Headlines

स्टेट बँक ऑफ इंडिया देत आहे स्वस्तात नवीन घर खरेदी करण्याची सुवर्णसंधी, जाणून घ्या कशी !

देशातील सर्वात मोठी सरकारी बॅंक म्हणजे स्टेट बॅंक ऑफ इंडीया . ही बॅंक 25 ऑक्टोबरला लोकांना गहाण ठेवलेली महागडी घरे, दुकाने, व्यावसायिक तसेच निवासी मालमत्ता स्वस्तात खेरदी करण्याची संधी देत आहे. हे एक इलेक्ट्रॉनिक लिलाव असेल.

एसबीआयने त्यांच्या ऑफिशिअल सोशल मिडीया प्लॅटफॉर्मवर एक जाहिरात जारी केली आहे. त्यात त्यांनी असे लिहीले आहे की, तुमच्यासाठी एक मोठी गुंतवणुकीची संधी आली आहे. ई-लिलावाच्या काळात आमच्यासोबत जोडलेले रहा तुमची सर्वश्रेष्ठ बोली लावा. बॅंकेकडुन वसुलीसाठी लेंडर्स डिफॉल्टरच्या गहाण ठेवलेल्या संपत्तीचा लिलाव करण्यात येणार आहे.
बॅंकेकडे गहाण असलेल्या संपत्तीचा लिलाव कोर्टाच्या आदेशावरुन पारदर्शीरित्या करण्यात येणार आहे.

सर्व संबंधित तपशील सादर करून आम्ही लिलावात सहभागी होण्यासाठी एक आकर्षक प्रस्ताव ठेवण्यात येईल. लिलावासाठी जारी केलेल्या सार्वजनिक नोटीसमध्ये इतर तपशीलांसह त्याचे मोजमाप, स्थान यांचा देखील समावेश केला आहे. तसेच लिलावात येणारी संपत्ती फ्रीहोल्ड किंवा लीजहोल्ड आहे की नाही हे देखील यांमध्ये सांगण्यात येईल.

असा घ्या लिलावात सहभाग – ई-लिलावाच्या नोटीसमध्ये दिलेल्या संबंधित मालमत्तेसाठी ईएमडी सादर करावा लागेल. ‘केवायसी कागदपत्रे’ संबंधित बँक शाखेत तपासुन घ्यावी लागतील .तसेच लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीकडे त्याची डिजिटल सही असणे आवश्यक आहे. ई- सही नसल्यास ई-लिलावकर्ता किंवा इतर कोणत्याही अधिकृत एजन्सीला याकरीता संपर्क साधावा.

ई-लिलावकर्त्याने संबंधित बँक शाखेत ईएमडी जमा केल्यानंतर आणि केवायसी कागदपत्रे दाखवल्यानंतर लिलावात सहभागी होणाऱ्या व्यक्तीच्या ईमेल आयडीवर लॉगिन आयडी आणि पासवर्ड पाठवला जाईल. लिलावाच्या नियमांनुसार, ई-लिलावाच्या दिवशी वेळेवर लॉग इन करून बोली लावणे गरजेचे आहे.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !