा समावेश आहे. ३२ बिलियन डॉलर्स हा त्यांच्या संपत्तीचा आकडा आहे. गौतम अदानी यांना व्यापार-वाहतूक आणि वाहतूक-संबंधित पायाभूत सुविधांच्या विकासासाठी जगभरातील १०० सर्वात प्रभावी व्यावसायिकांमध्ये त्यांची गणना केली जाते.

३. शिव नाडर – भारतातील तिसऱ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणजे शिव नाडर. नाडर हे एचसीएल टेक्नॉलॉजीज लिमिटेड आणि शिव नाडर फाउंडेशनचे संस्थापक आणि अध्यक्ष आहेत. यांनी १९७० च्या दशकाच्या मध्यावर HCL कंपनीची स्थापना केली आणि पुढील तीन दशकांमध्ये आपल्या कंपनीमध्ये सतत सुधारणा करून IT हार्डवेअर कंपनीला IT Enterprise मध्ये रूपांतरित केले. आयटी उद्योगातील त्यांच्या प्रयत्नांसाठी २००८ मध्ये नादर यांना पद्मभूषण पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. शिव नाडर यांची एकूण संपत्ती २७ बिलियन डॉलर्स इतकी आहे. शिव नाडर फाउंडेशन या संस्थेच्या माध्यमातून भारताची शैक्षणिक व्यवस्था विकसित करण्यावर आपले लक्ष केंद्रित केले आहे.

४. लक्ष्मी मित्तल – भारतातील चौथ्या क्रमांकाची श्रीमंत व्यक्ती म्हणजे लक्ष्मी मित्तल. आर्सेलर मित्तल, जगातील सर्वात मोठी स्टील निर्मिती कंपनीचे हे कार्यकारी अध्यक्ष आहेत, तसेच स्टेनलेस स्टील उत्पादन अपेरमचे अध्यक्ष आहेत. मित्तल यांच्याकडे आर्सेलर मित्तलचा ३८% हिस्सा आहे आणि ईएफएल चॅम्पियनशिपच्या क्वीन्स पार्क रेंजर्समध्ये २०% हिस्सा आहे. त्यांच्या संपत्तीचा एकूण आकडा १९ बिलियन डॉलर्स इतका आहे. लक्ष्मी मित्तल हे जागतिक स्तरावरील अनेक संस्थांच्या कार्यकारी पदावर आहेत.

५. सायरस पूनावाला – सायरस एस. पूनावाला (जन्म 1941) हे एक भारतीय उद्योगपती आहेत आणि सायरस पूनावाला ग्रुपचे अध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत, ज्यात सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचा समावेश होतो जी एक भारतीय बायोटेक कंपनी आहे जी जगातील सर्वात मोठी लस उत्पादक कंपनी आहे. सीरम दरवर्षी लसींच्या श्रेणीचे 1.5 अब्ज डोस तयार करते, ज्यात गोवर, पोलिओ आणि फ्लू या आजारांच्या लसींचा समावेश आहे. सायरस पूनावाला हे भारतातील पाचव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती असून १८.५ बिलियन डॉलर्स इतकी त्यांची संपत्ती आहे.

६. हिंदुजा बंधू – हिंदुजा समूह हा एक अँग्लो-इंडियन ट्रान्सनेशनल समूह आहे. हा गट ऑटोमोटिव्ह, तेल आणि विशेष रसायने, बँकिंग आणि वित्त, आयटी आणि आयटीईएस, सायबर सुरक्षा, आरोग्य सेवा, व्यापार, पायाभूत सुविधा प्रकल्प विकास, मीडिया आणि मनोरंजन, उर्जा आणि स्थावर मालमत्ता यासह अकरा क्षेत्रांमध्ये उपस्थित आहे. हिंदुजा बंधूं या सर्व कामकाजाकडे लक्ष देतात. श्रीचंद हिंदुजा आणि गोपीचंद हिंदुजा हे दोघे भाऊ या ग्रुपचे चेयरमन आहेत. हिंदुजा बंधू भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील सहाव्या क्रमांकावर असून १८ बिलियन डॉलर्स इतकी त्यांची संपत्ती आहे.

७. उदय कोटक – उदय कोटक हे भारतीय बँकर असून ते कोटक महिंद्रा बँकेचे कार्यकारी उपाध्यक्ष आणि व्यवस्थापकीय संचालक आहेत. ही बँक सुरु झाल्यानंतर काही कालावधीमध्ये तिने आर्थिक सेवांच्या क्षेत्रात विविधता आणत स्टॉकब्रोकिंग, इन्व्हेस्टमेंट बँकिंग, कार फायनान्स, लाइफ इन्शुरन्स आणि म्युच्युअल फंडांमध्ये प्रमुख उपस्थिती निर्माण केली. २२ मार्च २००३ रोजी कोटक महिंद्रा फायनान्स लिमिटेड भारताच्या कॉर्पोरेट इतिहासातील रिझर्व्ह बँकेकडून बँकिंग परवाना प्राप्त करणारी पहिली कंपनी बनली. उदय कोटक यांची एकूण संपत्ती १५ बिलियन डॉलर्स इतकी असून ते भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीमध्ये सातव्या क्रमांकावर आहेत.

८. राधाकिशन दमानी – राधाकिशन दमानी हे भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीतील आठव्या क्रमांकाचे श्रीमंत व्यक्ती आहेत. DMart ही संकल्पना आणत सर्वत्र असणाऱ्या DMart चे हे संस्थापक आहेत, सोबतच ते एक गुंतवणूकदार आणि उद्योगपती देखील आहेत. राधाकिशन दमानी यांची एकूण संपत्ती १४.५ बिलियन डॉलर्स इतकी आहे.

९. जय चौधरी – जय चौधरी एक भारतीय-अमेरिकन उद्योजक आणि क्लाउड सिक्युरिटी कंपनी Zscaler चे मुख्य कार्यकारी अधिकारी आणि संस्थापक आहेत. Zscaler ही एक माहिती सुरक्षा कंपनी असून ती २००७ मध्ये सुरु झाली. या कंपनीने उत्पादित केलेल्या उत्पादनांपैकी दोन उत्पादने म्हणजे Zscaler खाजगी प्रवेश जे स्थानिक पातळीवर होस्ट केलेल्या अनुप्रयोगांना सुरक्षित प्रवेश प्रदान करते आणि Zscaler इंटरनेट प्रवेश जे बाह्य अनुप्रयोगांना सुरक्षित प्रवेश प्रदान करते. जय चौधरी यांची एकूण संपत्ती १३ बिलियन डॉलर्स इतकी असून भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तीच्या यादीत हे नवव्या क्रमांकावर आहेत.

१०. दिलीप संघवी – दिलीप संघवी हे एक भारतीय उद्योजक असून त्यांनी सन फार्मास्युटिकल्सची स्थापना केली. २०१६ मध्ये त्यांना भारत सरकारने पद्मश्री पुरस्काराने सन्मानित केले. सन फार्मास्युटिकल प्रामुख्याने भारत आणि युनायटेड स्टेट्समध्ये फार्मास्युटिकल फॉर्म्युलेशन्स आणि सक्रिय फार्मास्युटिकल घटक (एपीआय) तयार करते आणि विकते. सन फार्माची जगभरातील १०० हून अधिक देशांमध्ये उपस्थिती आहे. ही भारतातील सर्वात मोठी फार्मा कंपनी आहे आणि जगातील चौथी सर्वात मोठी जेनेरिक फार्मास्युटिकल कंपनी म्हणून प्रसिद्ध आहे. भारतातील श्रीमंत व्यक्तींच्या यादीत ते दहाव्या क्रमांकावर असून त्यांची एकूण संपत्ती १२.५ बिलियन डॉलर्स इतकी आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !