आपल्यापैकी अनेकजण हे विविध ठिकाणी नोकरी करत कार्यरत असतात, त्यातून मिळणाऱ्या पगारावर आपण आपले आयुष्य व्यतीत करत असतो. प्रत्येकाला त्याच्या कामाप्रमाणे पगार मिळतो. एखाद्या काम करणाऱ्या व्यक्तीला महिन्याला किती पगार मिळत असेल? लाख, २ लाख, १ कोटी नाहीतर तब्बल १४५८ कोटी….. आता तुम्ही म्हणाल १४५८ कोटी दरमहा? कदाचित तुमचा विश्वास बसला नसेल, पण मात्र हे सत्य आहे…. चला पाहूया कोण आहे ही व्यक्ती जिला महिन्याला तब्बल कोटींमध्ये पगार मिळतो.
जगातील सर्वाधिक पगार घेणारी व्यक्ती कोण असा प्रश्न विचारताच गडबडू जाऊ नको, त्यावर तुम्ही उत्तर देऊ शकता, त्या व्यक्तीचं नाव आहे जगदीप सिंग. जगातील सर्वाधिक पगार घेणारी ही व्यक्ती भारतीय आहे. जगदीप सिंग हे क्वांटमस्केपचे संस्थापक आहेत. इलेक्ट्रिक कारच्या बॅटरी संशोधनाचं काम ही कंपनी करते.
कंपनीचे सीईओ अलेन मस्क यांच्यापेक्षा ही जास्त पगार घेतात. त्यांच्या पगाराचे वार्षिक पॅकेज आहे, १७ हजार ५०० कोटी रुपये. महिन्याला ते १४५८ कोटी रुपये पगार घेतात तर दिवसाचा त्यांचा पगार ४८ कोटी रुपये इतका आहे. जगदीप सिंग यांचा एक दिवसाचा पगार म्हणजे अनेक कंपन्यांची वार्षिक उलाढाल आहे.
जगदीप सिंग हे स्टॅनफोर्ड युनिव्हर्सिटीमधून बी टेक आहेत, कॅलिफोर्निया युनिव्हर्सिटीमधून एमबीए झाले आहेत. ही कंपनी स्थापन करण्याच्या आधी त्यांनी वेगवेगळ्या कंपन्यांमध्ये फार महत्त्वाच्या पदांवर राहून काम केली आहेत आणि त्यामुळे त्यांना हा मोठा पगार पूर्णपणे अपेक्षित आहे आणि ते या इतक्या पगारासाठी पात्र आहेत. जगातल्या अग्रगण्य कंपन्यांच्या सीईओ पदावर अनेक भारतीय कार्यरत आहेत. जगात सर्वात जास्त पगार घेणारा पगारदार हा बहुमान एका भारतीयाला मिळाला आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !