नोकरी करुन इतरांच्या हाताखाली काम करण्यापेक्षा स्वताचा व्यवसाय सुरु करुन स्वता मालक बनुयात अशा विचाराचे अनेक स्वाभिमानी लोक असतात. शिवाय कोरोनाच्या काळात व्यवसायाचे महत्त्व दुप्पट झाले आहे. अशा परिस्थितीत, जर तुम्ही देखील नवीन व्यवसाय सुरू करण्याची तयारी करत असाल तर प्रथम त्याबद्दल संपूर्ण माहिती घेणे आवश्यक आहे. आम्ही तुम्हाला अशाच एका खास व्यवसायाबद्दल सांगणार आहोत. जो सुरू करून तुम्ही चांगले पैसे कमवू शकता. हा व्यवसाय म्हणजे बटाट्याचे चिप्स बनवण्याचा व्यवसाय आहे.
या चिप्सचा वापर स्नॅक्स म्हणूनही केला जातो. त्यासाठी तुम्हाला फक्त 850 रुपयांची मशीन खरेदी करून हा व्यवसाय सुरूकरायचा आहे. नंतर तुम्ही त्यात अधिक गुंतवणूक करून तो वाढवु शकता. जर तुमचा व्यवसाय मोठा असेल तर तुमचे उत्पन्न आणखी वाढू शकते.
अत्यंत कमी पैशांची गुंतवणुककरुन व्यवसाय सुरू करा – एखादा व्यवसाय सुरू करायचा झाल्यास त्याच्या मशीनची किंमत कमीत कमी दहा ते पंधरा हजारेपर्यंत असते. पण आम्ही ज्या मशीनबद्दल बोलत आहोत त्याची किंमत फक्त 850 रुपये आहे. कच्च्या मालासाठीही काही खर्च करावा लागेल. सुरुवातीला १०० ते २०० रुपयांचा कच्चा माल पुरेसा असेल. हे मशीन तुम्हाला ऑनलाइन सहज उपलब्ध असेल. ही मशीन जास्त जागा घेत नाही आणि ती चालण्यासाठी वीज सुद्धा लागत नाही. ती कोणत्याही टेबलावर ठेवून तुम्ही चिप्स सहजपणे कापू शकता. ही मशीन सहजपणे हाताने ऑपरेट करता येते. ही मशीन मुलं किंवा महिला सुद्धा चालवु शकता.
विक्री कशी होईल – तळलेले चिप्स खाणे सगळ्यांनाच आवडते. हल्ली समोरासमोर गरमागरम चिप्स तळुन घेऊन ते खाल्ले जातात. तुम्हीसुद्धा अशा चिप्सचे दुकान उघडून लगेच चिप्स तळू शकता. त्यानंतर तुम्ही त्यांना छोट्या पॅकेटमध्ये भरून लोकांना देऊ शकता. त्यानंतर चिप्स विकणाऱ्या इतर दुकानदारांशी संपर्क साधा. त्यामुळे हळूहळू तुमचे नेटवर्क वाढेल आणि तुम्ही हा छोटा व्यवसाय पुढे खूप वाढवू शकता.
किती कमाई होईल – बटाट्याचे चिप्स बनवण्यासाठी कच्च्या मालावर जेवढे पैसे खर्च होतात त्याच्या ७ते ८ पट पैसे मिळवता येतात. एका दिवसात १० किलो बटाट्याच्या चिप्स बनवले तर एका दिवसात १००० रुपये सहज कमावता येतील. यासाठी विशेष गुंतवणूक करावी लागली नाही.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !