सध्या सर्वत्र ग्रामपंचायतीच्या निवडणुकांचा बोलबाला आहे. जसजसे निकाल जाहिर होत गेले तसतसे गावककऱ्यांमध्ये जल्लोषाचा वातावरण दिसुन येत आहे. साधारणत: निवडणुक जिंकल्यावर विजयी उमेदवारांना त्यांचे समर्थक खांद्यावर घेऊन मिरवुणक काढत जल्लोष साजरा करतात.
पण पुण्यातील पाळु गावात ग्राम पंचायतीच्या निवडणुकीत पति विजयी ठरल्यावर चक्क पत्नीने पतिला खांद्यावर उचलत गावात मिरवणुकीत सहभाग घेतला. संतोष शंकर गुरव असं विजयी उमेदवाराचे नाव असुन त्यांनी २२१ मतांनी विरोधी उमेदवाराचा पराभव केला. त्यांच्या पत्नीचे नाव रेणुका संतोष गुरव असे आहे. रेणुका यांनी अनोख्या पद्धतीने पतीच्या विजयाचा आनंद व्यक्त केला. सध्या या पती पत्नीचा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय.
ग्रामपंचायत चुनाव में पति के जीत का अनोखा जश्न!! ।#PUNE के पालु ग्राम पंचायत चुनाव में पति संतोष शंकर गुरव की जीत पर पत्नी रेणुका ने पति को कंधे पर उठाया और झूम उठी।@ndtvindia pic.twitter.com/zyZhhRiZxg
— sunilkumar singh (@sunilcredible) January 19, 2021
ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत पती जिंकल्यावर पत्नीच्या आनंदाला पारावार उरला नाही. त्यांनी लगेच आपल्या पतीला खांद्यावर उचलुन घेतले आणि जल्लोष करण्यास सुरुवात केली. हा व्हिडीओ इतका व्हायरल होत आहे कि खुद्द महाराष्ट्राचे गृहमंत्री अनिल देशमुख यांनी या पति पत्नीचा फोटो त्यांच्या ट्विटर अकाउंटवर ट्विट केला.
नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकाला नंतरच्या विजयी मिरवणूकीतील हे दृश्य मला सर्वात जास्त भावले. आज पतीच्या विजयानंतर पत्नीचा हा उत्साहवर्धक प्रतिसाद वर्षांनुवर्षे रूढ असलेल्या पुरुषसत्ताक मानसिकतेला बदलण्यासाठी सहाय्यक ठरेल याची मला खात्री आहे. pic.twitter.com/FLAOt8Z8Lg
— ANIL DESHMUKH (@AnilDeshmukhNCP) January 19, 2021
त्यांनी ट्विट मध्ये लिहले नुकत्याच पार पडलेल्या ग्रामपंचायत निवडणूक निकाला नंतरच्या विजयी मिरवणूकीतील हे दृश्य मला सर्वात जास्त भावले. आज पतीच्या विजयानंतर पत्नीचा हा उत्साहवर्धक प्रतिसाद वर्षांनुवर्षे रूढ असलेल्या पुरुषसत्ताक मानसिकतेला बदलण्यासाठी सहाय्यक ठरेल याची मला खात्री आहे असे म्हटले आहे.
जिंकल्यावर भावना व्यक्त करताना संतोष यांनी जिंकण्यामागे त्यांच्या पत्नीला श्रेय दिले. जर तिने घराघरात जावुन माझ्यासाठी प्रयत्न केले नसते तर मला हा विजय प्राप्त झाला नसता असे संतोष गुरव यांनी सांगितले. संतोष गुरव जाख माता देवी ग्राम विकास पॅनलवरुन निवडणुक लढत होते. त्या पॅनल वर त्यांनी ७ पैकी ६ जागा जिंकल्या.
सर्वच समाज माध्यमातून या जोडीचे गोडवे गायले जात आहेत. त्यांच्या आनंदाला पारावार उरला नाही. बॉलिरिपोर्ट टीम कडून त्यांना भावी वाटचालीसाठी खूप खूप शुभेच्छा. त्यांच्याकडून गावाची, समाजाची, देशाची खूप सेवा घडो हीच अपेक्षा.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !