Headlines

सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल झालेल्या आजोबांनी ६०व्या वर्षी का केले लग्न, कोण आहेत ते ? जाणून घ्या !

आयुष्याचा जोडीदार कोण, कसा असावा हा ज्याचा त्याचा प्रश्न असतो. त्यामुळे वैवाहिक भावी आयुष्याची सुरुवात कोणत्या वर्षी होईल हे काही सांगता येत नाही. संगमनेर तालुक्यातील शिंदोडी येथील एक आजोबा चक्क ६० व्या वर्षी बोहल्यावर चढले आहेत. या आजोबांचे नाव तबा चिमीजी कुदनर असे असुन त्यांनी ४० वर्षीय महिलेशी लग्न केले. त्यांचे हे दुसरे लग्न आहे.

कुदनर यांच्या पहिल्या पत्नीचे एका वर्षापुर्वी निधन झाले. त्यांनंतर त्यांच्या लेकीचे सुद्धा लग्न झाले त्यामुळे त्यांना एकटेपणा आला होता. भविष्यात येणाऱ्या अडचणी आणि एकटेपणा दूर करण्यासाठी कुदनर यांनी दुसऱ्या लग्नाचा विचार केला. त्यांच्या या दुसऱ्या लग्नाची चर्चा आता राज्यभरात होत आहे.

पहिल्या पत्नीच्या निधनानंतर आणि मुलीच्या लग्नानंतर कुदनर यांचे खाण्यापिण्याचे, कपड्यालत्त्याचे, भांड्याकुंड्याचे हाल होत होते. त्यामुळे त्यांच्या मुलीने व मित्र परिवाराने त्यांना दुसरे लग्न करण्याचा सल्ला दिला. त्यानंतर त्यांच्या मुलीने त्यांच्याच नात्यातील ४० वर्षीय सुमन यांच्याशी तिच्या वडिलांचे लग्न लावुन दिले. विवाहानंतर हे लग्न मला माझ्या एकटेपणा आणि घरगुती अडचणींमुळे करावे लागत असल्याचे भावनिक उद्गार कुदनर यांनी काढले. हा आगळावेगळा विवाहसोहळा मोजक्या लोकांच्या उपस्थित पार पडला.

सध्या मुलांना सर्वोतोपरी योग्य अशी वधु सापडयला खुप कष्ट करावे लागतात. अशातच या आजोबांनी वयाच्या ६० व्या वर्षी दुसऱ्या लग्नाची बाजी मारल्याने या लग्नाची जोरदार चर्चा सर्वत्र होत आहे.

आजोबांच्या उदरनिर्वाहासाठी त्यांच्या घराचा प्रपंच नीट चालवण्यासाठी गावातील सरपंच तसेच इतर महत्वाच्या सदस्यांनी आजोबांचा विचार केला व त्यांचे लग्न लावुन दिले. गावातील एका सदस्याची अवहेलना होत असताना त्याला मदतीचा हात हा दिला पाहिजे याचा आदर्श या गावाने सर्वांसमोर ठेवला आहे. तसेच वयाच्या साठीत दुसरे लग्न करण्यात काही गैर नाही असे सुद्धा तेथील ग्रामस्थांनी सांगितले.

मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !