Headlines

पोस्ट ऑफिसच्या या योजनेत १० हजार रुपये गुंतवा तुम्हाला मिळतील १६ लाख रुपये, जाणून घ्या योजना !

पैशांच्या गुंतवणुकीचे अनेक पर्याय आपल्याकडे उपलब्ध आहेत. त्यातील काही पर्याय हे सरकारी असतात तर काही खासगी. काही स्किममध्ये आपल्याला पैसे गुंतवल्यावर भरघोस रिटर्न मिळतो तर काही स्किममध्ये धोका सुद्धा असतो. अनेक गुंतवणुकदारांचा कल हा कमी रिटर्न देणाऱ्या स्किम मध्ये जास्त असतो कारण त्यात धोका कमी असतो.

तुम्हालापण जर कमी जोखीम असणाऱ्या स्किममध्ये गुंतवणुक करायची असेल तर पोस्ट ऑफिस ही स्किम तुम्हाला लाभदायक ठरेल. ही स्किम म्हणजे पोस्टाची रेकरिंग डिपॉजिट योजना. या स्किममध्ये १०० रुपयात खाते उघडले जाऊ शकते. तुम्हाला जर कमी गुंतवणुकीत जास्त फंड गोळा करायचा असेल तर ही स्किम तुमच्या साठी सर्वोतम्म आहे.

१० वर्षात एवढा बनेल फंड – पोस्टाच्या योजनेत ५ ते १० वर्षांपर्यंत गुंतवणुक करता येते. यात तुम्हाला दर महा १० हजार रुपये जमा करावे लागतील. १० वर्षे असे केल्यास १२ लाख जमा होतील. यावर ५.८ टक्के दराने व्याज मिळाल्यावर तुम्हाला १६,२६,४७६ रुपये मिळतील. ही गुंतवणुक ५ वर्षांसाठी सुद्धा असते.

हे आहेत फायदे – स्किम घेतल्यावर तुम्ही मध्येच जर पैसे डिपोजिट करु शकत नसाल तर ती मध्येच बंद होते मात्र तुम्हाला जेव्हा ती पुन्हा सुरु करायची आहे त्यावेळी ती सुरु देखील करता येऊ शकते. नियमांनुसार सलग ४ वेळा तुम्ही पैसे भरले नाही तर तुमचे खाते बंद होऊ शकते. आणि नंतर ते पुन्हा सुरु करायचे झाल्यास १ रुपयावर १ रुपये उशीर झाल्याचा दंड भरावा लागेल.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !