Headlines

एका पुरुषावर जास्त हक्क कोणाचा… बायकोचा कि त्याच्या आईचा.. जाणून घ्या !

लग्नानंतर प्रत्येकाचे आयुष्य बदलुन जाते. लग्न म्हटलं की त्यात केवळ नवरा बायको एकत्र न येता दोन कुटुंबे एकत्र येतात. त्यामुळे लग्नानंतर नवरा बायकोच्या आयुष्यात काही झालं तरी त्याचा परिणाम हा संपुर्ण कुटुंबावर होत असतो. लग्नानंतर मुलगी तिच्या नवऱ्याच्या घरी कशी सांभाळुन घेते यावर सतत चर्चा होत असतात. मात्र एक मुलगा त्याच्या लग्नानंतर आई आणि बायकोमध्ये कसे सावरुन घेतो यावर फारसे कोणी बोलत नाही.

सासु सुने मध्ये भांड्याला भांडी ही लागतातच. पण यामध्ये नवरा बिचारा फसतो. कारण जर त्याने त्या भांडणात त्याच्या आईची बाजु घेतली तर बायकोला वाईट वाटते आणि बायकोचे ऐकले तर आई नाराज होते. अशाप्रकारे मुलगा त्याच्या लग्नानंतर आई आणि पत्नीच्या नाजुक आणि किचकट नात्यात गोंधळुन जातो.

अशातच भारताचे पोलीस कॉन्स्टेबल आशिष मिश्रा यांनी सोशल मीडियावर एक प्रश्न विचारत या मुद्द्याला वाचा फोडली. त्यांनी ट्विटरवर प्रश्न विचारला कि एका पुरुषावर सर्वात मोठा हक्क कोणाचा असतो..आई की पत्नी….विचार करुन उत्तर द्या.

https://twitter.com/IndianCopAshish/status/1373593153396035587

कॉन्सटेबल आशीष मिश्रा यांच्या या प्रश्नावर अनेकांनी त्यांची मते मांडली. हा प्रश्न म्हणजे कोणत्याही पुरुषासाठी धर्मासंकटापेक्षा कमी नाही असे उत्तर अनेकांनी दिले. त्यांच्या या प्रश्नावर अनेकांनी आईला जास्त मत पडली. तर एकाने तर अनोखे उत्तरर देऊन या प्रश्नामागील भांडणच मिटवुन टाकले. त्या युजरने लिहिले कि पुरुषावर त्याच्या पत्नीचा हक्क असतो आणि मुलावर त्याच्या आईचा !

प्रत्येक मुलगा हा आई आणि बायको मध्ये नेहमीच भरडला जातो. आईची बाजु घेतल्यास त्याला मम्मास बॉय आणि पत्नीची बाजु घेतल्यास त्याला जोरु का गुलाम असे टॅग्ज दिले जातात. मुलाच्या आयुष्यात कधीही कोणत्या मुलची एण्ट्री झाली कि त्याच्या आईला थोडे असुरक्षित वाटते. तिला सतत वाटत असते कि माझा मुलगा माझ्या हातातुन निसटुन जात आहे. तर पत्नीला वाटते कि मी या घरात परकी आहे. माझा पती सतत त्याच्या आईचेच ऐकतो.

त्यामुळे पुरुषावर जास्त हक्क कोणाचा आईचा कि त्याच्या बायकोचा हा प्रश्न अजुनही तसाच आहे. तसे पहायला गेल्यास पुरुषाला या ध*र्म*संकटातुन फक्त त्याची आई आणि बायकोची समजुतदारीच वाचवु शकते. या दोघींमध्ये फसलेल्या बिचाऱ्या पुरुषाची अडचण समजुन घ्या त्याच्यावर मानसिक तणाव आणु नका तरच संपुर्ण परिवार मिळुन मिसळुन राहिल. …या मताबद्दल तुम्हाला काय वाटते ते आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !