Headlines

सोशल मीडियावर व्हायरल झालेल्या ६६ वर्षीय आजोबांनी का केले लग्न आणि कशी मिळाली त्यांना मुलगी, जाणून घ्या !

लग्न म्हणजे माणसाच्या आयुष्यातला सर्वात आनंदाचा क्षण आणि या क्षणांसाठी माणूस लाखो रुपये खर्च करून तो आजन्म आठवणीत ठेवण्याचा प्रयत्न करत असतो. लग्न म्हणजे ७ जन्माच्या गाठी आणि या गाठी कधी जुळतील कोणीही सांगू शकत नाही. आज आम्ही तुम्हाला एका अनोख्या आजोबांबद्दल सांगणार आहोत.

आपल्याकडे साधारण पणे लग्न तिशीच्या आत केले जाते. त्यानंतर लग्न केल्यास खूप उशीर होतो असे म्हणतात. आयुष्यात एकमेकांना आधार किंवा म्हातारपणी चा सोबती म्हणून कोणीतरी जोडीदार असावा. जेणे करुन आपले स्वतः चे कुटुंब असेल तरीही कोणी तरी आपला स्वतः चा हक्काचा माणूस असावा ज्याच्या किंवा जिच्या सोबत आपण आपली सगळी सुख दुःख वाटून घेऊ शकू.

मात्र आता या सर्व गोष्टींना फारसे महत्त्व उरलेले नाही. कारण सध्याच्या काळात प्रत्येक जण स्वतःच्या करिअरचा विचार करून नीट सेट झाल्यावर लग्नाचा विचार करतात. काही जणांचा लग्न व्यवस्थेवर विश्वास नसतो. या पाठी त्यांची वेगवेगळी कारणे असतात. त्यामुळे काहीजण आजन्म ब्रह्मचर्य पत्करतात.

सध्या सोशल मीडियावर एका आजोबांच्या लग्नाचे फोटो तुफान व्हायरल होत आहेत. या फोटोंवर अनेकांच्या वेगवेगळ्या प्रकारे चांगल्या-वाईट प्रतिक्रिया मिळत आहेत. झाले असे की, आयुष्याचा अर्धा काळ उलटून गेल्यावर ब्रह्मचारी राहण्याची शपथ घेतलेल्या आजोबांनी वयाच्या ६६ व्या वर्षी लग्न केले. इतके वर्ष घरचे लग्नासाठी तगादा लावून थकले मात्र या ६६ वर्षीय आजोबांचे कोरोना ने डोळे उघडले.

या आजोबांचे नाव आहे माधव पाटील. हे आजोबा उरण तालुक्यातील बामण डोंगरी गावात राहतात. पेशाने पत्रकार आहेत. गेली ३५ वर्षे ते पत्रकारितेत सक्रिय आहेत त्यामुळे रायगड मध्ये त्यांची ज्येष्ठ पत्रकार म्हणून सर्वत्र ओळख आहे. मात्र वयाच्या सहासष्ठीत लग्न केल्यामुळे ते अधिकच प्रसिद्ध झाले.

खरेतर माधव पाटील यांचे वयाच्या तिशी मध्ये लग्न ठरले होते. साखरपुडा सुद्धा झाला होता मात्र काही कारणास्तव तो साखरपुडा मोडल्यामुळे त्यांचा संपूर्ण लग्न व्यवस्थेवरील विश्वास उडाला. त्यानंतर त्यांनी आयुष्यभर ब्रह्मचारी राहण्याची ठरवले. माधवरावांनी लग्न करावे यासाठी त्यांच्या अनेक नातेवाईकांनी त्यांची मनधरणी केली. मात्र त्यांनी कोणाचेच ऐकले नाही.

आता मात्र कोरोनाव्हायरस ने हे डोळे उघडले. कारण लॉक डाऊन मध्ये गेले सात महिने घरातच राहिल्यावर त्यांना एकाकी वाटू लागले. कोणीतरी आपल्या सोबत असावे अशी भावना त्यांच्या मनात येऊ लागली. माधव पाटील यांचे वय ६६ आहे व त्यांच्या आईचे वय ८८ आहे. त्यामुळे घर सांभाळला कोणीतरी हवे अशी जाणीव झाली.

याच वेळी त्यांना संजना यांचे स्थळ चालून आले. संजना या ४५ वर्षांच्या असून हे त्यांचे दुसरे लग्न आहे. या आधी पहिल्या लग्नाच्या नवऱ्याला त्यांनी घ*ट*स्फो*ट दिला. नंतर त्या भावाच्या घरी राहू लागल्या मात्र त्यांचा भाऊ कोरोना मुळे दगावला. त्यामुळे त्यांना सुद्धा आधाराची गरज होती म्हणूनच त्यांनी उतारवयातील आधार म्हणून त्यांच्यापेक्षा वीस वर्षे मोठ्या असलेल्या माधव पाटील यांच्यासोबत लग्न करण्याचा निर्णय घेतला.

नवं दाम्पत्यांना आमच्याकडून सुख, समृद्धी लाभो आणि वैवाहिक जीवन आनंदी जावो अश्या शुभेच्छा. मित्रांनो हा लेख तुम्हाला आवडला असेल तर नक्की लाईक करा आणि आपल्या मित्रांबरोबर शेयर करायला विसरू नका. तसेच आपली प्रतिक्रिया कमेंट करून नक्की कळवा !