कोरोनाच्या महामारीमुळे सर्वच प्रकारच्या उद्योगधंद्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. लॉकडाऊन संपत आता हळू हळू सर्व गोष्टी पूर्वीसारख्या होऊ पाहत आहेत. अनेक उद्योगांना या सणांकडून मोठ्या प्रमाणात अशा आहेत. त्यामुळे आकर्षक व विविध ऑफर ग्राहकांना देऊन नफा मिळवण्याचा प्रयत्न सुरु झाला आहे. या महामारीमुळे स्वतःच वाहन असण्यावर लोक भर देत आहेत.
त्यामुळे कर निर्माते आपल्या कंपनीची विक्री वाढवण्यासाठी व पंच लक्ष केंद्रित करण्यासाठी बंपर डिस्काउंट देत वेगवेगळ्या ऑफर्स देत आहेत. यासोबतच कॅशबॅक, कमी ईएमआय या ऑफर्स देखील आहेत. या ऐन सणाच्या काळात टाटा मोटर्स कमी ई एम आय मध्ये कार विक्री करणार आहेत. यामुळे गरीब आणि मध्यमवर्गीय लोकांना कार घेणं सोपं होईल. ग्राहक फक्त ७९९ रु ईएमआयवर कार विकत घेऊ शकतात.
एवढ्या कमी हफ्त्यामध्ये कार देण्यासाठी टाटा मोटर्सने काय केले ? – या कमी ईएमआय असलेल्या ऑफरसाठी टाटा मोटर्सने एचडीएफसी बँकसोबत टायअप केले आहे. वरील स्कीम टाटा मोटर्सच्या भारत स्टेज – 6 मधील सर्व कार, स्पोर्ट्स युटिलिटी व्हेहीकल (युएसव्ही) आणि इलेक्ट्रिकल वाहनांवर लागू होईल.
“या ऐन सणांच्या काळात विक्री वाढवण्यासाठी आणि उत्पादनाची पोहोच सहज बनवण्यासाठी एचडीएफसी बँकेसोबत जॊडून ‘ग्रॅज्युएल स्टेप अप स्कीम’ आणि ‘टीएमएल फ्लेक्सी ड्राईव्ह स्कीम’ या योजना ग्राहकांसाठी आणल्या आहेत. या दोन्ही योजना नोव्हेंबर २०२० पर्यंत उपलब्ध असतील.’ अशी माहिती टाटा मोटर्स यांनी दिली आहे.
ग्रॅज्युएल स्टेप अप स्कीम – टाटा मोटर्स की यांच्या म्हणण्यानुसार कंपनीच्या या योजनेअंतर्गत उपभोक्त्याला प्रति लाखावर महिना कमीत कमी 799 रुपये इतका हप्ता असेल. प्रति महिना येणारा हफ्ता हा वाहनाच्या मॉडेलवर व आवृत्तीवर निर्भर असेल. खरेदीदाराच्या सोयीनुसार दोन वर्षांसाठी हळूहळू ईएमआय वाढेल. म्हणजेच तुम्ही जर टाटा नॅनो घातली तर तुम्हाला ७९९ रुपयाच्या आसपास महिन्याला हप्ता येईल.
टीएमएल फ्लेक्सी ड्राईव्ह स्कीम – टाटा मोटर्सची दुसरी योजना आहे टीएमएल फ्लेक्सी ड्राईव्ह स्कीम. या योजनेंतर्गत ग्राहक अशा तीन महिन्यांची निवड करू शकतात ज्या महिन्यात ते किमान हप्ता भरतील. कंपनीचे म्हणणे आहे की या दोन योजना ग्राहकांना वाहनाचे हफ्ते भरण्यासाठी उपयोगी पडतील. याव्यतिरिक्त, कंपनी या दोन्ही योजनांतर्गत असलेल्या सर्व प्रवासी वाहनांवर एक्स-शोरूम किंमतीच्या १०० टक्के कर्जदेखील प्रदान करेल.
महिंद्रा एंड महिंद्राने केला बँक ऑफ बडोदा बँकेसोबत करार – टाटा मोटर्स पाठोपाठच महिंद्रा अँड महिंद्रा या कंपनीने बँक ऑफ बडोदा बँकेत सोबत करार केला आहे. हा करार शेतकऱ्यांना ट्रॅक्टर साठी कर्ज उपलब्ध करून देण्यासाठी केला आहे.
बँक ऑफ बडोदा पाच हजार पेक्षा जास्त ग्रामीण आणि काही शहरी भागात असलेल्या त्यांच्या बँकांच्या शाखांच्या माध्यमातून महिंद्रा एंड महिंद्राच्या ग्राहकांसाठी ट्रॅक्टरच्या कर्जासाठी सुविधा देणार आहे.
मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !