Headlines

भावाला पाहून गल्ली मध्ये क्रिकेट खेळायला सुरु केले, आज आहे जगातील सर्वश्रेष्ठ महिला क्रिकेटर, जाणून घ्या कहाणी !

जर तुम्हाला काही मिळवायची इच्छा असेल, काही प्राप्त करण्याचे स्वप्न असेल तर तुम्हाला ते स्वप्न पूर्ण करण्यापासून कोणीच अडवू शकत नाही,असे म्हटले जाते, हे सारे करण्या साठी तुम्हाला जिद्द आणि मेहनत आणि निरीक्षण हवे असते. आपल्या आजूबाजूला असे अनेक मंडळी आहेत, जे मेहनतीच्या जोरावर यश प्राप्त करत असतात. कोणतेही कारण न देता परिस्थितीवर मात करतात आणि आपल्याला हवे असलेले यश प्राप्त करण्याचा प्रयत्न करतात.

आज आम्ही तुम्हाला अशाच एका व्यक्तीबद्दल सांगणार आहोत, या महिलेने आपल्या स्वप्नांना पूर्ण करण्यासाठी पराकष्ट केलेले आहेत. स्वप्न सत्यामध्ये उतरवलेले आहेत, त्या महिलेचे नाव आहे स्मृती मंधना. हे नाव आता प्रत्येकाच्या ओठावर येऊ लागले आहे. सर्वसामान्य असणारी ही मुलगी आज असामान्य ठरलेली आहे. या महिलेने क्रिकेट जगतामध्ये आपले नाव केलेले आहे म्हणूनच क्रिकेट विश्वामध्ये एक नवीन ओळख स्मृती यांना मिळाली आहे. स्मृती यांना विश्वभरात विराट कोहलीच्या नावाने देखील ओळखले जाते. आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की, स्मृती यांना इथपर्यंत पोहोचण्यासाठी प्रचंड मेहनत करावी लागली. इथपर्यंत पोहोचण्याचा त्यांचा प्रवास सोपा नव्हता. प्रचंड मेहनत आणि जिद्द यांच्या जोरावर त्यांनी हे स्वप्न पूर्ण केले.

यावर्षी झालेल्या आयपीएल मध्ये स्मृती मंधना यांनी उत्तम कामगिरी पार पडली तसेच सर्वात महागड्या महिला खेळाडू देखील त्यांच्या नावावर रेकॉर्ड नोंदवला गेला. स्मृती यांना बेंगलुरु टीमने 3.40 कोटी रुपयांमध्ये विकत घेतले म्हणजेच इतक्या किमतीमध्ये खेळाचा करार झाला. आतापर्यंत महिला क्रिकेट टीम मधील सर्वात महागड्या क्रिकेटर म्हणून देखील त्यांच्या नावावर रेकॉर्ड नोंदवला गेला आहे.

स्मृती यांचा जन्म 1996 मध्ये मुंबई येथे झाला. स्मृती यांना क्रिकेट खेळण्याची प्रेरणा त्यांचे मोठे भाऊ श्रवण यांच्याद्वारे मिळाली. श्रवण देखील महाराष्ट्रासाठी एज ग्रुप क्रिकेटमध्ये केलेला आहे. श्रवणला पाहूनच स्मृती यांनी क्रिकेट खेळण्याचा निर्णय घेतला आणि एके दिवशी क्रिकेटर बनण्याचा ध्यास देखील मनामध्ये घेतला. मेहनतीच्या जोरावर स्मृती यांनी आपल्या क्रिकेटर बनण्याचे स्वप्न पूर्ण केले.

ऑक्टोबर 2013 मध्ये स्मृती चर्चेमध्ये देखील आल्या होत्या, त्यांनी वन डे मॅच मध्ये डबल शतक बनवले होते आणि अशा प्रकारचा विक्रम करणारी पहिली महिला स्मृती ठरल्या त्यानंतर अनेकदा माध्यमांमध्ये स्मृती यांची चर्चा होऊ लागली. गुजरात विरुद्ध 150 चेंडूवर त्यांनी नाबाद 224 रन बनवले होते.. या क्रिकेट खेळामध्ये केलेल्या अप्रतिम सादरीकरणामुळे देखील स्मृती यांची एक आगळे वेगळी ओळख आपल्याला पाहायला मिळाली होती.

स्मृती यांनी एप्रिल 2013 मध्ये बांगलादेश विरुद्ध t20 च्या सामन्या द्वारे आपल्या करिअरची सुरुवात केली. ही करिअरची वाट त्यांना आंतरराष्ट्रीय स्तरावर नेणारी ठरली, त्यावेळी स्मृती फक्त 16 वर्षाच्या होत्या. याच महिन्यात स्मृती यांनी बांगलादेश विरुद्ध आपल्या वनडे सामना मध्ये पदार्पण केले. वर्ष 2014 मध्ये स्मृती यांनी इंग्लंड विरुद्ध सामना खेळून आपल्या टेस्ट मॅच च्या करिअरला सुरुवात केली.

यानंतर स्मृती यांना कधीच मागे वळून पाहायला लागले नाही. आपल्या उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर आणि एकापेक्षा एक सामनाच्या जोरावर स्मृती यांनी क्रिकेट क्षेत्रामध्ये आपले अढळ स्थान कमावले. ज्या ठिकाणी भारतामध्ये पुरुष क्रिकेटरांना अधिक महत्त्व दिले जाते, त्याच ठिकाणी आज महिला क्रिकेटर खेळाडू देखील मानाचे स्थान मिळवून देण्याचे कार्य स्मृती यांनी केले आहे म्हणूनच भविष्यात भारतीय महिला क्रिकेट संघाला सोन्याचे दिवस येतील, असे देखील म्हटले जात आहे…